Wednesday, February 8, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

राहुल गांधी शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिले तर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ही नावे चर्चेत

Rahul Gandhi remained firm on the refusal till the end, these names are being discussed for the post of Congress president

Surajya Digital by Surajya Digital
August 21, 2022
in Hot News, देश - विदेश, राजकारण
0
राहुल गांधी शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिले तर काँग्रेस अध्यक्ष पदासाठी ही नावे चर्चेत
0
SHARES
113
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नवी दिल्ली : गांधी घराण्यातील कुणीच काँग्रेस अध्यक्ष होण्यासाठी तयार नाहीये. त्यामुळे मोठा पेच काँग्रेस समोर उभा राहिला आहे. हीच परिस्थिती कायम राहिल्यास अशोक गेहलोत, मल्लिकार्जुन खरगे, केसी वेणुगोपाल, कुमारी सेलजा आणि मुकुल वासनिक यांसारख्या नेत्यांमध्ये एका नावावर एकमत होण्याचा प्रयत्न होऊ शकतो. जर राहुल गांधी शेवटपर्यंत नकारावर ठाम राहिले तर. While Rahul Gandhi remained firm on the refusal till the end, these names are being discussed for the post of Congress president

 

2024 च्या लोकसभा निवडणुका जवळ येत आहे. मात्र, प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेसला अजूनही अध्यक्ष मिळालेला नाही. त्यामुळे आगामी निवडणुकीत काँग्रेसला यश मिळणे मुश्किल आहे. पक्षाच्या केंद्रीय निवड समितीचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, 21 ऑगस्ट ते 20 सप्टेंबर या कालावधीत काँग्रेस अध्यक्ष निवडीसाठी कोणत्याही दिवशी निवडणुकीच्या अंतिम तारखेला मंजुरी देणे हे काँग्रेस कार्यकारिणीवर अवलंबून आहे.

काँग्रेसचा पुढचा अध्यक्ष प्रमुख कोण असेल याबाबत सध्या कोणतेही स्पष्ट संकेत नसल्याने पक्षात गोंधळाची स्थिती आहे. खरंतर गेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारत अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी पक्षाच्या हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी पार पाडत आहेत.

मात्र, आता काँग्रेसचे बहुतांश 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधींनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारावीत, असे सोनिया गांधींसह नेत्यांचे मत आहे. मात्र, यावर राहुल गांधी यांच्या ‘हो’ची प्रतीक्षा आहे. एनडीटीव्हीने आपल्या सूत्रांच्या हवाल्याने म्हटले आहे की, काँग्रेस अध्यक्षपदाची भूमिका राहुल गांधी यांनी स्वाकारावी यासाठी नेते प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप त्याला यश आले नाही.

2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राहुल गांधी यांनी पराभव दिला होता. सोनिया गांधी यांनीही प्रकृतीचे कारण देत पक्षाध्यक्षपदाची खुर्ची पुन्हा स्वीकारण्यास नकार दिला आहे. सूत्रांनी सांगितले की, सोनिया गांधींच्या या निर्णयामुळे आता सर्वांचे लक्ष प्रियंका गांधी वाड्रा यांच्यावर केंद्रित झाले आहे. कारण 136 वर्षे जुन्या संघटनेतील बहुतांश सदस्यांना अजूनही गांधी कुटुंबातील सदस्याने पक्षाचे नेतृत्व करावे, अशी इच्छा आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

मात्र, या वर्षी प्रियंका गांधी यांचा रेकॉर्ड उत्तर प्रदेश निवडणुकीत खराब झाला आहे. एकमत नसताना आज रविवारपासून सुरू होणाऱ्या काँग्रेस अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळापत्रकावर अनिश्चिततेचे ढग दाटले आहेत. अध्यक्षपदावरून सुरू असलेल्या गोंधळावर पक्षाने अद्याप अधिकृतपणे भाष्य केलेले नाही. काँग्रेसचे दिग्गज नेते भक्त चरण दास यांनी एनडीटीव्हीला सांगितले की, “होय, त्यांनी (राहुल गांधी) म्हटले आहे की त्यांना स्वारस्य नाही.

मात्र, आम्ही त्यांच्यावर काम करत आहोत आणि त्यांना पदभार स्वीकारण्याची विनंती करत आहोत. त्यांना सांगावं लागेल की, ते पद घेणार नसेल तर या खुर्चीवर कोण बसणार? मात्र, केंद्र सरकारविरोधात काँग्रेसच्या प्रचाराचे नेतृत्व राहुल गांधी करत आहेत. सप्टेंबरमध्ये ते एका विशाल रॅलीला संबोधित करणार आहेत आणि कन्याकुमारी येथून ‘भारत जोडी यात्रा’ सुरू करणार आहेत.

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदरसिंग हुड्डा म्हणाले, “होय, आम्ही रॅलीचे आयोजन करत आहोत आणि त्याचे नेतृत्व राहुल गांधी करतील. पक्षाध्यक्षपदाच्या निवडीबाबत आम्ही ठामपणे काहीही सांगू शकत नाही. काँग्रेस पक्ष गेल्या काही वर्षांपासून नेतृत्वाच्या संकटाचा सामना करत आहे. पक्षाच्या मोठ्या पराभवामुळे तसेच हाय-प्रोफाइल नेत्यांच्या बाहेर पडल्यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली आहे.

मार्चमध्ये, सोनिया गांधी यांनी पक्षाच्या विधानसभा निवडणुकीतील पराभवावर चर्चा करण्यासाठी एक बैठक बोलावली होती, जिथे त्यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी वाड्रा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांना केलेल्या भाषणात राजीनामा देण्याची ऑफर दिली होती. मात्र, निवडणुकीपर्यंत राहण्यासाठी त्यांची मनधरणी करण्यात आली. त्यानंतर, मे महिन्यात उदयपूर येथे पक्षाच्या मेगा मीटिंगमध्ये (काँग्रेस चिंतन शिबीर) काँग्रेसने नवीन प्रमुख निवडण्यासाठी कालमर्यादा निश्चित केली.

Tags: #RahulGandhi #remained #firm #refusal #till #end #names #discussed #post #Congress #president#राहुलगांधी #शेवटपर्यंत #नकार #ठाम #काँग्रेस #अध्यक्ष #पदासाठी #नावे #चर्चेत
Previous Post

मंगळवेढा कारागृहातील तीन कैद्यांना कोरोनाची लागण, पोलीस – कैदी भयभीत

Next Post

शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 14 वर्षांनंतरही करार कागदावरच

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 14 वर्षांनंतरही करार कागदावरच

शिवसेना नेते संजय राऊतांचा तुरुंगातील मुक्काम वाढला, 14 वर्षांनंतरही करार कागदावरच

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697