सोलापूर : सोलापूर तालुक्यातील मंगळवेढा तालुक्यातील 24 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेस अधिवेशन संपल्यानंतर सात दिवसांत मुख्यमंत्री यांची मान्यता घेऊन त्यानंतर सात दिवसांत मंत्रिमंडळाच्या बैठकीत सादर केला जाईल, असे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत सांगितले. Question of 24 villages: Deputy Chief Minister Devendra Fadnavis announced about Mangalvedha Irrigation Scheme
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की, मंगळवेढा तालुक्यातील 35 तालुक्यातील 11 गावांचा समावेश म्हैसाळ उपसा सिंचन योजनेच्या लाभक्षेत्रात झाला आहे उर्वरित 24 गावांसाठी मंगळवेढा उपसा सिंचन योजना प्रस्तावित केली आहे. या योजनेस लवकरच मान्यता मिळण्यासाठी प्रयत्न केले जातील. आवश्यक असणाऱ्या सर्व मान्यता घेण्यात येतील.
महाराष्ट्र विधानसभा नियम 105 अन्वये उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेस उत्तर देताना त्यांनी ही माहिती दिली. यावेळेस आमदार समाधान आवताडे याबाबतच्या चर्चेत सहभागी झाले होते.
□ मजुरांचे हातपाय बांधून मारहाण
सोलापूर : माढा तालुक्यातील भुताष्टे गावात दोन मजुरांना मुकादमाने जबर मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या मारहाणीचा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
या प्रकरणी मजुराच्या पत्नीने पोलिसात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून बालाजी मोरे, भालचंद्र अनंत यादव व इतर अनोळखी दोघे असे एकूण चार जणांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या विषयी अधिक माहिती अशी की, विकास नाईकवडे व सेवक कसबे असे जखमी मजुरांची नावे आहेत. त्यांच्यावर खासगी व सरकारी दवाखान्यात प्रथमोपचार करण्यात आले. हा प्रकार 15 ऑगस्ट रोजी माढा तालुक्यातील भुताष्टे या गावात घडला. 17 ऑगस्ट रोजी याबाबत माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
बालाजी मोरे हा भुताष्टे (ता. माढा) येथे इलेक्ट्रिक पोलचे मुकादम आहेत. विकास भिवा नाईकवडे व सेवक कसबे हे दोघे बालाजी मोरे यांच्याकडे मजूर म्हणून काम करतात. 15 ऑगस्ट रोजी विकास हे आपल्या पत्नीला बालाजी मोरे यांच्याकडे जाऊन माझ्या कामाचे पैसे घेऊन येतो, असे सांगून गेले होते. रात्र झाली तरी ते घरी परतले नाहीत. दुसऱ्या दिवशी 16 ऑगस्ट रोजी संदीप लवटे हे घरी आले आणि सोनाली नाईकवडे यांना व्हिडीओ दाखवला. या व्हिडीओमध्ये विकास नाईकवडे (सोनालीचे पती) व सेवक कसबे या दोघांना बालाजी मोरे, भालचंद्र यादव व इतर दोनजण मारहाण करत असल्याचे चित्रीकरण होते.
दोन्ही मजुरांना पांढऱ्या दोरखंडाने पाठीवर तसेच हाताने पायाने अमानुष मारहाण करीत शिवीगाळ दमदाटी केली जात असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. दोघा मजुरांना मारहाण करतानाचा हा व्हिडीओ सोनाली नाईकवडे यांनी पोलिसांना दाखविला. या व्हिडीओवरून माढा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या चौघांविरोधात ॲट्रासिटी, मारहाण व अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.