मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राज ठाकरे यांनी आज कार्यकर्त्यांना संबोधन केले. यावेळी त्यांनी शिवसेना सोडतानाचा बाळासाहेबांबरोबरचा प्रसंग सांगितला. मी शिवसेना सोडताना बाळासाहेबांना सांगून बाहेर पडलो. इतरांच्या बंडाबरोबर माझ्या निर्णयाची तुलना करु नका. शिवसेना सोडण्याआधी मला त्यांनी भेटण्यासाठी बोलावलं होतं. गेल्यानंतर त्यांनी मला मिठी मारली आणि आता जा असे म्हणाले, असे राज यांनी सांगितले. Raj Thackeray said in office bearers meeting how to use social media otherwise…
मुंबईत मनसेचा पदाधिकारी मेळावा पार पडला. यावेळी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले. त्यांची शस्त्रक्रियेनंतर ही पहिलीच सभा आहे. यावेळी त्यांनी गमतीशीर किश्यांनी भाषणाची सुरुवात केली. मनसे आंदोलन अर्थवट सोडतो हा आरोप चुकीचा आहे. त्यांना आपण टोलनाके बंद केलेले आंदोलन सांगा, आपण कश्याप्रकारे हे आंदोलन पार पाडले. द्या सत्ता हातात बाकीचे टोल बंद करतो, असे राज म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पक्षातील अंतर्गत वाद सोशल मीडियावर कमेंट करुन काढला तर त्याला क्षणभरही पक्षात ठेवणार नाही,” अशी ताकीदही राज ठाकरे यांनी दिलीय. राज ठाकरे म्हणाले की, “मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात, अंतर्गत, एकमेकांविषयी कोणीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्यास त्याला एक क्षणभरही पक्षात ठेवणार नाही. तुमचे चोचले मी खूप पुरवले मी आतापर्यंत. झालं ते तेवढं खूप झालं. तुम्हाला तुमचं काम सांगायचं असेल तर त्या माध्यमाचा उपयोग करा. पण तुम्हाला एकमेकांची उणीदुणी काढायची असेल त्या माध्यमावर काढून तर बघा. जर असं कोणी काढलं असेल तर ते माझ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. संदीप देशपांडे, सचिन मोरे किंवा इतर पक्षातील नेत्यांपर्यंत पोहोचलं पाहिजे, माझ्यापर्यंत ती गोष्ट आली पाहिजे.”
□ मेळाव्यात दिला मोलाचा सल्ला
तुम्ही प्रमुख पदांवर असाल तर त्या पदाची शान राखली पाहिजे. पक्षाने ज्या पदावर तुमची नेमणूक केली आहे, त्याचा आदर केला पाहिजे. तुमच्याबरोबरच्या सहकाऱ्यांना काहीतरी सांगितलं पाहिजे. तुम्ही पण त्यांच्यातले होऊन वाद घालत बसणार असाल तर कसं होणार सांगा मला. बाकीच्या राजकीय पक्षांमध्ये होणारा धुडगूस चालू असेल तो चालू दे. मी आपल्या पक्षामध्ये हे चालू देणार नाही. मघाशी बाळा नांदगावकरांनी भाषणामध्ये विषय काढला सोशल मीडियाचा. मी तुम्हाला आताच सांगून ठेवतो. जर समजा पक्षातल्या पक्षात, अंतर्गत, एकमेकांविषयी कोणीही फेसबुक आणि व्हॉट्सअॅपवर कोणत्याही प्रकारच्या कमेंट केल्यास त्याला एक क्षणभरही पक्षात ठेवणार नसल्याचे सांगितले.