□ समाजकल्याण आयुक्तालयाच्या (निरीक्षण) विशेष अधिकारी मनीषा फुले यांच्यासह शासकीय पथक चौकशीसाठी सोलापुरात
सोलापूर : अखेर झेडपीच्या समाजकल्याण विभागातील विविध योजनांची चौकशी सुरू झाली आहे. समाजकल्याण आयुक्तालयाच्या (निरीक्षण) विशेष अधिकारी मनीषा फुले यांच्या नेतृत्वाखाली शासकीय पथक चौकशीसाठी सोलापुरात काल मंगळवारी (ता. 23) दाखल झाले आहे. Solapur Zilla Parishad is finally investigating the various schemes in the social welfare department of ZP
मोहोळ तालुक्याचे भाजपा सरचिटणीस संजीव खिलारे यांनी समाजकल्याण विभागाच्या योजनेत नियमबाह्य कामकाज होत असल्याची तक्रार महाराष्ट्र शासनानकडे केली होती. समाजकल्याण विभागांतर्गत राबविण्यात येणार्या दलितवस्ती विकास योजनेची कामे वाटताना टक्केवारी घेतल्याचा आरोप डीपीसीत करून आमदार राम सातपुते यांनी खळबळ उडवून दिली होती.
याप्रकरणी संबंधितांवर कारवाई न झाल्यास आमदारकीचा राजीनामा देण्याचाही त्यांनी इशारा दिला होता. त्याआधी झेडपीच्या तत्कालीन सदस्यांनी ही १६ कोटी ५० लाखांचा निधी समाजकल्याण समितीची मान्यता न घेता परस्पर वाटप केल्याची तक्रार जिल्हाधिकार्यांकडे दिली होती. त्यामुळे या प्रकरणाचे गांभीर्य वाढले होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
दरम्यान भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाचे सचिव संजीव खिलारे यांच्या तक्रारीवरून झेडपीच्या समाजकल्याण विभागाची २२ ऑगस्टपासून चौकशी सुरू झाली आहे. २६ ऑगस्टपर्यंत या कार्यालयातील कागदपत्रांची सखोल चौकशी होणार आहे. तसेच तक्रारदार खिलारे यांना प्रभारी समाजकल्याण अधिकारी चंचल पाटील यांच्या कार्यालयात २३ ऑगस्ट रोजी केलेल्या तक्रारीच्या अनुषंगाने पुराव्याचे कागदपत्र हजर करण्यासंबंधी हजर राहण्याबाबत सूचित करण्यात आले आहे.
झेडपी समाजकल्याण विभागाची सोमवारपासून तब्बल आठ ते दहा तपासणीस कागदपत्राची तपासणी करीत आहेत. आमदार सातपुते यांच्या तक्रारीचे काय झाले असा सवालही नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे. याबाबत अधिक माहिती तक्रारदार संजीव खिलारे यांच्याशी जाणून घेतले असता ते म्हणाले, होय मी याबाबत वेळोवेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडे तक्रारी करून त्याची दखल घेतली नाही. त्यामुळे थेट पुणे उपायुक्त यांच्याकडे याबाबतच्या तक्रारी केल्या होत्या. समाज कल्याण खात्यामध्ये विकास कामे असो किंवा लाभाच्या योजना असो कुठलेह कामे पैशाविना केले जात नाही. याबाबत तक्रार केली होती याबाबत सध्या सोमवारपासून याची तपासणी सुरू झाली आहे.