सोलापूर : पंढरपूरहून आटपाडीकडे जाणारी एसटी बसला पंढरपूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात एसटी बसमधील दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून सहाजण जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. Sonke ST bus-truck accident near Pandharpur; Two killed, six injured
हा अपघात सोनके येथे आज गुरूवारी (ता.25) सकाळी १२ च्या सुमारास झाला. या अपघातात एसटी बसचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या अपघातात बस मधील सुंदराबाई माने ( वय: 69 रा.फळवणी ता.माळशिरस) या महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. दुस-या मयताचे नाव समजू शकले नाही. प्रवासी शंकर शिवशेटे, बस चालक आनंदराव पाटील, बस वाहक राजेंद्र गायकवाड हे जखमी झाले आहेत. अपघाताची नोंद पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पंढरपूरहून आटपाडीकडे जाणाऱ्या एसटी बसला समोरून येणाऱ्या ट्रकने जोराची धडक दिली. या अपघातात ट्रकच्या व एसटीच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात दोन प्रवाशी जागीच ठार झाले असून ६ प्रवाशी गंभीर जखमी झाले आहेत.
या घटनेची माहिती मिळताच पंढरपूर ग्रामीण पोलिस दलाचे निरीक्षक धनंजय जाधव यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर अपघातातील जखमींना उपचारासाठी रूग्णालयात हलविले. मागील काही दिवसांपासून सोलापूर जिल्ह्यात अपघातांची संख्या वाढत आहे. त्यात अनेकांचा जीव जात आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ शेतीच्या वादातून झोपेत असलेल्या सख्या भावावर हल्ला: दोघांवर गुन्हा
सोलापूर – शेत जमिनीच्या वाटणीच्या बाबत तू कोर्टात का गेला? या कारणावरून झोपेत असलेल्या सख्ख्या भावावर लोखंडी अँगलने हल्ला करून गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना दहिटणे (ता.बार्शी) येथे काल बुधवारी (ता.24) पहाटेच्या सुमारास घडली.
प्रवीण चंद्रकांत काशीद (वय ३६ रा. दहिटणे) असे जखमीचे नाव आहे. त्यांना मारहाण करून गंभीर जखमी केल्याप्रकरणी त्यांचा भाऊ हरिदास काशीद आणि तुकाराम दत्तात्रय साठे (दोघे रा. दहिटणे)या दोघांवर वैरागच्या पोलिसांनी गुन्हा दाखल केला. जखमी प्रवीण काशीद हे आपल्या शेतातील वस्तीवर झोपले होते. पहाटे दोन वाजेच्या सुमारास हरिदास काशीद आणि तुकाराम साठे या दोघांनी शेतीचा वाद कोर्टात का घेऊन गेला. या कारणावरून त्याच्यावर लोखंडी अँगलने हल्ला करून हात फ्रॅक्चर केला. तसेच आई लता काशीद यांना शिवीगाळ आणि धमकी दिली. अशी नोंद पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार हळे पुढील तपास करीत आहेत.