● एक नेता, एक झेंडा, एक पक्ष : राजाभाऊ सरवदे
सोलापूर – रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) पक्षाच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी राजाभाऊ सरवदे (सोलापूर) यांची निवड झाली आहे. रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या अध्यक्षतेखाली पुणे येथे झालेल्या बैठकीत पक्षाच्या महाराष्ट्र राज्य कार्यकारिणीची निवडणूक घेण्यात आली. ही निवड म्हणजे त्याच्या वाढदिवसादिवशी गोड भेट समजली जात आहे. Election of Rajabhau Sarvade as State President of Ripai
मागील राज्य कार्यकरिणीमध्ये सरवदे हे सरचिटणीस म्हणून कार्यरत होते त्यांना आता राज्य अध्यक्षपदी बढती देण्यात आली. पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे झालेल्या रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीच्या निवडणुकीला राज्यभरातून सर्व जिल्हा प्रतिनिधी उपस्थित होते.
काल गुरुवारी (ता.25) झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले होते. यावेळी मावळते प्रदेशाध्यक्ष भुपेश थुलकर उपस्थित होते. रिपाइंच्या राज्य कार्यकरिणीच्या अध्यक्षपदी राजभाऊ सरवदे, राज्य कार्याध्यक्षपदी बाबूराव कदम (औरंगाबाद), सरचिटणीस गौतम सोनवणे (मुंबई), संघटन सचिव परशुराम वाडेकर (पुणे), राज्य संघटक सुधाकर तायडे (अकोला), राज्य उपाध्यक्ष अण्णासाहेब रोकडे (कल्याण) या सहा जणांची निवड करण्यात आल्या.
निवडीची घोषणा रामदास आठवले यांनी केली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून रिपाइंचे राष्ट्रीय सरचिटणीस अविनाश महातेकर यांनी काम पाहिले, यावेळी माजी आमदार सुमंतराव गायकवाड उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
रिपाइंच्या राज्य कमिटीमध्ये एकूण ५४ जणांची निवड झाली असून १८ निमंत्रित सदस्याची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती रामदास आठवले यांनी दिली. रिपाइंच्या राज्य कार्यकारिणीचा कालावधी पाच वर्षांचा असून दर पाच वर्षांनी कार्यकरिणीच्या निवडणुका घेऊन पक्षसंघटन मजबूत करण्याकडे रिपाइंचे लक्ष्य राहील, असे आठवले म्हणाले.
□ एक नेता, एक झेंडा, एक पक्ष : राजाभाऊ सरवदे
दि.१० एप्रिल १९७८ साली भारतीय पँथरची स्थापना झाली होती. तेव्हा मी मिलिंदनगर, बुधवार पेठचा शाखा प्रमुख झालो होतो. पुढे आंबेडकरी चळवळीत अनेक आंदोलने केली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या जिल्हा सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्ष, प्रदेश प्रमुख संघटक, संघटक सचिव, प्रदेश सरचिटणीस पदावर पक्षाचे काम केले.
त्यानंतर आता प्रदेश अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. आजवर एक नेता, एक झेंडा अन् एक पक्ष ठेवून मी आंबेडकरी चळवळ सुरू ठेवली आहे. या पुढेही रामदास आठवले यांच्या मार्गदर्शनाखाली चळवळीच्या माध्यातून पक्ष वाढीचे काम करणार असल्याचे राजाभाऊ सरवदे यांनी सांगितले.