मुंबई – संभाजी ब्रिगेडचे नेते आज उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंसह पत्रकार परिषद घेतली. पुढील काळामध्ये संभाजी ब्रिगेड व शिवसेना एकत्र काम करेल, अशी माहिती सुभाष देसाई यांनी दिली आहे. तसेच शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेड निवडणुकीच्या रिंगणात उतरणार असल्याची घोषणा झाली आहे. या एकीनं शिवप्रेमी आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला मानणारी मंडळी आनंदी होईल. संविधान टिकवण्यासाठी ही युती झाली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटलंय. Alliance of Shiv Sena and Sambhaji Brigade; Alliance to Preserve the Constitution
संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना यापुढे युती म्हणून काम करणार असल्याचंही संभाजी ब्रिगेडकडून सांगण्यात आलं. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड एकत्रित येणार असल्याची घोषणा आज पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, संभाजी ब्रिगेडचे, अध्यक्ष मनोज आखरे, यांच्या उपस्थितीत करण्यात आली.
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू.
ठाकरेंनी पुढं म्हटलं की, मला आपण एकत्र आल्याचा आनंद आहे. आपली भूमिका रोखठोक आहे. ती आपल्याला पटली म्हणून आपण एकत्र आलो आहोत. आम्ही सत्तेत होतो, सत्ता पुढे येणारच आहे. काही नसताना तुम्ही सोबत आलेला आहात. ही आपली वैचारिक युती झाली आहे. महाराष्ट्रात आज जे काही घडवलं किंवा बिघडवलं ती महाराष्ट्राची ओळख नाही. शिवरायांचा महाराष्ट्र आहे असं काही जण म्हणतात पण तसं वागत नाहीत, असा टोलाही त्यांनी लगावला. आमचं हिंदुत्व पटल्यानं संभाजी ब्रिगेड सोबत आली आहे. आपण दुहीच्या शापाला गाडून टाकू. संभाजी ब्रिगेडसोबत मतभिन्नता किती आहे यापेक्षा मतऐक्य किती आहे हे महत्वाचं आहे. दोन्ही पक्षांनी मतभिन्नता कुठं आहे यावर विचार करुन समन्वयानं काम करु, असंही ठाकरे म्हणाले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, या लढवय्या सहकाऱ्यांचं मी स्वागत करतो. केवळ महाराष्ट्रातच नाही तर देशात प्रादेशिक पक्ष संपवण्याचं कारस्थान सुरु आहे. यालाच लोकशाही मानणारे लोकं आता बेतालपणे बोलत आहेत. कोर्टातील निर्णय हा देशात लोकशाही राहील की बेबंदशाही राहील, याचा निर्णय असेल. आपल्या विचारांचे लोकं आज सोबत येत आहेत. प्रादेशिक अस्मिता वाचवण्यासाठी एकत्र यायला हवं असं मला अनेकजण म्हणतात. संभाजी ब्रिगेड आणि शिवसेना एकत्र येऊन आपण मोठा इतिहास घडवू, असं ठाकरे म्हणाले.
मराठा सेवा संघाची युवक आघाडी म्हणून 1997 मध्ये संभाजी ब्रिगेडची स्थापना करण्यात आली. संभाजी ब्रिगेडचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर हे त्यावेळी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. याच काळात मराठा सेवा संघाकडून म्हणजे 1995 मध्ये शिवराज्य पक्षाची स्थापना करण्यात आली. मात्र त्याला 20 वर्षात अपेक्षित यश मिळालं नाही. 5 जानेवारी 2004 रोजी पुण्यातील भांडारकर प्राच्यविद्या संस्थेवर हल्ला करुन संभाजी ब्रिगेड प्रकाशझोतात आली. वादग्रस्त लेखक जेम्स लेनला भांडारकर संस्थेने चुकीची माहिती पुरवल्याचा आरोप करत संभाजी ब्रिगेडने भांडारकर संस्थेवर हल्ल्ला केला होता.
2012 साली संभाजी ब्रिगेडने रायगडावरील वाघ्या कुत्र्याची समाधी फोडली. त्यावेळी देखील संभाजी ब्रिगेड आणि शिवसेनेत संघर्ष उभा राहिला. त्यावेळचे शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्या पुढाकाराने संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल झाले. आज त्याच शिवसेनेसोबत संभाजी ब्रिगेडची युती झालीय.