नवी दिल्ली – काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी पक्षाला रामराम ठोकला आहे. त्यांनी पक्षातील सर्वपदाचा राजिनामा दिला आहे. त्यांनी पक्षाच प्राथमिक सदस्यत्वही सोडलं आहे. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधीच नव्हे तर, सोनिया गांधी यांच्यावरही घणाघाती टीका करून पक्षाचे ज्येष्ठ नेते गुलामनबी आझाद यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. Senior Congress leader Ghulamnabi Azad left the Congress after criticizing Gandhi
गुलामनबी यांनी कांही दिवसापूर्वीच जम्मू-काश्मिर काँग्रेस समितीच प्रचार प्रमुख पद नियुक्तीनंतर लगेच सोडलं होतं. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींना पाचपानी पत्र पाठवत त्यांनी राजिनामा दिला आहे. पक्षाच्या अनुभवी नसणारे लोक पक्ष चालवत आहेत असंही त्यांनी यापत्रात म्हंटलय. जी २३ या बंडखोर गटाच नेतृत्वही आझाद करत होते. वर्षाअखेरीस वा पुढील वर्षाच्या सुरुवातीला जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळेच त्यांनी हे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
पत्रात गुलाम नबी आझाद यांनी, एकीकडे राहुल गांधी यांच्यावर जोबरदार हल्ला चढवला आहे, तर दुसरीकडे माजी पंतप्रधान इंदिरा गांधींपासून ते पक्षाच्या हंगामी अधक्ष सोनिया गांधींपर्यंत गांधी कुटुंबासोबत असलेल्या आपल्या जवळच्या संबंधांचा उल्लेख करत त्यांच्या नेतृत्व क्षमतेचे कौतुक केले आहे.
आझाद यांनी यूपीएचे सरकार हे रिमोटवर चालणारे सरकार असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले, ”वाईट गोष्ट अशी, की यूपीए सरकारची संस्थात्मक अखंडता नष्ट करणारे ‘रिमोट कंट्रोल मॉडेल’ आता भारतीय राष्ट्रीय काँग्रेसमध्ये लागू झाले आहे. आपण केवळ एक नामधारी व्यक्ती आहात. सर्व महत्वाचे निर्णय राहुल गांधी अथवा त्यांचे सुरक्षा गार्ड आणि पीए घेतात.” काँग्रेस पशाचे हाल असे झाले आहेत, की आता पक्षाचे नेतृत्व स्वीकारण्यासाठी स्वतःला पडद्याआड उभे केले जात आहे.
दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमधील ”जी-२३” गटाने सोनिया गांधींना दिलेले पत्र राहुल गांधी यांच्या निष्ठावान नेत्याने प्रसारमाध्यमात ”लीक” केले. त्यानंतर झालेल्या पहिल्या कार्यकारिणीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी आझाद यांच्यासह ”जी-२३” गटातील नेत्यांवर शरसंधान साधले होते. ”हे नेते संघ आणि भाजपचे सहानुभूतीदार आहेत”, अशी थेट टीका राहुल यांनी केल्याची चर्चा रंगली होती. आझाद, आनंद शर्मा आदी बंडखोर नेत्यांशी सोनिया गांधी यांनी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला होता. पण, राहुल गांधी यांनी जुन्या-जाणत्या नेत्यांना दूर ठेवले आहे. या विरोधातून आझाद यांना राज्यसभेची उमेदवारी नाकारली गेली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
आझादांच्या राज्यसभेतील निरोप समारंभात पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आझादांची प्रचंड स्तुती केली. मोदी आणि आझाद यांनी एकमेकांचे कौतुक केले होते, ते भावनिक झाले होते. तेव्हापासूनच आझाद नवी राजकीय खेळू शकतील, असे काँग्रेसमध्ये बोलले जात होते. त्यामुळे आझाद यांचा राजीनामा अपेक्षितच होता, तो इतक्या उशिरा का दिला गेला, असे विचारले जात आहे. आझादांच्या राजीनाम्याचा काँग्रेसमध्ये कोणालाही धक्का बसलेला नाही.
आझाद यांनी पाच पानी राजीनामा पत्रात, ”मी व माझे सहकारी आयुष्यभर ज्या वैचारिक भूमिकेशी एकनिष्ठ राहिलो, त्यासाठी आता काँग्रेसच्या बाहेर राहून प्रयत्न करू”, असे म्हटले आहे. या विधानांमधून आझाद यांची नजिकच्या भविष्यातील राजकीय वाटचाल स्पष्ट झाली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये मतदारसंघांच्या फेररचनेचे काम पूर्ण झाले असून तिथे विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. भाजपेतर विरोधी पक्षांच्या गुपकर आघाडीलाही घरघर लागली आहे. अशा वेळी विधानसभा निवडणुकीनंतर वेगळा राजकीय गट मुख्यमंत्रीपदाच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी उपयुक्त ठरू शकतो, याचा अचूक अंदाज आझाद यांनी बांधलेला आहे.
पूर्वी मेहबुबा मुफ्ती यांची ”पीडीपी” व भाजप युतीचे सरकार जम्मू-काश्मीरमध्ये स्थापन झाले होते. काश्मीरचा विशेषाधिकार काढून टाकल्यानंतर निर्माण झालेल्या नव्या राजकीय परिस्थितीमध्ये याच प्रयोगाची पुनरावृत्ती भाजपला आझादांच्या माध्यमातून होऊ शकते. मोदी व आझाद यांचे सलोख्याचे संबंध पाहता हा प्रयोग यशस्वी करण्यात अडचण येणार नसल्याचे बोलले जात आहे.
□ काँग्रेसशी नाते कायमचे तुटण्यामागील कारणे
जम्मू-काश्मीरच्या प्रदेशाध्यक्ष निवडीवरूनही गुलामनबी आझादांचे काँग्रेस अंतर्गत कमालीचे मतभेद झाले. सोनिया गांधींच्या वतीने आझाद यांचे मन वळवण्याचा प्रयत्न फोल ठरला. राष्ट्रीय स्तरावर काँग्रेस मोठी जबाबदारी देत नाहीच, जम्मू-काश्मीरमध्येही पक्षात आपले वर्चस्व राहिलेले नाही, ही भावना आझाद यांचे काँग्रेसशी नाते कायमचे तुटण्यामागील अखेरचे कारण ठरल्याचे सांगितले जात आहे.
राहुल गांधींनी ज्येष्ठ नेत्यांना निर्णयप्रक्रियेतून डावलल्याची टीका आझाद यांनी पत्रात केली आहे. गेल्या दोन वर्षांच्या काळात ज्योतिरादित्य शिंदे, जितीन प्रसाद, आरपीएन सिंह, सुनील जाखड, अश्वनी कुमार, कपिल सिबल यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली. त्यामध्ये इंदिरा गांधींच्या काळापासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या आझादांची भर पडली आहे. आझाद यांच्या राजीनाम्यामुळे बंडखोरांचा ”जी-२३” गट मात्र कमकुवत झाला आहे.