सोलापूर – प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई- केवायसी करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याचे ई-केवायसी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या. योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. त्यासाठी कामकाज पूर्ण करण्यासाठी आवाहन करण्यात आले असून मुदत ३१ ऑगस्ट अखेर असणार आहे. Pradhan Mantri Kisan Samman Yojana: Farmer news for e-KYC till 31st August only
सर्व पात्र शेतकऱ्यांना इ-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमॅट्रिक हे पर्याय उपलब्ध करून देण्यात आले आहेत. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम.किसान ) योजनेंतर्गत पात्र शेतकऱ्यांनी 31 ऑगस्ट 2022 पर्यंत इ-केवायसी पूर्ण केल्याशिवाय ऑगस्ट 2022 नंतरच्या इतर व बाराव्या हप्त्याच्या पुढील हप्ता वितरीत होणार नाही, असे केंद्र शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत.
केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना केली आहे.त्यात,साधारण चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाते. त्यानुसार सगळ्या खातेदारांचे सात बारा खाते आणि बॅक खाते जोडले आहे. मात्र त्यात, अनेकांच्या खात्याचे ई-केवायसी झालेली नाही. सोलापूर जिल्ह्यात ६०,६५१७ खातेदारा पैकी २५७११२ शेतकऱ्यांची ई -केवायसी केलेली नाही.त्यातच आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ई-केवायसी असणे आवश्यक केल्याने यापुढे ती करणे गरजेचे ठरणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
देशात सगळ्या जिल्ह्यांना केंद्र शासनाने तशा सूचना दिल्या आहेत. बहुतांश भागात १५ ऑगस्टला अखेरचा हप्ता जमा झाला आहे. मात्र त्याचवेळी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे इकेवायसी करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. प्रशासकीय यंत्रणेला शंभर टक्के शेतकऱ्यांचे इ-केवायसी करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी शेतकऱ्यांनी इ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.
“केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता शेतकऱ्यांचे ईकेवायसी गरजेचे आहे. शासनाने शंभर टक्के इकेवायसी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावेत”
मिलिंद शंभरकर – जिल्हाधिकारी, सोलापूर
□ विनाविलंब त्वरित ई-केवासी करा
जिल्ह्यातील एकूण 60,6517 लाभार्थीपैकी 257112 लाभार्थ्यांनी e-KYC पूर्ण केलेले नाही. यामध्ये अक्कलकोट- 25616, बार्शी- 24461, करमाळा-23712, माढा- 28949, माळशिरस- 26549, मंगळवेढा- 18892, मोहोळ- 18815, पंढरपूर-34051, सांगोला- 27483, उत्तर सोलापूर-8492 व दक्षिण सोलापूर- 20092 याप्रमाणे एकूण 257112 लाभार्थ्यांचे e-KYC पूर्ण करणे प्रलंबित आहे.योजनेतील प्रलंबित शेतकऱ्यांनी ३१ आँगस्ट पर्यंत विनाविलंब त्वरित ई-केवासी करून घेणे
बाळासाहेब शिंदे – जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, सोलापूर
■ अशी करता येईल ई-केवायसी
ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Comer या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान अपव्दारे ओटीपी लाभार्थ्यांना स्वतः प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर ई प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल. केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर बायोमेट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी निश्चित करण्यात आला आहे.