Monday, January 30, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न थेट विधिमंडळात

Gunthewari purchase and sale issue in Solapur city directly in Legislature

Surajya Digital by Surajya Digital
August 28, 2022
in Hot News, सोलापूर
0
अधिवेशनात तक्रार : महावितरण कार्यालयात नग्न महिलेचे पेपरवेट दाखवून अश्लील चाळे
0
SHARES
104
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

□ सुभाष देशमुख यांची शासनाकडे मागणी : हद्दवाढ विकास समितीच्या मागणीची दखल

 

सोलापूर : शहरातील लाखो नागरिकांची समस्या असलेल्या गुंठेवारीचा जटील प्रश्न सुभाष देशमुख यांनी गुरुवारी विधिमंडळात मांडला. हा प्रश्न सोडवण्यासाठी हदवाढ विकास समितीने वारंवार केलेल्या मागणीची दखल आमदार सुभाष देशमुख यांनी आज रविवारी विधिमंडळात घेतली. Gunthewari purchase and sale issue in Solapur city directly in Legislature Subhash Deshmukh demarcation part

 

सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत असलेल्या हद्दवाढ भागामध्ये गुंठेवारी खरेदी विक्री बंद आहे. परिणामी, लाखो नागरिकांना याचा आर्थिक फटका बसत आहे. अनेकांना अडचणीच्या वेळी आर्थिक तरतूद करण्यास यामुळे अडथळा येत आहे. त्यामुळे सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री त्वरित सुरू करावी, अशी मागणी हद्दवाढ विकास समितीच्या माध्यमातून अध्यक्ष संतोष केंगनाळकर यांनी वारंवार केली आहे. यासाठी एक लाख नागरिकांच्या सह्यादेखील हद्दवाढ विकास समितीतर्फे घेण्यात आल्या आहेत.

सोलापूर शहराचा खूप मोठ्या प्रमाणावर विस्तार होण्यास १९७५ पासून सुरुवात झाली. तेव्हापासून २००१ पर्यंत गुंठेवारी अंतर्गत प्लॉट विक्री खरेदी चालू होती. शासन नियमानुसार २००१ साली गुंठेवारी बांधकाम परवानगी बंद करण्यात आली. यानंतरचे बांधकाम परवाने टप्प्याटप्प्याने मुदतवाढ देऊन देण्यात आलेले असले तरीही २००१ नंतर गुंठेवारी खरेदी विक्री चालू होती, मागील एक वर्षापासून बंदच आहे.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

शहराच्या हद्दवाढ भागात मोठ्या प्रमाणात बांधकाम परवानगी, एन. ए. करून, बँकेचे कर्ज काढून बांधकाम केलेली घरे लाखोंच्या संख्येने आहेत. त्यामुळे पूर्वीपासून मोठ्या प्रमाणात असलेल्या गुंठेवारी वसाहती आता बेकायदेशीर ठरवणे अयोग्य आहे. अनेकांना आर्थिक अडचणीमुळे घराची विक्री करण्याची गरज भासते. मुलांच्या शिक्षणासाठी, लग्न समारंभ, वैद्यकीय अशा अनेक अडचणीच्या वेळी आपले घर, प्लॉटची विक्री करावी लागते. मात्र गेल्या एका वर्षापासून गुंठेवारी बंद असल्यामुळे नागरिकांच्या अडचणी प्रचंड वाढत आहेत. यावर उपाय म्हणून शासनाने त्वरित गुंठेवारी खरेदी विक्री सुरू करणे अत्यंत गरजेचे बनले आहे, असे आ. सुभाष देशमुख म्हणाले.

 

 

सोलापूर शहराच्या चारही बाजूंना असलेल्या हद्दवाढ भागातील जुळे सोलापूर, देगाव, शेळगी, केगाव, सोरेगाव गावठाण, बाळे, रचना सोसायटी, प्रसाद नगर, मीरा नगर, रोहिणी नगर, आर्य चाणक्य नगर, स्वामी विवेकानंद नगर, सुभाष नगर, नीलम नगर, स्वागत नगर, केंगनाळकर नगर, सिद्धेश्वर नगर, म्हेत्रे वस्ती, शिवगंगा नगर, आदर्श नगर, हत्तुरे वस्ती, सुभाष नगर, अनिता नगर अशा अनेक परिसरातील नागरिकांना याचा फटका बसत आहे. या भागात लाखो गोरगरीब नागरिकांचे पुर्वीपासुन वास्तव्य आहे. त्यांनी मोठ्या प्रमाणात गुंठेवारीमध्ये बांधकाम परवाना घेऊन घरे बांधली आहेत. मात्र आता बांधकाम परवानगी मिळत नाही आणि या घरांची विक्रीही होऊ शकत नाही. त्यामुळे या प्रकरणी सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणीही आ. देशमुख यांनी शासनाकडे केली.

□ लवकरच तोडगा निघण्याची आशा

 

सोलापूर शहराच्या चारही बाजूला असलेल्या हद्दवाढ भागातील लाखो नागरिकांचा अत्यंत महत्त्वाचा गुंठेवारी खरेदी विक्रीचा प्रश्न आ.सुभाष देशमुख यांनी विधीमंडळात मांडून या समस्येला वाचा फोडली आहे. या प्रश्नावर शासन स्तरावरून लवकरच तोडगा निघेल, अशी आशा निर्माण झाली आहे.

–  संतोष केंगनाळकर, अध्यक्ष हद्दवाढ विकास समिती, सोलापूर

 

■ एक लाख सह्यांचे निवेदन

 

– सोलापूर शहरातील गुंठेवारी खरेदी विक्री पुन्हा सुरु व्हावी यासाठी हद्दवाढ विकास समितीनं १ लाख सह्यांची मोहीम पुर्ण केली असून त्या सह निवेदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे उद्या सोमवारी मुंबईत देण्यात येणार आहे.

उपनगरात हा प्रश्न मोठा आहे. शासनाचं याकडे लक्ष वेधण्यासाठी सह्यांची मोहिम घेण्यात आली होती. पत्रकार परिषदेस संतोष केंगनाळकर, आनंद बुक्कानुवरे, काशिनाथ भतगुणकी, सुधाकर व्हनमाने, मनोज अलक्कुटे, सचिन चौगुले, विठ्ठल सावळगी उपस्थित होते.

Tags: #Gunthewari #purchase #sale #issue #Solapurcity #directly #Legislature #SubhashDeshmukh #demarcationpart#सोलापूर #शहर #गुंठेवारी #खरेदी #विक्री #प्रश्न #थेट #विधिमंडळ #सुभाषदेशमुख #हद्दवाढभाग
Previous Post

सोलापुरात रेल्वेवर चढून सेल्फी घेताना युवक जखमी, रेल्वे पोलिसांची तत्परता

Next Post

राणी लक्ष्मीबाई मंडईतील 192 ओट्यांचा उद्या होणार लिलाव !

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
गाळ्यांच्या थकीत भाड्यापोटी महापालिकेकडून 173 गाळ्यांवर कारवाई

राणी लक्ष्मीबाई मंडईतील 192 ओट्यांचा उद्या होणार लिलाव !

वार्ता संग्रह

August 2022
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
293031  
« Jul   Sep »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697