सोलापूर – दक्षिण सोलापूर मतदारसंघाचे माजी आमदार दिलीप माने यांनी 1 सप्टेंबरला उपोषण करण्याचा इशारा दिला होता. तर आमदार सुभाष देशमुख यांनी महापालिका आयुक्तांशी पाठपुरावा केला होता. या आजी माजी आमदारामुळे कामाला गती आलीय. त्यामुळे दिलीप माने यांचा उपोषणाचा विचार बदलू शकतो. Dilip Mane’s hunger strike; Subhash Deshmukh followed up with Kami Asara Bridge
सोलापूर शहरातील रहदारीचे रस्ते तातडीने डांबरीकरण करा तसेच सोरेगाव मलनिस्सारण पाणी प्रश्न त्वरीत सोडवा या मागणीसाठी माजी आमदार दिलीपराव माने यांनी 1 सप्टेंबर रोजी महानगरपालिकेसमोर उपोषण करण्याचा इशारा दिला होता. याची दखल घेत महापालिका प्रशासनाने आसरा ते डिमार्ट हा रस्ता रातोरात डांबरीकरण करण्याचे काम सुरु केले.
सोलापूर शहरातील अति रहदारी असलेले आसरा चौक ते डिमार्टपर्यंतचा रस्ता, सात रस्ता ते महावीर चौक पर्यंतचा रस्ता, महावीर चौक ते अशोक चौक मार्केट यार्ड पर्यतचा रस्ता, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते संभाजी महाराज पुतळ्यापर्यतचा रस्ता, सिध्देश्वर प्रशाला ते सिध्देश्वर कन्या प्रशाला हे रस्ते तातडीने डांबरीकरण करुन नागरिक, वाहनधारकाची सोय करण्याची मागणी माजी आमदार दिलीप माने यांनी केली होती.
महापालिका आयुक्तांशी दिलीप माने यांनी चर्चा केली होती. येणा-या 10 दिवसात रस्ता डांबरीकरण कामे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. याशिवाय सोरेगाव येथील मलनिस्सारण पाण्याचा प्रश्न सोडवावा. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासकीय नुकसानभरपाई मिळावी यासाठी देखील चर्चा केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ आ. सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू
सोलापूर : आमदार सुभाष देशमुख यांच्या सूचनेनंतर महापालिकेने आसरा येथील रस्ता डांबरीकरणाचे काम हाती घेतले आहे. काही दिवसांपूर्वी आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता डांबरीकरणासह अनेक मागण्या केल्या होत्या अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने रस्ता डांबरीकरणाचे काम सुरू केले आहे.
आसरा पूल येथील रस्ता खराब झाला होता. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले होते. महापालिकेने हे खड्डे बुडवण्यासाठी मुरूम टाकला होता. मात्र त्यामुळे अधिकच धूळ उडत होती. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले होते. याबाबत अनेक संघटना आणि नागरिकांनी आमदार सुभाष देशमुख यांच्याकडे तक्रार केली होती.
त्यानुसार आमदार देशमुख यांनी महापालिका अधिकाऱ्यांची बैठक घेऊन आसरा पूल येथील रस्ता लवकरात लवकर डांबरीकरण करावा आणि शहरातील इतर रस्त्यावरीलही खड्डे बुजवावेत, अशा सूचना केल्या होत्या. आमदार देशमुख यांनी वारंवार आयुक्तांनाही याबाबत सांगितले होते. अखेर गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आसरा पुलासह शहरातील इतर रस्ते डांबरीकरण करण्यास सुरुवात केली आहे.
□ उड्डाणपुलाचे कामही लवकर सुरू होईल : आमदार देशमुख
आसरा पूल येथे होणारी वाहतुकीची कोंडी लक्षात घेता आमदार देशमुख यांनी येथे उड्डाण पुलाच्या मागणीसाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निधीची मागणी केली. त्यानुसार गडकरी यांनी 28 कोटीचा निधी देत प्रस्ताव पाठवण्यास सांगितले आहे. त्यानुसार महापालिकेने प्रस्ताव पाठवला आहे. लवकरच उड्डाणपुलाचे कामही सुरू होईल असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.