● इंदापूरच्या शिवशंभो दहिहंडी ग्रुपने प्रथम क्रमांक पटकावला
वेळापूर : दहिहंडी महोत्सवाचे मुख्य आकर्षण असलेले सिने अभिनेत्री माधुरी पवार हिने मंगळवारी वेळापुरातील दहीहंडी कार्यक्रमात हजेरी लावली. तिच्या लावणीवर हजारो तरूणाई थिरकली. पारनेरचे आमदार निलेश लंके यांचीही विशेष उपस्थिती होती. Dahihandi Indapur youth danced to the tune of cine artist Madhuri Pawar
वेळापूर (ता. माळशिरस जि. सोलापूर) पालखी मैदानावर मंगळवारी (दि.३०) सायंकाळी उत्तमराव जानकर युथ फाऊंडेशन, बाळासाहेब धाईंजे युवा मंच, सूर्या ग्रुप वेळापूर यांच्या वतीने अयोजित केलेल्या भव्य दहिहंडी महोत्सव सोहळ्यात सिने कलाकार माधुरी पवार हिने ‘चंद्रा’ या लावणीवर नृत्य केले. यावर हजारो तरुणाई या गाण्यावर थिरकली आणि त्यांनी नाचून, शिट्टी वाजवून आनंद व्यक्त केला.
यावेळी उपस्थिती सर्व मान्यवरांचे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर यांच्या हस्ते सन्मान केला. या वेळी दहिहंडी महोत्सवा चे मुख्य आकर्षण असलेले अभिनेत्री माधुरी पवार हिने हजेरी लावून कार्यक्रमात रंगत आणली.
माधुरी पवारसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
हा कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्राभर लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आला. माधुरी पवार तसेच छोटे कलाकार यांनी उत्तम असे नृत्य सादर करुन प्रेक्षकांची मने जिंकली. दहीहांडीर्स्पधेत शिवशंभो दहिहंडी ग्रुप इंदापूर यांनी प्रथम क्रमांकाचे बक्षिस मिळवले.
या कार्यक्रमाला सिनेकलाकार माधुरी पवार, रोहन पाटील, ऋतिका गायकवाड तसेच पारनेर आमदार निलेश लंके, राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते उमेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सदस्य वसंतराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्ह्याचे नेते उत्तमराव जानकर, माजी जि.प. सदस्य बाळासाहेब धाईंजे, पं. स. सदस्य रणजीतसिंह जाधव, अरिफभाई पठाण, राष्ट्रवादीचे नेते विकास धाईंजे, पांडुरंग वाघमोडे, वेळापूर सरपंच विमलताई जानकर, हंसराज माने ,प.स.सदस्य अजय सकट , सामाजीक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष डाॅ. धनंजय साठे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक ता.अध्यक्ष बाबासाहेब माने, उपसरपंच जावेद मुलाणी आदींची उपस्थिती होती.
यावेळेस राजकीय व विविध क्षेत्रातील मान्यवर, माळशिरस तालुका व वेळापूर पंचक्रोशीत नागरिक, युवा वर्ग, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलासराव दोलतडे (माढा ) यांनी केले.