सोलापूर : अनैतिक संबंधातून प्रेयसीच्या पतीचा दोरीने गळा आवळून पाण्याच्या हौदात बुडवून त्याच्या खुनाचा प्रयत्न करणार्या प्रियकरास जिल्हा व सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. Attempted murder of girlfriend’s husband, accused sentenced to life imprisonment
अनैतिक संबंधाची वाच्यता केल्याच्या कारणावरून गोकूळ खांडेकर यांच्या झोपेत असताना गळ्याला दोरी बांधून फरपटत नेऊन पाण्याच्या हौदात बुडवून खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपावरून संतोष सखाराम महानुरे (वय ३४ रा. सिंदखेड ता. अक्कलकोट) याला जन्मठेप आणि ५ हजार रुपये दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्रन्यायाधीश एम.ए भोसले यांनी ठोठावली.
यात गोकुळ मारुती खांडेकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अक्कलकोट उत्तर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी संतोष महानुरे यांचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. पतीस समजल्यानंतर त्यांनी ही बाब त्यांच्या सासर्यांना सांगितली. त्यामुळे संतोष त्याच्यावर चिडून होता. 19 मे 2020 रोजी पती शेळ्या बांधण्याच्या गोठ्याजवळील कट्ट्यावर त्याच्या मुलासह झोपले होते.
संतोष महानुरे हा खांडेकर याचेवर चिडून होता. घटनेच्या रात्री म्हणजे १९ मे २०२० रोजी गोकूळ खांडेकर हे शेळ्या बांधण्याच्या गोठ्याजवळील कट्टयावर त्यांच्या लहान मुलासह झोपले होते. पहाटे ३ वाजेच्या सुमारास आरोपी संतोष महानुरे याने झोपेत असलेल्या खांडेकर त्याच्या गळ्याभोवती दोरी बांधली त्यानंतर फरफटत नेऊन जवळ असलेल्या हौदापर्यंत नेले.
त्यांना हौदातील पाण्यात बुडविले होते. गळ्याभोवती दोरी आवळल्याने त्यांना आरडाओरड करता आले नव्हते. मात्र त्यांच्या जवळ झोपलेला मुलगा समर्थ हा ओरडल्याने गावातील लोक गोळा झाले. त्यांनी गोकूळ यास संतोष महानुरेच्या तावडीतून सोडवून पाण्याच्या हौदातून बाहेर काढले. आणि आरोपी संतोष महानुरे यास गावक-यांनी जागीचा पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले होते.
या संदर्भात गोकूळ खांडेकर यांनी अक्कलकोट उत्तर पोलिसात फिर्याद दिली होती. पोलिसांनी आरोपी विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. तत्कालीन सहायक निरीक्षक देवेंद्र राठोड यांनी गुन्हयाचा तपास करून न्यायालयात दोषारोप सादर केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे ८ साक्षीदार तपासण्यात आले. मूळ फिर्यादी खांडेकर आणि त्यांचा अज्ञान मुलगा समर्थ खांडेकर, डॉ. निखिल क्षीरसागर यांची साक्ष महत्त्वाची ठरली. तसेच सरकारी पक्षाने मांडलेला युक्तिवाद ग्राह्य धरून न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या खटल्यात सरकारतर्फे ॲड. गंगाधर रामपुरे यांनी तर आरोपी तर्फे ॲड. अझमोद्दीन शेख यांनी काम पाहिले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापुरात घरगुती कुंटणखान्यावर छापा; दोन महिलासह चौघांना कोठडी
सोलापूर : होटगी रोडवरील मोहितेनगरच्या भिमा विकास ऑफीसजवळ असलेल्या घरगुती कुंटणखान्यावर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधच्या पोलीसांनी छापा टाकून २ पिडीतांची सुटका केली. या प्रकरणात एका महिलेसह तिघांना अटक करून विजापूर नाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.
अटकेतील आरोपींना न्यायालयाने ३ दिवसाची पोलीस कोठडी सुनावली. मोहितेनगर परिसरात कुंटणखाना चालु असल्याची गोपनीय माहिती पथकाला मिळाली. त्याप्रमाणे ३० ऑगस्ट रोजी दुपारी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षातील पोलीस निरिक्षक विजया कुर्री यांच्या पथकाने सदर ठिकाणी बोगस ग्राहक पाठवून कारवाई केली.
यातील महिला आरोपी रेखा शिवाजी काळे (वय ४५ वर्षे रा. अपना बझारच्या पाठीमागे, विजापूर रोड) आणि दोन एजंट आकाश महादेव सावंत (वय २५) आणि अभिजीत गोपाळ घाडगे (वय २८ दोघे रा. मोहिते नगरचे पाठीमागे, भिमा विकास ऑफीस समोर), घरमालक आरोपी हिराबाई महादेव सावंत (वय ६६ रा.सदर) हे पिडीत दोन महिलांची पिळवणूक करुन त्याना वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याचे निष्पन्न झाले.
सदर आरोपीविरुध्द विजापूर नाका पोलीसात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पूढील तपास निरिक्षक विजया कुर्री या करीत आहेत.