सांगोला : समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन हयातभर समाजसेवा करणाऱ्या आणि दिन-दलित, भटक्या, विमुक्त, उपेक्षित व वंचितांची माता म्हणून ओळखल्या जाणाऱ्या ह. भ. प. शारदादेवी साळुंखे पाटील यांची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. वयाच्या ८३ व्या वर्षी सांगोल्यात रात्रीच्या सुमारास त्यांचे निधन झाले. Former MLA Deepakaba, former G.P. Condolences to President Jaimalatai Sangola Salunkhe-Patil
उद्या रविवारी (दि. ४ ) सकाळी ९ ते ११ दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी जवळा येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर ठेवण्यात येणार आहे. तर सकाळी ११ ला अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे. दुपारी १.०० वाजता त्यांच्या पार्थिवावर जवळा येथील शेतात अंत्यसंस्कार केले जाणार असल्याची माहिती नातेवाईकांनी दिली.
सांगोला तालुक्याच्या राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक जडणघडणीत ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांचा सिंहाचा वाटा होता. पती स्वर्गीय आमदार काकासाहेब साळुंखे पाटील व मुलगा माजी आमदार दिपकआबा साळुंखे – पाटील यांच्या रूपाने शारदादेवी साळुंखे पाटील यांनी सांगोला तालुक्याला दोन आमदार व कन्या जयमालाताई गायकवाड यांच्या रूपाने जिल्हा परिषद अध्यक्षपद दिले.
त्यांच्या पश्चात पुत्र दिपकआबा व डॉ. प्रदीपदादा ही दोन मुले व जयमाला गायकवाड व चारुशीला काटकर अशा दोन मुली तर सौ. रुपमती दिपक साळुंखे व सौ. मधुमती प्रदीप साळुंखे या दोन सुना तर डॉ. पियुष साळुंखे, यशराजे साळुंखे, प्रियांका साळुंखे- देशमुख, मुक्ता साळुंखे-गायकवाड, कु. कृष्णाई साळुंखे, डॉ.निलेश काटकर, आरती काटकर-घाडगे, विक्रम गायकवाड, नेहा गायकवाड-आमरे आदी नातवंडे असा परिवार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महिनाभरापासून सांगोला येथील स्पंदन हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू होते. तब्बल महिनाभर तज्ञ डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही वाढत्या वयामुळे ह.भ.प. शारदादेवी साळुंखे पाटील यांच्या शरीराने उपचारास साथ न दिल्याने अखेर आज शनिवारी रात्री निधन झाले.
□ गौरी आल्या पण सांगोला तालुक्याची लक्ष्मी गेली..!
आज सर्वत्र घरोघरी गौरीचे आगमन करण्याची तयारी सुरू असतानाच मध्यरात्री अचानक शारदादेवी तथा काकींचे निधन झाले. त्यामुळे राज्यभर घरोघरी गौरी आल्या असल्या तरी सांगोला तालुक्याची खरी लक्ष्मी अर्थात शारदादेवी साळुंखे पाटील आज तालुक्याला कायमची सोडून गेली असल्याने या सणावर शहर आणि तालुक्यात दुःखाचे सावट आहे.
आमदारांची विधवा पत्नी म्हणून काकींना पेन्शन आणि त्यातील फरक असे लाखो रुपये मिळाले होते. सामाजिक जाण आणि भान असणाऱ्या काकींनी या पैशातील एकही रुपया स्वतः साठी किंवा कुटुंबासाठी खर्च न करता या पैशातून आपल्या शेतात काम करणाऱ्या निराधार आणि गरीब महिलांना सोन्याचे दागिने घेऊन ते भेट दिले.
यातून जी रक्कम शिल्लक राहिली होती त्यातून जवळा गावातील सर्व वयोवृद्ध आणि गरीब महिलांना स्वतःच्या खर्चातून तीर्थयात्रा घडवून आणली होती. काकींच्या निधनामुळे त्यांच्या अशा अनेक आठवणी त्यांनी मदत केलेल्या महिलामधून जागवल्या जात आहेत.