सोलापूर : सोलापूरहून पुण्याच्या दिशेने जाणारी मालगाडी करमाळा तालुक्यातील केम जवळ रुळावरून घसरली. रात्री 3 वाजून 40 मिनिटांनी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली. In Karmala, a goods train derailed directly into a farm
सिमेंट घेऊन जाणाऱ्या या मालवाहतूक गाडीचे समोरील दोन इंजिन आणि दोन डबे रुळावरून खाली घसरले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. मात्र पहाटेच्या सुमारास मुंबईहून कर्नाटकच्या दिशेने दिशेने जाणाऱ्या गाड्या सोलापूरला काही वेळ उशिरा पोहोचल्या.
दरम्यान ‘घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घरलेली मालगाडी ही लूप रूळवर होती. तयामुळे अधिक वेळ वाहतूक बंद नव्हती. सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे कारण चौकशीनंतर समोर येईल.’ अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.अपघातग्रस्त रेल्वेतील सामान, रेल्वेरुळावरुन घसरलेले डबे आणि इतर यंत्रणा पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरु आहेत
या घटनेची माहिती मिळताच रेल्वेच्या आपत्कालीन व्यवस्थेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घसरलेली मालगाडी बाजूला करून दिल्याने सकाळी 6 वाजून 40 मिनिटांनी या मार्गावरील रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत झाली. मात्र मालगाडी रुळावरून घसरण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. चौकशीनंतर या अपघाताचे कारण समोर येईल.’ अशी माहिती रेल्वे प्रशासनातर्फे देण्यात आली.