पुणे : पुण्यातील फूटपाथवरील मुलांसाठी तृतीयपंथीयाने रस्त्यावरच शाळा सुरु केली आहे. याचे नाव अमित मोहिते आहे. तो गेल्या 1 वर्षापासून या मुलांना शिकवत आहे. अमित हा पुण्यातील मालधक्का चौक आणि स्वारगेट अशा विविध भागातील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांची शाळा भरवतो. त्याने यासाठी सावली फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे. दिवसातून 2 तास वेळ काढून अमित या मुलांना शिकवतो. For the students on the footpath, the third party started a school education capital on the street
शिक्षणाची राजधानी म्हणून ओळख असलेल्या पुणे शहरात आजही अनेक असे विद्यार्थी आहेत जे शिक्षणापासून वंचित आहेत. त्यामध्ये मुख्यत्वे फुटपाथवर राहणाऱ्या मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न अधिक गंभीर आहे. अशाच मुलांसाठी पुण्यातील तृतीयपंथी तरुण अमित मोहिते याने पुढाकार घेतलाय.
शिक्षणाचे माहेरघर म्हणून पुण्याची ओळख आहे. पुणे शहरात अनेक शैक्षणिक संस्था असून देशभरातील तसेच जगभरातून अनेक विद्यार्थी हे पुणे शहरात शिक्षणासाठी येत असतात. त्यात हा उपक्रम सुखद करणारा आहे.
गेल्या 1 वर्षापासून अमित ह्या मुलांना शिकवत आहे. तृतीयपंथी अमित मोहिते हा पुण्यातील मालधक्का चौक आणि स्वारगेट अशा विविध भागातील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांची शाळा भरवतो. गेल्या 1 वर्षापासून अमित याचा हा उपक्रम सुरू आहे. या शाळेत अमित विद्यार्थ्यांना सन्मानानं जगण्याचे धडे देत आहे. त्याने यासाठी सावली फाउंडेशन संस्थेची स्थापना केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या संस्थेच्या अंतर्गत अमित फुटपाथवरील मुलांसाठी शाळा भरवतो. तसेच दिव्यांग व्यक्ती तृतीयपंथीय अथवा ट्रान्सजेंडर लोकांसाठी देखील या संस्थेद्वारे तृतीयपंथी अमित मोहिते काम करत आहे.
अमित मोहिते सांगतो की, एकदा विमान नगर परिसरामध्ये फिरत असताना रस्त्यावर कॅरीबॅग विकणाऱ्या मुलांना पाहिले आणि मनात विचार आला की या चिमुकल्या हातांना आता काम करण्याची खरच गरज आहे का? त्यांचं खरं तर वय शिक्षणाचे आहे आणि अशा वेळेस त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे आणि इथूनच आपल्या विचारांना दिशा देण्यास सुरुवात केली.
यातून पुढे पुणे स्टेशन आणि स्वारगेट येथील फुटपाथवर राहणाऱ्या मुलांसाठी शिकवायला सुरुवात केली. अमित हा सध्याला 50 ते 60 मुलांना शिकवत आहे. आतापर्यंत शाळाबाह्य 15 मुलांचे ऍडमिशन देखील विविध शाळांमध्ये त्याने करून दिले आहे. दिवसातून 2 तास एवढा वेळ अमित या मुलांना शिकवण्यासाठी देतो त्यासोबत तो आपला जॉब देखील करतो.
ही फुटपाथ वरील शाळा सोमवार ते शुक्रवार दररोज सकाळी 11 ते 12 :30 वाजेपर्यंत चालते. शहरात दोन ठिकाणी अमित हा सध्या शाळा घेत आहे. मालधक्का चौक, स्वारगेट येथे ही शाळा सुरू असते. अधिक माहितीसाठी या मोबाईल +91 77760 64777 क्रमांकावर संपर्क साधू शकता, असे आवाहन केले आहे.