मुंबई : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत. Now in Maharashtra Chief Minister’s Kisan Yojana, farmers will get 12 thousand rupees Shinde Govt
महाराष्ट्राच्या शिंदे-फडणवीस सरकारने राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने राज्यातही ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. शिंदे सरकारने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर ‘मुख्यमंत्री किसान योजना’ लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार राज्यातील शेतकऱ्यांना वर्षाला 6 हजार रुपये मदत दिली जाणार आहे. येत्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी तरतूद केली जाणार आहे. दरम्यान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेत पात्र शेतकऱ्यांना 6 हजार रुपये दिले जातात. त्यामुळे आता शेतकऱ्यांना वर्षाला 12 हजार रुपये मिळणार आहेत.
पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेंतर्गत शेतकऱ्याच्या खात्यात वर्षातून तीनदा 2000 रुपये जमा केले जातात. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार येवढी रक्कम अनुदान दिलं जाणार आहे. कृषी विभागासोबत झालेल्या बैठकीत या योजने बाबतचा निर्णय घेण्यात आला आहे. येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात याबाबतची तरतूद केली जाणार असल्याची माहिती दिली जात आहे.
मुख्यमंत्री किसान योजनेअंतर्गत प्रत्येक वर्षी पात्र असलेल्या शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. आता सध्या देशपातळीवर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना राबवली जात आहे. त्याच योजनेच्या धर्तीवर आता राज्यात देखील मुख्यमंत्री किसान सम्मान निधी योजना राबवण्यात येणार आहे. यानुसार प्रत्येक महिन्यात टप्प्या टप्प्यानं शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम दिली जाणार आहे. प्रत्येक वर्षी पात्र शेतकऱ्यांना ६ हजार रुपयांचा लाभ या योजनेतून मिळणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
कृषी विभागाच्या झालेल्या बैठकीत याबाबचा निर्णय घेण्यात आला असला तरी अर्थसंकल्पात योजनासाठी नेमकी किती रुपयांची तरतूद केली जाणार याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. परंतु सरकार लवकरच याबाबतची घोषणा करण्याची शक्यता आहे. तसंच या योजनेसाठी कोणते शेतकरी पात्र ठरतील याचे निकषही अजून समोर आलेले नाहीत. मात्र, मागील तीन दिवसांपूर्वी झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.
लवकरच मुख्यमंत्री किसान योजना लागू करण्याची घोषणा होऊ शकते, येत्या आर्थिक वर्षात अर्थसंकल्पात या बेटासाठी स्वतंत्र निधीची तरतूद करण्यात येणार आहे. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना वार्षिक 6 हजार रुपये दिले जाणार आहेत. तथापि, हे कसे दिले जाईल याबद्दल अधिक माहिती मिळालेली नाही. याबाबत राज्य सरकार लवकरच निर्णय घेणार आहे.
या योजनेसाठी बजेटमध्ये किती निधीची तरतूद करण्यात येणार आहे, याची माहिती अद्याप उपलब्ध झालेली नाही. मात्र, शिंदे सरकार लवकरच शेतकऱ्यांसाठी ही खुशखबर जाहीर करू शकते. राज्यातील कोणते शेतकरी या योजनेसाठी पात्र ठरतील याचीही सध्या माहिती नाही. मात्र नुकत्याच झालेल्या कृषी विभागाच्या बैठकीत यावर चर्चा झाली आहे.
सध्या राज्यात राज्य सरकार ने राज्यातील शेतकरी वर्गाच्या हितासाठी नवीन योजना आणत आहेत. या योजनेचे नाव हे मुख्यमंत्री किसान योजना असे असेल असे सुद्धा सांगितले आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र शेतकरी वर्गाला वार्षिक 12 हजार रुपयांची मदत मिळू शकते. तसेच ही योजना लवकरात लवकर लागू करण्यात येईल असे आवाहन राज्याचे मुख्यमंत्री यांनी दिले आहे शिवाय या योजनेची तरतूद लवकरच राज्याच्या वार्षिक आर्थिक बजेट मध्ये तरतूद करण्यात येईल.