□ वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन
मुंबई : महाराष्ट्रातील वेदांताचा प्रकल्प गुजरातला गेल्यामुळे राज्यात राजकारण चांगलेच तापले होते. पण आता महाराष्ट्रात वेदांताच्या गुजरातला गेलेल्या प्रकल्पापेक्षा मोठा प्रकल्प आणणार असल्याची माहिती वेदांताचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी दिली आहे. गुजरातचा प्रकल्प हा एकूण 1.54 लाख कोटी रुपये गुंतवणुकीचा आहे. त्यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्रात आणणार असल्याचे अग्रवाल म्हणाले. Will bring a bigger project to Maharashtra than Gujarat – Vedanta President Anil Agarwal Eknath Shinde Narendra Modi phone
वेदांत रिसोर्सेस लिमिटेडचे अध्यक्ष अनिल अग्रवाल गुजरातमधील एका कार्यक्रमात म्हणाले, गुजरातमध्ये वेदांत आणि फॉक्सकॉन ग्रुपचे संयुक्त सेमीकंडक्टर युनिट स्थापन केले जाणार आहे हे जाहीर करताना आनंद होत आहे. या प्लांटच्या स्थापनेमुळे भारताची प्रतिमा सेमीकंडक्टर चिप टेकर ते चिप मेकर अशी बदलेल. या प्लांटमधून थेट एक लाख कुशल रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. गुजरातमध्ये निर्माण होणाऱ्या या नवीन इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन केंद्राचा फायदा देशातील सर्व राज्यांना होणार आहे.
वेदांत समूहाचे अध्यक्ष अनिल अग्रवाल यांनी मंगळवारी याबाबत ट्विट करून ही माहिती दिली. देशात आत्मनिर्भर सिलिकॉन व्हॅली सत्यात उतरणार आहे. या प्रकल्पामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदींचे स्वप्न पूर्ण होणार असून यामुळे आपली इलेक्ट्रॉनिक्स आयात कमी होईल. या प्रकल्पातून एक लाख रोजगार निर्मिती होणार आहे, असं अनिल अग्रवाल यांनी म्हटलं आहे.
उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील सदर प्रकरणावर एक महत्वाची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात फोनवरुन चर्चा झाली. यावेळी वेदांता-फॉक्सकॉनच्या तोडीचा किंवा यापेक्षा मोठा प्रकल्प महाराष्ट्राला दिला जाईल, असं आश्वासन नरेंद्र मोदी यांनी एकनाथ शिंदे यांना दिलं. तसेच महाराष्ट्रातील बेरोजगारीचा प्रश्न सोडवण्यासाठी केंद्र सरकार एकनाथ शिंदेंच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असं नरेंद्र मोदींनी फोनवर म्हटल्याची माहिती उदय सामंत यांनी दिली.
□ वेदांता व फॉक्सकॉन प्रकल्प गुजरातला, मुख्यमंत्र्यांचा पंतप्रधानांना फोन
वेदांता व फॉक्सकॉन या कंपनीचा प्रकल्प गुजरातला गेला आहे. यामुळे 1.54 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक व 1.5 लाख नोकऱ्या महाराष्ट्राने गमावल्या. यावरुन शिंदे फडणवीस सरकारवर टीका होत आहे. या विषयाला गांभीर्याने घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना काल रात्री फोन केला. त्यांच्याशी ‘वेदांता’ व फॉक्सकॉन प्रकल्पाविषयी चर्चा केली. केंद्राने हस्तक्षेप करावा, अशी विनंती त्यांनी केली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
महाराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा, अशी विनंती केली आहे. महाराष्ट्राच्या वाटेचा वेदांता-फॉक्सकॉन गुजरातच्या वाटेवर गेल्यानंतर शिंदे मोदींसोबत चर्चा केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणावर केंद्रातून सूत्र हालवली जाणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. संबंधित प्रकल्पावरून मोदी आणि शिंदेंमध्ये सुमारे अर्धातास चर्चा झाल्याचेही सांगितले जात आहे. यादरम्यान, शिंदेंनी महराष्ट्राला उद्योग-प्रकल्प आणि गुंतवणुकीबाबत सहकार्य करा, अशी विनंती मोदींकडे केली असल्याची चर्चा आहे.
रेल्वेमंत्री, केंद्रीय उद्योगमंत्री यांच्याशी चर्चा करण्यात आली. राज्यात नवीन उद्योग, प्रकल्प आणण्यासाठी पूर्ण क्षमता आहे आणि सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचा प्रयत्न करू, राज्यात नवीन उद्योग येण्यासाठी केंद्राचे सहकार्य आवश्यक आहे. यासंदर्भात केंद्रातील नेत्यांची भेटही घेणार आहे. राज्यात नवीन प्रकल्प आणण्याबाबत आमचे सरकार नक्कीच प्रयत्न करेल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिले.
□ वेदांताचा प्रोजेक्ट गुजरातला का गेला? उद्योगमंत्री उदय सामंतांचे स्पष्टीकरण
* कंपनीने प्रोजेक्ट स्थापन करण्यासाठी 4 राज्याची निवड केली होती. पण त्यांचे प्राधान्य महाराष्ट्राला होते.
* कंपनीला पाणी, इलेक्ट्रिसिटीमध्ये सवलत हवी होती. त्यासाठी तत्कालीन ठाकरे सरकारने पॅकेज जाहीर केले नाही. ते शिंदे सरकारच्या काळात जाहीर करण्यात आले.
* ठाकरे सरकारने नुसत्या कंपनीतील अधिकाऱ्यांच्या बैठका घेतल्या पण निर्णय घेतले नाहीत.
* महाराष्ट्रात ‘वेदांतापेक्षा मोठा प्रकल्प येणार.