पुणे : लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकर यांचे वृध्दापकाळाने निधन झाले आहे. त्या 90 वर्षाच्या होत्या. पुण्यातील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांना लावणीची आवड लागली होती. Death of Lavani empress Gulabbai Sangamnerkar Tradition of Shastrokt empress
लावणी सम्राज्ञी गुलाबबाई संगमनेरकरांनी लावणीला कथ्थकची जोड दिली. दरम्यान, महाराष्ट्र सरकारने त्यांना ‘तमाशासम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर’ यांच्या नावाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सम्मानित केले होते.
सुप्रसिद्ध संगीतकार विठ्ठल शिंदे यांच्या संगीत दिग्दर्शनात गुलाबबाई संगमनेरकर यांनी गायलेल्या अनेक लावण्या त्याकाळी आकाशवाणीवरील कामगार सभेत प्रसारित व्हायच्या. त्यांचा दोन वर्षांपूर्वी महाराष्ट्र शासनाच्या ‘विठाबाई नारायणगावकर’ या जीवनगौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला होता.
लावणी क्षेत्रातील उत्तुंग व्यक्तिमत्व, महाराष्ट्र शासनाच्या विठाबाई नारायणगाकर जीवनगौरव पुरस्कार विजेत्या व आपली जन्मभूमी संगमनेरचे नावं आयुष्यभर अभिमानाने मिरवणारी ज्येष्ठ कलावंती ‘गुलाबमावशी संगमनेरकर’ अशी गुलाबबाई संगमनेरकर यांची ओळख आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गुलाबबाई संगमनेरकर या महाराष्ट्रातील लोकप्रिय कलावंत आहे. बैठकीच्या लावणीसाठी गुलाबबाई संगमनेरकर ओळखल्या जायच्या. गुलाबबाई संगमनेरकर यांना आयुष्यभर अनेक पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. तसेच ‘रज्जो’ या सिनेमातदेखील त्यांनी काम केलं आहे. गुलाबबाई यांनी फडाच्या तमाशातही काम केलं आहे.
गुलाबबाई संगमनेरकर यांच्या अनेक कला ठासून भरलेल्या होत्या. त्या सर्वगुणीसंपन्न कलाकार होत्या. गुलाबबाई संगमनेरकर यांचे निधन झाले असले तरी त्यांनी लावणीचा अमूल्य ठेवा पुढील पिढ्यांसाठी मागे ठेवला आहे.
□ लतादीदींची होती इच्छा
भारतरत्न लता मंगेशकर यांनी गायलेल्या अतिशय मोजक्या लावण्यांपैकी ‘राजसा जवळी जरा बसा’ या लावणीवर गुलाब बाई संगमनेर यांनी अदाकारी करावी अशी इच्छा खुद्द लता दीदींनी व्यक्त केली होती. गुलाबबाईंनीही लतादीदींचा शब्द प्रमाण मानून या लावणीवर तितकीच दर्जेदार अदाकारी केली होती.
लावणी परंपरेतल्या गुलाब संगमनेरकर एक वटवृक्ष होत्या. वयाच्या सातव्या वर्षापासून त्यांच्या घरात लावणी परंपरा असल्या कारणाने त्यांना लहानपणापासूनच लावणीची गोडी लागली. गुलाबबाईंनी लालबागच्या हनुमान थिएटरमध्ये काही दिवस लावणीची सेवा केली. त्यानंतर ढोलकी फडाच्या तमाशातून अनेक कार्यक्रम केले.
संगीतबारी हा त्यांच्या परंपरेचा प्राकृतिक पिंड, परंतु जेव्हा तमाशा बंद असेल तेव्हा त्या संगीतबारी करायच्या. नंतर गुलाबबाईंनी लावणीला एक वेगळी प्रतिष्ठा निर्माण करुन दिली. लावणीला त्यांनी कथ्थकची जोड दिली. शास्त्रोक्त लावणी त्यांनी केली.