सोलापूर /अजित उंब्रजकर
नुकतेच सोलापूर जिल्हा भाजप अध्यक्षपदी आमदार सचिन कल्याशेट्टी यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड करताना भाजपने एक प्रकारे सर्वांना धक्का दिला आहे. जिल्ह्यातील धैर्यशील मोहिते पाटील, शहाजी पवार, संतोष पाटील यांच्यासह अनेक जण इच्छुक असतानाही भाजपने युवा नेता म्हणून सचिन कल्याणशेट्टी यांना संधी दिली आहे. त्यामुळे भाजपचे धक्का तंत्र अद्यापही सुरू असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपद देतानाही भाजप असा धक्का देणार का याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे. Will BJP adopt shock tactics even after giving ministerial post? Who is the minister, who is the guardian minister
भाजप आणि शिंदे सेना सरकार आल्यापासून भाजपचे धक्का तंत्र सुरूच आहे. सुरुवातीला भाजपने देवेंद्र फडणवीस यांना अचानक उपमुख्यमंत्रीपदी नेमले हा एक प्रकारे सर्वांना धक्काच बसला होता. त्यानंतर विधानसभेच्या अध्यक्षपदीही राहुल नार्वेकर यांची निवड करून भाजपने एक प्रकारे धक्का हे धक्का दिला आहे.
याशिवाय मंत्रिमंडळ विस्तारात चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार यांच्यासारख्या वरिष्ठ नेत्यांना खाते देतानाही धक्का तंत्राचा अवलंब केला. गेल्या मंत्रिमंडळात चंद्रकांत दादांनी यांच्याकडे दोन नंबरचे महसूल खाते होते. आता त्यांना शिक्षण खाते देण्यात आले आहे तर मुनगंटीवार यांच्याकडे महत्त्वाचे अर्थ खाते होते आता त्यांच्याकडे वन विभागाचा कार्यभार दिला आहे. हा भाजपने दिलेला एक प्रकारे
धक्काच आहे.
अशीच परिस्थिती सोलापूर जिल्ह्यातही झाली आहे. श्रीकांत देशमुख यांच्या प्रकारानंतर सोलापूर जिल्ह्याचा अध्यक्ष कोण होणार याची चर्चा सुमारे महिनाभर चालली होती. यामध्ये धैर्यशील मोहिते पाटील, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, संतोष पाटील, माऊली हळणवरकर यांच्यासह अनेकांची नावे पुढे येत होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र अक्कलकोटचे युवा आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत भाजपने एक प्रकारे सर्वांना धक्का दिला आहे. वास्तविक पाहता सध्या भाजपमध्ये अनेक नेते प्रवेश करत आहेत. सध्या जिल्ह्यात भाजपचे तब्बल आठ आमदार आहेत तर दोन खासदार आहेत.
या सर्वांमध्ये सचिन कल्याणशेट्टी वयाने आणि अनुभवाने ही कमी आहेत. तरीही त्यांची जिल्हाध्यक्षपदी निवड करत भाजपने सर्वांना आश्चर्यचकित केले आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारामध्येही भाजप असाच धक्का देणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
□ कोण मंत्री ? कोण पालकमंत्री
सध्या सोलापूर जिल्ह्यातून मंत्री पदासाठी आमदार सुभाष देशमुख, आमदार विजयकुमार देशमुख, आमदार रणजितसिंह मोहिते पाटील या तिघांची नावे प्रामुख्याने पुढे येत आहेत. मात्र भाजपचे धक्का तंत्र पाहता अचानकपणे आमदार राम सातपुते अथवा आमदार राजेंद्र राऊत यांचेही नाव पुढे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात मंत्रीपद किती मिळणार आणि कोणाला मिळणार आणि पालकमंत्री कोण होणार याची चर्चा आता जिल्ह्यात सुरू झाली आहे.