□ १४ दिवसात बिल आदा करणे बंधनकारक
□ विलंब झाल्यास व्याजासह एफआरपी देण्याची तरतूद ; मात्र कोण दाखल करणार गुन्हा
सोलापूर – चालू वर्षीचा गळीत हंगाम उंबरठ्यावर आला असून जिल्ह्यात बहुतांश साखर कारखान्याने धुराडे पेटविण्यासाठी सज्ज झाले असले तरी गेल्या हंगामातील ३१ आँगस्टपर्यंत २०३ कोटी रूपये थकित असून एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना न देण्याची मागणी ऊस उत्पादक शेतकऱ्यांतून होत आहे. Sugar mills ready to set fire to Dhurade, but Solapur owes 203 crores of previous FRP
ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता व गेल्यावर्षी ऊस गाळपास उशीर झाल्यांने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते.याचा विचार करता १ आँक्टोबर पासून गाळप हंगाम सुरु होणार असल्याचे सहकार मंत्र्यांनी सांगितले आहे. मात्र जिल्ह्यातील साखर कारखानदार थकित एफआरपी दिवाळी पुर्वी दिली जाईल असे सांगत आहेत.
मात्र यंदा दिवाळी २० आँक्टोबर नंतर आहे.तत्पूर्वी तीन आठवडे आदीच गाळप हंगाम सुरू होत आहे. तर एफआरपी दिल्याशिवाय गाळप परवाना दिला जाणार नाही असे साखर आयुक्तांचे धोरण आहे.त्यामुळे १ आँक्टोबरला साखर कारखाना सुरू करायचा झाल्यास त्या अगोदर थकित एफआरपी द्यावी लागणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
गतवर्षीच्या गाळप हंगामात जिल्ह्यातील ३४ साखर कारखान्यांनी ऊस गाळप केला. आता यंदाचा हंगाम तोंडावर असतानाही त्यापैकी १८ कारखान्यांनी अद्यापही शेतकऱ्यांची पूर्णपणे एफआरपी दिलेली नाही. या कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे २०३ कोटी रुपयांची एफआरपी थकविली आहे.
जिल्ह्यात जवळपास ३६ साखर कारखाने आहेत. गतवर्षी त्यापैकी ३४ साखर कारखान्यांनी प्रत्यक्ष गाळप केले. हा गाळप हंगाम पूर्ण होऊन आता तीन महिने झाले आहेत. तरीही शेतकऱ्यांना पूर्णपणे पैसे मिळालेले नाहीत. कायद्यानुसार गाळपानंतर १४ दिवसांच्या आत पूर्णपणे एफआरपी देणे कारखान्यांना बंधनकारक आहे. पण कारखान्यांनी हा कायदा पायदळी तुडवला आहे. अनेक कारखान्यांनी तरी दिलेले पैसेही तुकड्या – तुकड्यांनी दिले आहेत. तसेच विलंबाने मिळणारी एफआरपी कारखान्यांनी व्याजासह द्यावी, अशी तरतूद कायद्यात आहे. पण त्याचेही पालन होत नाही. प्रशासनही यावर गप्पच आहे. पण शेतकरी मात्र कारखान्यांकडे हेलपाटे मारत आहेत.
□ अर्धवट एफआरपी दिलेले कारखाने
गतवर्षीच्या एफआरपीची रक्कम अर्धवट दिलेल्या कारखान्यात ३१ ऑगस्टच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील पांडुरंग (माळशिरस), श्री सिद्धेश्वर (सोलापूर), संत दामाजी (मंगळवेढा), श्री विठ्ठलराव शिंदे (माढा), मकाई (करमाळा), संत कुर्मदास (माढा), दी सासवड माळी शुगर (माळशिरस), विठ्ठल कॅार्पोरेशन (माढा), इंद्रेश्वर शुगर (बार्शी), युटोपियन शुगर (मंगळवेढा), सहकार शिरोमणी (पंढरपूर), मातोश्री शुगर (अक्कलकोट), भीमा शुगर (मोहोळ), धाराशिव युनिट चार (सांगोला) आणि शंकर साखर कारखाना (माळशिरस) या प्रमुख कारखान्यांसह १८ कारखान्यांचा समावेश आहे.