नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 17 सप्टेंबरला वाढदिवस आहे. यानिमित्त देशात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. अशातच भारतीय जनता पक्षाकडून तामिळनाडूमध्ये नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे. PM Narendra Modi’s Birthday – He will get a gold ring Chennai RSS
17 सप्टेंबर रोजी नरेंद्र मोदी यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने भाजपकडून वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. चेन्नईतील आरएसएस रुग्णालयात जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. शिवाय 720 किलोग्रॅम मासळी वाटली जाणार आहे.
17 सप्टेंबरपासून 2 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत सेवा पंधरवडा म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पक्षाकडून तामिळनाडूमध्ये नवजात बालकांना सोन्याची अंगठी भेट देण्यात येणार आहे. याबरोबरच पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेमार्फत 720 किलो मासळी वाटप केली जाणार आहे.
केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी सांगितले की, भाजपकडून चेन्नईतील आरएसएस रुग्णालयाची निवड केली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
या रुग्णालयात 17 सप्टेंबर रोजी जन्मला येणाऱ्या नवजात बालकांना 2 ग्रॅम सोन्याची अंगठी दिली जाणार आहे. त्या प्रत्येक अंगठीची किंमत 5 हजार रुपये असणार आहे. नवजात बालकांना सोन्याची अंगठी वाटप केले जाण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 72 व्या वाढदिवसानिमित्त 720 किलोग्रॅम मासळी वाटली जाणार आहे.
यावेळी मंत्री मुरुगन यांनी सांगितले की, मुख्यमंत्री एम. के स्टालिन यांच्या विधानसभेच्या कार्यक्षेत्रात पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेतर्फे मासळी वाटली जाणार असून नागरिकांना मासे खाण्यासाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या या वाढदिवसानिमित्त भाजपकडून विविध कार्यक्रम राबवले जाणार असल्याचे वरिष्ठ नेत्यांनी सांगितले आहे.
□ महाराष्ट्रात आरोग्य शिबिर
या वाढदिवसाचं औचित्य साधून मुंबई भारतीय जनता पार्टीच्या खासदार, आमदार, नगरसेवक पदाधिकाऱ्यांच्या वतीने मुंबई शहर आणि उपनगरात ४१५ मोफत आरोग्य शिबिराचे शनिवारी आयोजन करण्यात आले आहे.
तरी नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा मोठ्या प्रमाणात लाभ घ्यावा, असे आवाहन मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी केलं आहे.
यानिमित्ताने १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत बूथ स्तरावर जाऊन ‘सेवा पंधरवडा’ अंतर्गत विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून १७ सप्टेंबर या दिवसापासून उत्सवाला सुरुवात होणार असून २ ऑक्टोबरला राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी सांगता होणार आहे.