अक्कलकोट : तडवळ (ता.अक्कलकोट) येथील इंडियन ऑईल श्री मल्लिकार्जुन पेट्रोलपंपावर आठ आरोपीनी पाचशे रूपयाची नोट का चालत नाही या कारणावरून पंपचालकास शिवीगाळ व मारहाण केली व गावठी कट्यातुन गोळीबार करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला. यात परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत.
ही घटना बुधवारी (ता.१४ सप्टेंबर रोजी दुपारी सव्वातीन वाजणेच्या सुमारास घडली. पेट्रोल भरण्यास पंपावर गेल्यावर नोट चालत नाही या कारणावरून मारहाण झाल्याची परस्पर विरोधी फिर्याद ग्राहकाने दाखल केली. दक्षिण पोलीस स्टेशन मध्ये काल गुरूवारी परस्पर विरोधी गुन्हा दाखल झाला. पेट्रोल पंप चालक व्हणप्पा अप्पाशा याबाजी (वय ४६ वर्षे रा. तडवळ ) यांनी फिर्याद दिली. ग्राहक आकाश सुभाष अरवत (वय १८ वर्ष, रा. कोर्सेगांव) यांनीही परस्पर विरोधी फिर्याद दिली.
संशयित आरोपी आकाश सुभाष अरवत, सुभाष षडाक्षरी अरवत, महादेव मलप्पा चराटे, चिदानंद राजशेखर बिराजदार, व्हणप्पा श्रीशैल कोळी, शिवानंद राजशेखर बिराजदार, अनिल नागप्पा बिराजदार, सुधिर रमेश पाटील (रा.मुढेवाडी ) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नांवे आहेत.
दुपारी सव्वातीन वाजणेच्या सुमारास पेट्रोलपंपावरील कामगार मोहसीन मकानदार यांनी चालकाला कोर्सेगांव येथील आकाश अरवत हा फाटक्या पाचशे रूपयाच्या नोटेवरून भांडण झाले. नोट पाहून चालत नाही बदलुन द्या असे पंप चालकाने सांगितले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
पाचशे नोट का चालत नाही, सगळ्या पंपावर ही नोट चालते तुमच्या पंपावर नोट का चालत नाही असे म्हणून वाद झाला. पुढे आकाश अरवत यांनी हाताने कानावर, अंगावर व पोटात बुक्की मारून फिर्यादीचे अंगावरील शर्ट फाढून, तुमचा पंप जाळतो, तुम्ही पंप कस चालवतो ते बघतो, असे धमकावत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
हातावर मारले व तसेच माझे वडील सुभाष अरवत यास नागप्पा याबाजी , सिद्धवीर याबाजी या सर्वांनी मला व माझ्या नातेवाईक महादेव मलप्पा चरोटे, चिदानंद राजशेखर बिराजदार, व्हणप्पा श्रीशैल कोळी, शिवानंद राजशेखर बिराजदार, अनिल नागपा बिराजदार सुधीर पाटील यांना हाताने लाथाबुक्याने मारहाण करून शिवीगाळ दमदाठी केली.
संशयित आरोपी व्हणप्पा अप्पाशा याबाजी, नागप्पा याबाजी , सिद्धवीर याबाजी, अण्णू याबाजी (सर्व रा. कोर्सेगांव) यांच्या वर गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास पोहेकॉ गोटे हे करीत आहेत.