पुणे : पुणे जिल्ह्यातील बारामती शहर पोलीस ठाण्यातील महिला पोलीस कर्मचाऱ्याचा डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. शीतल जगताप गलांडे असे त्यांचे नाव आहे. त्यांच्यावर पुणे शहरातील केईएम रूग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या निधनाने अवघ्या दहा दिवसांपूर्वी जन्मलेले त्यांचे बाळ पोरकं झाले आहे. आज तीन वाजता उपचार सुरू असतानाच त्यांचा मृत्यू झाला आहे. Ambushed: Ten-day-old female policewoman dies of dengue Sheetal Galande Pune Baramati
त्यांच्या पश्चात पती, एक मुलगी व दहा दिवसापूर्वी जन्मलेले बालक असा परिवार आहे. शीतल गलांडे यांना प्रसुतीनंतर डेंग्यू आजाराची लागण झाली होती. उपचार सुरु असताना आज मंगळवारी (20 सप्टेंबर) पहाटे त्यांचे निधन झाले. शीतल या त्या प्रसूती रजेवर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांना डेंग्यू आजाराची लागण झाली.
शितल या शहर पोलीस ठाण्याची संपूर्ण संगणकीय प्रणालीचे कामकाज पाहत होत्या. प्रसूतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या. पोलीस दलाचे शिस्तप्रिय व जोखमीचे मनाचा व शरीराचा कस लागणारे काम त्या अतिशय प्रसन्न मनाने करायच्या. पोलीस ठाण्यातील वातावरण कायम सौहार्दपूर्ण ठेवण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा होता. प्रसुतीच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्या पोलीस ठाण्यात दैनंदिन कामकाज पहात होत्या.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शासकीय इतमामात त्यांचा अंत्यविधी आज पणदरे (ता. बारामती) या ठिकाणी होणार आहे. दरम्यान शीतल यांच्या या दुर्दैवी मृत्यूने पोलिस दलासह बारामती शहर व परिसरात खळबळ उडाली आहे. सध्या सुरु असलेल्या पावसामुळे सप्टेंबर महिन्यातच पुणे शहरात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये आणखी वाढ झाली आहे. या महिन्यातच शहराच्या हद्दीत डेंग्यूच्या 41 रुग्णांची नोंद झाली असून डेंग्यूचे 509 संशयित रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यूमुळे पुणे महापालिका हद्दीत एकही मृत्यू झाला नसल्याचं स्पष्टीकरण आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलं आहे.
□ सपना चौधरीला अटक
हरियाणाची प्रसिद्ध डान्सर सपना चौधरीला फसवणुकीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. तिच्या विरोधात वॉरंट दाखल झाल्यानंतर ती न्यायालयात हजर झाली. सपनाची न्यायालयीन कोठडीतून सुटका झाली आहे. एका अटीवर न्यायालयाने सपना चौधरीचे वॉरंट रद्द केले आहे. न्यायालयात हजर राहून ती सहकार्य करेल अशी ती अट आहे. दरम्यान, 30 सप्टेंबर रोजी याप्रकरणी सुनावणी होणार आहे.