□ फाशी घेऊन मर म्हणणाऱ्या कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा दाखल
सोलापूर : तुला जर प्रेमप्रकरण संपवायचे असेल तर तु फाशी घेवून मर नाहीतर आम्ही सोलापूरला येवून तुला व तुझ्या आई वडिलांना मारून टाकतो असे धमक्या दिल्याने सोलापुरातील एका १७ वर्षाच्या अल्पवयीन मुलाने आत्महत्या केलीय. या प्रकरणात आईच्या तक्रारीवरून कोल्हापुरातील पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. Online acquaintance turned into love minor hangs himself under pressure Solapur Kolhapur
मुलाने सुसाईड नोट व फोन करून रेकॉर्ड करून टेबलावर ठेवून सोलापुरातील आपल्या राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत मयत मुलाच्या आईने एमआयडीसी पोलीस ठाण्यात चांदवड जिल्हा कोल्हापूर येथील सहा जणांच्या विरोधात तक्रार दिली.
पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार तिचा मयत मुलगा इयत्ता १० वीमध्ये शिकत होता. त्याची संशयित आरोपी वैष्णवी विठ्ठल नाईक हिच्याशी एक वर्षापूर्वी ऑनलाईन ओळख झाली होती. त्यांचे रूपांतर प्रेमात झाले. संशयित आरोपी ही रोज सकाळी व संध्याकाळी फिर्यादीच्या मुलास फोन करत असत व बोलत असे. तसेच मयत याच्याकडून ऑनलाईन कपडे, खाण्याचे वस्तू,मोबाईल रिजार्च, ऑनलाईन पैसे मागवून घेत असे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
ती मुलाला सोलापूर येथे येवून भेटून जात होती. हे प्रेमसंबंध वैष्णवीची आई व भावाला समजल्याने व इतर नातेवाईकांनी मयत मुलास फोन करून जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच सोलापूरला येवून तुझे तुकडे तुकडे करतो नाहीतर तु स्वतः फाशी घेवून मर म्हणून धमकी देत होते. फिर्यादीचा मुलगा अज्ञान असल्याने त्याने आईवडिलांच्या भितीने हा प्रकार कोणास न सांगता एका डायरीत नोंद करून मोबाईल मध्ये आरोपीचे धमकी दिलेले आवाज ही रेकॉर्ड करून ठेवले होते.
१७ सप्टेंबर रोजी रात्री दहा ते बारा वाजण्याच्या सुमारास संशयित आरोपींनी त्या मुलास तुला जर प्रेमप्रकरण संपवायचे असेल तर तु फाशी घेवून मर नाहीतर आम्ही सोलापूरला येवून तुला व तुझ्या आई-वडिलांना मारून टाकतो, अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादीचे मयत मुलाने सुसाईटनोट व फोन करून रेकॉर्ड करून टेबलावर ठेवून सुसाईड केली आहे.
त्यामुळे मुलाच्या मरण्यास जबाबदार धरून महिलेने वैष्णवी विठोबा नाईक, (वय-२३),वैशाली विठोबा नाईक,(वय-४५), विठोबा यल्लपा नाईक (वय-५०),पांडुरंग विठोबा नाईक, (वय-३०),विजया विठोबा नाईक,(वय-२२, सर्व रा. हालकर्णी नाईक गल्ली दुर्गा देवी मंदिराजवळ हालकर्णी ता. चांदगड, जि. कोल्हापूर) यांच्या विरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक वळसंगे हे करीत आहेत.