पंढरपूर : भजन आणि कीर्तन बंदीचा निर्णय अंगलट आल्यामुळे मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी राज्य गुप्तवार्ता विभागाचा गोपनीय अहवाल फोडला आहे. या प्रकरणाची गंभीर दखल राज्य गुप्तवार्ता विभागाने घेतली असून त्यांच्या पथकाने मंदिराची पाहणी केली. Pandharpur. After the decision to ban kirtan came to the fore, the executive officers destroyed the confidential report Gajanan Gurav
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सभामंडपात भजन आणि कीर्तन करण्यास बंदी घालण्यात आली होती. राज्यात हिंदूत्ववादी सरकार असताना वारकऱ्यांना अवमानकारक वागणूक मंदिर समितीकडून देण्यात येत आहे. हिंदुत्ववादी संघटनांनी कडाडून विरोध केल्यामुळे बंदीचा निर्णय कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मागे घेतला.
भजन कीर्तन बंदीचा निर्णय राज्य गुप्तवार्ता विभाग, आय बी, यांनी गोपनीय अहवालावरून केल्याचा खळबळजनक खुलासा कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी केला. गोपनीय अहवालातील सुरक्षेच्या बाबी कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी मीडिया समोर सांगितल्यामुळे गोपनीयतेचा भंग केला आहे.
गोपनीय बाबी उघड केल्यामुळे राज्य गुप्तवार्ताने याची गंभीर दखल घेतली असून दोन दिवसांपूर्वी राज्य गुप्तवार्ता विभागाच्या पथकाने मंदिराची पाहणी केली आहे. यासर्व प्रकारचा वस्तुनिष्ठ अहवाल वरिष्ठांना पाठवला आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
राज्य गुप्तवार्ता विभागाने 2018 ला गोपनीय अहवाल दिला, तो गोपनीय अहवाल आहे, त्यामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरात कार्यक्रम घेण्यात येऊ नये. त्यांच्या सूचनेनुसार मंदिर समितीने 2019 पुढील निर्णय होईपर्यंत कार्यक्रम घेऊ द्यावेत मात्र स्पीकरला परवानगी देऊ नये , असे म्हटल्याचे गजानन गुरव (कार्यकारी अधिकारी ) यांनी म्हटले.
कार्यकारी अधिकारी गुरव यांच्या हे प्रकरण अंगलट आल्यामुळे त्यांनी गुप्तवार्ता विभागाच्या माथी मारले आहे. एक सत्य लपवण्यासाठी 100 खोटे बोलावे लागत आहे. कार्यकारी अधिकारी आणि मंदिर समितीने माफी मागावी, असे रामकृष्ण वीर महाराज यांनी म्हटलंय.
विठ्ठल-रुक्मिणी मंदिरातील सभामंडपात भजन-कीर्तनाची परंपरा आहे. मात्र, या भजन-कीर्तनाच्या आवाजाचा दर्शनरांगेतील भाविकांना व मंदिरातील मंदिर समितीच्या कार्यालयातील अधिकाऱ्यांना त्रास होतो. मंदिराची सुरक्षा करताना अडचण येते. त्यामुळे सभामंडपात सुरू असलेले भजन-कीर्तन बंद करायला लावले. येथे बंदी घालून ‘संत तुकाराम भवन’ येथे सुरू करण्याची सूचना केली होती. या सूचनेवर महाराज मंडळी, भाविकांमधून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ही नाराजी लक्षात घेऊन मंदिर समिती प्रशासनाने बंदी उठवीत भजन-कीर्तन सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे.
□ निर्मला सीतारमण यांनी घेतले जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन
देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारमण या तीन दिवसीय बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर आहेत. दरम्यान त्यांनी जेजुरीच्या खंडेरायाचे दर्शन घेतले आहे. तसेच त्यांनी मंदिराच्या पायऱ्यांवर भंडाऱ्याची उधळण केली. यावेळी त्यांच्याबरोबर भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील, राम शिंदे, राहुल कुल, माधुरी मिसाळ इ. नेते हजर होते. त्यांनी एके ठिकाणी बोलताना पवार कुटुंबियांवर टीका देखील केली आहे.