देशभरात विनोदावर आधारित कार्यक्रमांची लाट नेहमीच येत असते. विनोद निर्माण करणे आणि त्यातून लोकांना हसवणे ही एक कला असून ती बोटावर मोजण्याइतपत लोकांना लाभत असते. ही कला ज्यांना लाभते, ते प्रतिभावानच असतात. विनोदवीरांच्या लाटेतील पहिल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ कार्यक्रमात चार चांगल्या विनोदी कलाकारांचे चेहरे मनोरंजन क्षेत्राला गवसले. Raju Srivastava will always be remembered as a rickshaw puller with a great sense of humor in Mumbai
त्या कार्यक्रमाचा विजेता ठरलेला सुनील पाल, एहसान कुरेशी, राजू । श्रीवास्तव आणि पैचान कोन म्हणत नावारूपाला आलेला नवीन प्रभाकर. एकदा देशभर प्रसिद्ध असलेल्या मोठ्या मनोरंजन वाहिनीवर ओळख मिळाली की त्यांना त्या त्वा क्षेत्रातील अधिक संधी आपोआप खुल्या होतात. केवळ दूरचित्रवाहिनीच नव्हे तर प्रत्यक्षात होणारे सार्वजनिक कार्यक्रम, समारंभ सोहळे यातूनही कलाकारांना त्यांची कला सादर करण्यासाठी संधी मिळत जातात. तशा संधी राजू श्रीवास्तव यांनाही मिळाल्या आणि त्यांनी त्याचा पुरेपूर उपयोग करून घेत विनोदी कलाकार म्हणून आपली ओळख अधिक केली.
नकलाकार म्हणून सुरुवात केलेल्या राजू श्रीवास्तव यांच्याकडे भोवताली बद्दलचे निरीक्षण कौशल्य आणि विनोदाचे अचूक टायमिंग या गोष्टी होत्या. शिवाय आपल्याला विनोदी कलाकारच व्हायचे आहे, हेही त्यांनी आधीपासूनच ठरवले असल्याने त्यादृष्टीने जे-जे करता येईल ते त्यांनी केले. ऐंशीच्या दशकाच्या उत्तरार्धात मुंबईत रिक्षाचालक म्हणून काम केलेल्या राजू श्रीवास्तव यांनी चित्रपट क्षेत्रात विनोदी कलाकार म्हणून अगदी किरकोळ भूमिका करायला सुरुवात केली होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
एकाच वेळी तेजाब, मैने प्यार किया, बाजीगर यासारख्या चित्रपटांमधून छोट्या – मोठ्या भूमिका आणि स्टैण्ड अप कॉमेडीचे कार्यक्रमही त्यांनी सुरू ठेवले. तरीही विनोदी कलाकार म्हणून देशभर प्रसिद्धी मिळायला त्यांना २००५ सालापर्यंत वाट पाहावी लागली. त्यांचा चेहरा घरोघरी लोकप्रिय होण्यामागे दूरचित्रवाहिनी आणि विनोदावर आधारित ‘रिॲलिटी शो’ या दोन महत्त्वाच्या गोष्टी कारणीभूत ठरल्या.
गाणी आणि पाठोपाठ नृत्यावर आधारित रिॲलिटी शोचे अमाप पीक आल्यानंतर नवे काय, या शोधात असलेल्या वाहिन्यांनी विनोदावर आधारित रिॲलिटी शोची नवी टूम काढली. देशभरातील सर्वोत्कृष्ट विनोदवीराचा शोध येणारा ‘द ग्रेट इंडियन । लाफ्टर चॅलेंज’ हा शो स्टार प्लस वाहिनीवर २००५ साली आला. या पहिल्या पर्वात राजू यांच्याबरोबर आलेले एहसान कुरेशी, सुनील पाल आणि नवीन प्रभाकरसारख्या कलाकारांनाही तेव्हा प्रसिद्धी मिळाली होती.
मात्र, त्यानंतर ते फारशी चमक दाखवू शकले नाहीत. याच रिॲलिटी शोच्या पुढच्या पर्वामधून आलेल्या कपिल शर्मानेही लोकांची मानसिकता ओळखून कॉमेडी नाइट्स विथ कपिलसारख्या शोमधून बॉलिवूडमधील प्रसिद्ध कलाकारांचा हात धरून आपली वाट पक्की केली. त्या तुलनेत राजू श्रीवास्तव यांनी मात्र केवळ आपल्या विनोदी कार्यक्रमांच्या जोरावरच आपली लोकप्रियता टिकवून ठेवली.
इतक्या सगळ्या विनोदी कलाकारांमध्येही राजू श्रीवास्तव यांना अधिक पसंती मिळण्याचे महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचा निखळ आणि सहज विनोदी अभिनय. याशिवाय, त्यांनी सातत्याने रिॲलिटी शोमधून घेतलेला सहभागही त्यांचे नाव चर्चेत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरला.
दूरचित्रवाणी या माध्यमाची ताकद ओळखलेले राजू कॉमेडी सर्कस, कॉमेडी का । महामुकाबला, लाफ इंडिया लाफ अशा विविध विनोदी सादरीकरणावर आधारित रिअॅलिटी शो आणि त्यांच्या विविध पर्वातून सहभाग घेत राहिले. सातत्याने लोकांसमोर असण्याची आणि प्रामाणिकपणे छोट्या पडद्याच्या बरोबरीने प्रत्यक्ष कार्यक्रमांमधून सहभाग घेत राजकारण्यांच्या नकला, तत्कालीन सामाजिक – राजकीय परिस्थितीचा आधार घेत केलेली विनोदाची मांडणी अशा पध्दतीने ते आपली कला वाढवत राहिले.
ज्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज’ या शोच्या पहिल्या -पर्वात ते दुसऱ्या क्रमांकाचे उपविजेते ठरले होते, त्याच शोने नंतर काढलेल्या ‘द ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंज चॅम्पियन्स’चे पर्व त्यांनी ‘द किंग ऑफ कॉमेडीची उपाधी मिळवत गाजवले. केवळ विनोदी कार्यक्रमच नव्हे तर राजू वांनी नच बलिए बिग बॉससारख्या अन्य रिअॅलिटी शोमध्येही सहभाग घेतला.
त्यांनी राजकारणातही प्रवेश केला. एक कलाकार, राजकारणी, विविध चित्रपट-मालिका संघटनांशी जोडले जाऊन त्यांनी केलेले कार्य या सगळ्यातून जमा होत गेलेला अनुभव, विचार त्यांच्या कलेतही प्रतिबिंबित होत राहिले. विनोदी सादरीकरण, अभिनय, सूत्रसंचालन अशा विविध आघाड्यांवर काम करत त्यांनी आपल्यातील कलाकार जागा ठेवला. उत्तम विनोदबुद्धी आणि काळानुसार दूरचित्रवाहिनी, चित्रपट अशा माध्यमातून स्वतःला बदलत, सातत्याने काम करत लोकांसमोर आपली कला सादर करत राहण्याचे त्यांनी दाखवलेले व्यावहारिक शहाणपण यांच्या जोरावर ते खऱ्या अर्थाने लोकप्रिय ठरले.
📝 📝 📝
दै. सुराज्य संपादकीय लेखन