■ गायकवाड, बरगंडे, शिंदे, कल्याणी, राठोड, परदेशी, बिडला यांची निवड
■ दसरा मेळाव्यासाठी जिल्हात हिंदू गर्वगर्जना मोहीम
सोलापूर : सोलापुरात शिवसेनेच्या शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. शासकीय विश्रामगृह येथे युवा सेनेचे राज्य सचिव किरण साळी, सोलापूरचे शिवसेनेचे संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांना निवडीची पत्रे प्रदान करण्यात आली. Solapur. Shinde faction of Shiv Sena Yuva Sena announced
यावेळी शिवसेनेच्या (शिंदे गट) दसरा मेळाव्यास सोलापूर जिल्हातून २५ हजार शिवसैनिक जाणार असल्याचे सांगत यासाठी जिल्हामध्ये हिंदू गर्व गर्जना मोहिम अंतर्गत जनजागृती केली जाणार असल्याचे संपर्कप्रमुख प्रा.शिवाजी सावंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाची संपर्कप्रमुखपदी प्रा. शिवाजी सावंत अध्यक्षतेखाली पहिलीच बैठक सोलापुरातील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी पार पडली. या बैठकीला जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, चरणराज चौरे, मनीष काळजे, शहर प्रमुख मनोज शेजवाल, उपजिल्हाप्रमुख हरिदास चौगुले, तुकारम मस्के, माजी नगरसेवक उमेश गायकवाड, गौरव पाटील यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संपर्कप्रमुख शिवाजी सावंत म्हणाले, संपर्कप्रमुख झाल्यानंतर ही पहिलीच बैठक आहे. यामध्ये फादर बॉडी, युवासेना, महिला आघाडी या सर्व पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करत कार्यकारणी जाहीर करण्यात आली.
सोलापूरचे संजय तुकाराम सरवदे यांची शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर विष्णू बरगंडे, प्रकाश शिंदे, विशाल कल्याणी, अंकुश राठोड आणि आशिष परदेशी यांची शिवसेनेचे उपशहर प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. सोलापूर विभाग प्रमुख म्हणून राजू बिडला यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच बाळासाहेब दिलीप निकम हे मंगळवेढा तालुका युवा सेनेचे प्रमुख असतील.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
अमोल गायकवाड माढा तालुका युवा सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहतील. तर दीपक खटकाळे हे सांगोला तालुका युवा सेनेचे प्रमुख म्हणून काम पाहणार आहेत. उपजिल्हाप्रमुख म्हणून नियुक्त करण्यात आलेले संजय सरवदे हे संभाजी आरमारचे माजी जिल्हाप्रमुख आहेत. त्यांनी गुरुवारी शिंदे गटात प्रवेश केला आहे.
युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या निवडी जाहीर करण्यात आल्या आहेत सांगोलाचे सागर सुभाष पाटील हे युवा सेनेचे सोलापूर जिल्हा संपर्कप्रमुख राहणार आहेत. शिवसेनेचे माजी नगरसेवक उमेश गायकवाड यांच्यावर युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे.
उत्तर सोलापूर, संपूर्ण शहर आणि मंगळवेढा असे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. तसेच माढ्याचे प्रियदर्शन साठे हे युवा सेनेचे दुसरे जिल्हाप्रमुख असून त्यांचे कार्यक्षेत्र माढा, करमाळा आणि सांगोला असे राहील. नुकतेच सागर शितोळे यांच्यावरसुद्धा युवा सेनेचे जिल्हाप्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. अक्कलकोट, दक्षिण सोलापूर आणि बार्शी हे त्यांचे कार्यक्षेत्र आहे. युवा सेनेचे शहर प्रमुख म्हणून अर्जुन शिवसिंगवाले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थी सेनेचे कॉलेज कक्ष जिल्हाप्रमुख म्हणून सोलापुरातील सुजित खुर्द यांची निवड करण्यात आली आहे.
□ सोलापुरात विविध योजना आणू : सावंत
आगामी काळात शिंदे गटाच्या माध्यमातून राज्यभर विकास कामांचा जोर आणखीनच वाढणार आहे. सोलापूर जिल्ह्यातसुद्धा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून विविध योजना साकारण्यासाठी शिवसेना कटिबद्ध राहणार आहे. नूतन पदाधिकाऱ्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था डोळ्यासमोर ठेऊन आपापल्या भागात बांधणी करावी, असे आवाहन संपर्कप्रमुख प्रा. शिवाजी सावंत यांनी केले.
■ २५ हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला जाणार
जिल्हामध्ये हिंदू गर्व गर्जना ही मोहीम शहर व जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. येणाऱ्या दसरा मेळाव्यासाठी हिंदू गर्व गर्जना या मोहिमेअंतर्गत मोठ्या प्रमाणात शिवसैनिक मुंबईला जाण्याचे नियोजन करणार आहे. सोलापूर जिल्हातून सुमारे २५ हजार शिवसैनिक दसरा मेळाव्याला मुंबईला जातील, असा दावा संपर्कप्रमुख सावंत यांनी केला.