नांदेड : आदेशनं मला खुप छळलं, त्याच्या ञासांनं मी हे जग सोडून जातेय, पण आदेशला ‘फाशी देऊन संपवा’….कोणती तरूणी हे म्हणाली…काय घडलं ? जाणून घ्या… ‘सुराज्य डिजिटल’ च्या बातमीतून. An engineering student wrote a suicide note and took the step, expected
नांदेड – विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थीनीने वसतिगृहातील रूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती.
घटनास्थळी पोलिसांच्या हाती एक सुसाईड नोट लागली असून, या चिठ्ठीत तिचा वाशिमचा प्रियकर वर्गमित्र आत्महत्येला कसा जबाबदार आहे. या प्रकरणी आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त करणाऱ्या तिच्या वर्गमित्राला प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. ही घटना बुधवारी (दि.21) मध्यरात्रीस उघडकीस आली.
गीता कल्याण कदम (वय 22 रा. उस्मानाबाद) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थिनीचे नाव होते. विष्णुपुरी येथील श्री गुरुगोविंदसिंघजी अभियांत्रिकी महाविद्यालयात बी.ई. तृतीय वर्षात शिकत होती. ती महाविद्यालयाच्या वसतिगृहात राहत होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बुधवारी (दि.21) मध्यरात्री वसतिगृहातील खोली आतून बंद करून घेऊन गीताने खिडकीच्या पडद्याने पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांना एक चिठ्ठी सापडली आहे. तिने प्रेमप्रकरणातून आत्महत्या केल्याचे या चिठ्ठीतील माहितीतून समोर आले.
सदरील प्रकरणात भादंवि कलम 306 नुसार मयत तरुणीच्या भावाने दिलेल्या तक्रारीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिनिरिक्षक महेश कोरे यांनी आदेश गजानन चौधरीला अटक केली असून शुक्रवारी ( दि.23) महेश कोरे आणि त्यांच्या सहकारी पोलिसांनी आदेश चौधरीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आदेश गजानन चौधरी यास 26 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
बहिणीचे फोटो ब्लॅकमेल – आत्महत्येला कोण जबाबदार आहे? याबाबत सविस्तर माहिती लिहून ठेवली असून त्यातील मजकुरामध्ये तिचा वर्गमित्र आदेश गजानन चौधरी (रा.वाशीम) याने मयत तरुणीच्या बहिणीचे फोटो काढून तिला ब्लॅकमेल करून मानसिक त्रास देत होता. म्हणून मी आत्महत्या करत आहे असे चिठ्ठीत लिहिलेले आहे.
या त्रासातून माझ्या एका दुसऱ्या वर्ग मित्राने मला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्रास सहन होत नसल्याने मी आत्महत्या करत आहे. माझ्या आत्महत्येस आदेश गजानन चौधरी हा जबाबदार आहे. तसेच महिला आयोगाने माझ्या मृत्यूची दखल घेवून इतर कोणत्याही महिलेला, युवतीला अशा पध्दतीने आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही, यासाठी ठोस पावले उचलावीत, अशी अपेक्षा मयत तरुणीने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केली आहे.