□ २३ लाखांचा मुद्देमाल हस्तगत
□ एमआयडीसी पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी
सोलापूर : ऑटोरिक्षा चोरी करणाऱ्या ऑटोरिक्षा चालकाला एमआयडीसी पोलीस ठाणे सोलापूर शहर गुन्हे प्रकटीकरण पथकाकडून अटक करण्यात आली आहे. त्यास अटक करून त्याच्याकडून 16 ॲटोरिक्षा जप्त केल्या आहेत. पोलिसांना 23 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. Autorickshaw driver turned rickshaw thief; Sixteen auto rickshaws seized crime disclosure MIDC police
सैफन इरफान यादगीर व बिलाल सलीम गदवाल (दोघे.रा.गोदूताई परोळेकर,घरकुल कुंभारी सोलापूर) यांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. गुप्त बातमीदारामार्फत पोलीस नाईक चेतन रुपनर व सचिन भांगे यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे या दोघे संशयित आरोपी यांना ताब्यात घेऊन चौकशी केली.
त्यांनी सोलापूर शहर व ग्रामीण हद्दीतून विविध ठिकाणाहून ऑटो रिक्षा चोरी करून कर्नाटक येथे विक्री केले असल्याचे सांगितले. त्यांच्याकडून १६ ऑटोरिक्षा जप्त करण्यात आले असून,२३ लाख ७० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त राजेंद्र माने, पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर, सहाय्यक पोलीस आयुक्त संतोष गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजन माने, सहायक पोलीस निरीक्षक रोहित चौधरी, पोलीस हेडकॉन्स्टेबल राकेश पाटील, पोलीस नाईक सचिन भांगे, पोलीस नाईक चेतन रुपनर,पोलीस नाईक मंगेश गायकवाड,अमोल यादव,अश्रूभान दुधाळ,शंकर याळगी, काशिनाथ वाघे,शैलेश स्वामी,सचिन जाधव,मोहसीन शेख, इकरार जमादार,बागलकोट व नवनाथ लोहार यांनी बजावली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ दहिटणे : आजारास कंटाळून वृद्ध महिलेची आत्महत्या
सोलापूर – आजारास कंटाळून एका ७० वर्षीय वृध्द महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दहिटणे येथील कन्नी नगरात आज मंगळवारी दुपारच्या सुमारास घडली.
रोशनबी युसूफ उंटवाले (वय ७० रा. कन्नी नगर) असे मयत झालेल्या वृद्धेचे नाव आहे. घरात कोणी नसताना दुपारी १२ वाजण्याच्या पूर्वी तिने घरातील छताच्या पंख्याला साडीने गळफास घेतली होती. मयत रोशनबी हिच्या पश्चात ४ मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. आजारास कंटाळून तिने आत्महत्या केली. अशी नोंद जोडभावी पेठ पोलिसात झाली. हवालदार पैकेकरी पुढील तपास करीत आहेत.
□ लेझीमने मारहाण तरुण जखमी
एमआयडीसी परिसरातील नागेंद्र नगर येथे लेझीमने केलेल्या मारहाणीत महेश हुलगप्पा तुपदोळकर (वय२० रा. स्वागत नगर,कुमठा नाका) हा तरुण जखमी झाला. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. चेतन भारत, महेश सरला आणि अन्य तीन ते चार जणांनी मारहाण केली अशी नोंद एमआयडीसी पोलिसात झाली आहे.
□ रिक्षा उलटल्याने तीन मुले जखमी
सात रस्ता परिसरातील शर्मा स्वीट समोर अचानक ब्रेक लावल्याने रिक्षा उलटून तिघेजण जखमी झाले. ही घटना सोमवारी रात्रीच्या सुमारास घडली. अनुश्री जोगती (वय ९) तिचा भाऊ सर्वेश जोगती (वय ८) आणि सानिका पंडित चौगुले (सर्व रा. पोतदार शाळेजवळ) अशी जखमींची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते सर्वजण रिक्षातून रंगभवन ते घराकडे निघाले होते. या अपघाताची नोंद सदर बजार पोलिसात झाली आहे.