सोलापूर : एका विवाहितेने पोटच्या दोन चिमुरड्यांना घेऊन स्वतःच्या शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना आज शुक्रवारी (ता.30) सकाळच्या सुमारास बार्शी तालुक्यातील कुसळंब येथे घडली. A Heartbreaking Incident in the Rain; Jumped into the well, lost three lives Solapur
रोहिणी ऊर्फ अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २२), अनिष बाबासाहेब काशिद (वय दीड वर्ष) व अक्षरा बाबासाहेब काशीद (वय चार महिने) अशी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेल्या माय-लेकरांची नावे आहेत. विद्युत मोटारी लावून सायंकाळी चार वाजता तिघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आले.
नोव्हेंबर २०१९ मध्ये बाबासाहेब काशीद यांनी खडकोणी येथील दिलीप शिंदे यांची मुलगी रोहिणी ऊर्फ अनुराधा हिच्याशी दुसरा विवाह केला. आज शुक्रवारी पती बाबासाहेब हे कामानिमित्त तर सासरे प्रभाकर हे बार्शीला बँकेतून पगार आणण्यासाठी गेले होते. दरम्यान, रोहिणी हिने सकाळी १० ते ११.३० वाजण्याच्या सुमारास दोन चिमुरड्यांना घेऊन उडी घेऊन आत्महत्या केली.
कुसळंब येथील बाबासाहेब काशीद यांची पहिली पत्नी अनुराधा बाबासाहेब काशीद (वय २३) हिने आदिती काशीद (वय ५) व अक्षरा काशीद (वय ३) या दोन मुलींना स्वत:च्या कमरेला साडीने बांधून घेऊन २७ जुलै २०१७ रोजी स्वत:च्या शेतातील त्याच विहिरीत आत्महत्या केली होती. तेव्हा जाचहाट व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पांगरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोने व्यापाऱ्याला लुटणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
माळशिरस : माण तालुक्यातील म्हसवडमध्ये सराफ व्यावसायिकाला फिल्मी स्टाईलने लुटणार्या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आहे. म्हसवडमधील एक सोनारच गुन्ह्याच्या कटाचा मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले आहे.
सातारा जिल्ह्यातील सेवेचा अनुभव असणारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर व सपोनि रमेश गर्जे यांनी म्हसवड येथील सोने प्रकरणाच्या चोरीचा छडा लावला आहे. तांत्रिक मुद्दे आणि खबऱ्यांचे मजबूत नेटवर्क यामुळे सोने व्यापाऱ्याला लुटण्याचा डाव उघडकीस आला असून चार जणांना पोलिसांनी ताब्यात घेऊन मुद्देमाल जप्त केला आहे.
त्यांच्याकडून ४३५ ग्रॅम सोन्यासह सुझुकी कार, स्प्लेंडर मोटारसायकल, पिस्टल, चाकू असा एकूण १७ लाख ८३ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. दुर्वां उर्फ दुर्योधन नाना कोळेकर (वय ३४), रणजित भाऊ कोळेकर (वय २०), राहणार धुळदेव, तालुका माण, योगेश तुकाराम बरडे (वय ३५), राहणार पिलीव रोड बरडे वस्ती माळशिरस, जिल्हा सोलापूर आणि रामदास विठ्ठल गोरे (वय २०), राहणार मासाळवाडी, तालुका माण अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याप्रकरणी संशयितांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून चोरलेला सोन्याचा ऐवज, तसेच गुन्ह्यात वापरलेली वाहने, पिस्टल आणि चाकू, असा एकूण १७ लाख ८३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. म्हसवड न्यायालयाने संशयितांना पोलीस कोठडी सुनावली आहे.
□ गुन्ह्यात स्थानिक सोनाराचा हात
सराफ व्यावसायिकाच्या येण्या – जाण्याच्या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी तपासले. तसेच स्थानिक सोनाराने माळशिरस, धुळदेव मासाळवाडी साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.