पुणे : काही दिवसांपूर्वी पालकमंत्री पदावरुन देवेंद्र फडणवीसांनी मी त्यांना गुरुमंत्र देईन असा अजित पवारांना टोला लगावला होता. त्यावर पवारांनी फडणवीसांना उत्तर दिले आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चांगलीच जुगलबंदी रंगल्याचे दिसून येत आहे. ‘Train me, add some knowledge’ Pune Ajit Pawar Devendra Fadnavis
अजित पवार यांनी नुकतंच राज्यातील अनेक राजकीय घडामोडींवर प्रतिक्रिया दिली आहे.अजित पवार पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना मला एक जिल्ह्याचे पालकमंत्रीपद सांभाळताना नाकीनऊ आले होते, ते सहा जिल्ह्यांना कसे न्याय देऊ शकतील, असे वक्तव्य केले होते. त्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी अजित पवार यांना उत्तर देत मी अजित पवार यांना गुरूमंत्री देणार असल्याचे म्हटले. त्यावर अजित पवार यांनी उत्तर दिले आहे.
सध्याच्या सरकारमधील पालकमंत्र्यांबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, की देवेंद्र फडणवीस यांना आता पत्र लिहितो. तुमच्याकडून प्रशिक्षण कधी मिळेल आणि ते मोफत आहे का काही फी लागणार आहे? असं त्यांना विचारतो आणि ज्ञानात भर पाडून घेतो, असा मिश्किल टोला अजित पवारांनी फडणवीसांना लगावला आहे.
एक जिल्हा सांभाळणं सोपं नाही, फडणवीस सहा जिल्हे सांभाळणार आहेत, असं अजित पवार म्हणाले होते. यावर प्रत्युत्तर देत फडणवीसांनी अजित पवारांना प्रशिक्षण देऊ, असं म्हणत टोला लगावला होता. यावर अजित पवारांनी प्रतिक्रिया दिली. दरम्यान छगन भुजबळ यांनी देवी सरस्वतीच्या फोटोबद्दल केलेल्या विधानामुळे भाजपने आंदोलन केलं. यामुळे हे प्रकरण चर्चेत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मात्र यातून आता राष्ट्रवादीनं मात्र हात झटकल्याचं पाहायला मिळालं. देवी सरस्वतीच्या फोटोवरुन भुजबळांनी जे वक्तव्य केलं ती त्यांची वैयक्तिक भूमिका आहे, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे.
शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. अजित पवार म्हणाले, की मोठे राजकीय मेळावे घडतात तेव्हा पोलीस यंत्रणा लागते. दोन्ही गटाचं भाषण एकाचवेळी सुरू झालं तर आधी उद्धव ठाकरेंचं भाषण बघणार आणि नंतर एकनाथ शिंदेंचं असं अजित पवार म्हणाले.
अजित पवार म्हणाले, राज्याच्या उपमुख्यमंत्री पदाचा कार्यभार पाहताना जिल्ह्यातील संस्थांच्या कामांना वेळ मिळत नव्हता. म्हटलं विरोधी पक्षनेता झाल्यावर संस्थांच्या कामाकडे अधिक लक्ष देऊ. पण राज्याचे विरोधी पक्षनेत्यांचे काम उपमुख्यमंत्र्यापेक्षा जास्त असून, आता वेळ कमी पडत आहे, अशी कबुली राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी दिली. आपल्या कामाच्या झपाट्यासाठी ओळखले जाणारे अजित पवार यांनी सध्याची जबाबदारी अधिक व्यस्ततेची असल्याचे कबूल केले आहे. उपमुख्यमंत्री पदाचा कार्यकाळापेक्षा विरोधी पक्षनेते काम अधिक आव्हानात्मक असल्याचे पवार म्हणाले.