मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणात फक्त उद्धव ठाकरे यांना टीकेचे लक्ष केले. आम्ही गद्दार नाही तर बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी करणारे तुम्हीच खरे गद्दार असल्याची टीका एकनाथ शिंदे यांनी केली आहे. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील वाकयुद्धानंतर आता राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचा हिंदूत्ववादी मेळावा बीकेसी मैदानात झाला. हजारो शिवसैनिकांनी आपला घाम, रक्त सांडून जो पक्ष उभा केला. तो तुम्ही तुमच्या वैयक्तित, राजकीय फायद्यासाठी, महत्वाकांक्षेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे गहाण टाकला. बाळासाहेब रिमोट कंट्रोलने सरकार चालवायचे. तुम्ही तर सरकारचा आणि शिवसेनेचा रिमोट कंट्रोल राष्ट्रवादीच्या हातात गहाण टाकला अशी जोरदार टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
तुम्ही त्यांच्या तालावर तुम्ही नाचू लागलात आणि आम्हालाही नाचवू लागलात. बाळासाहेबांनी हरामखोर म्हणून ज्या पक्षांचा उल्लेख केला. त्या पक्षांच्या दावणीला तुम्ही शिवसेना बांधली. हे बघून बाळासाहेबांच्या मनालाही वेदना झाली असेल, असं म्हणत एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रवादीवर देखील तोंडसूख घेतलं.
बाळासाहेब आणि पवारांची दोस्ती होती. पण राजकारणात बाळासाहेबांनी कधी दोस्ती मध्ये आणली नाही. एकीकडे शिवसैनिकांचे खच्चीकरण होत होतं आणि आमचे पक्षप्रमुख धृतराष्ट्राची भूमिका निभावत होते, असंही एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.
□ ठाकरेंचे सख्खे बंधूंची शिंदे गटाच्या मंचावर
स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र जयदेव ठाकरे म्हणजे उद्धव ठाकरे यांचे सख्खे बंधू हे बीकेसी मैदानावर एकनाथ शिंदे यांच्या बाजूला हातात हात घालून बसलेले पाहायला मिळाले. जयदेव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी लावलेली ही उपस्थिती, त्यांचा शिंदे गटातील प्रवेश तर दर्शवत नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
“एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो”, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले. आपल्या सख्या भावाने बीकेसी मैदानावर जाऊन एकनाथ शिंदेंना हातात हात घालून बसलेले पाहायला मिळाले. जयदेव ठाकरे यांनी बीकेसी मैदानावर दसरा मेळाव्यासाठी लावलेली ही उपस्थिती, त्यांचा शिंदे गटातील प्रवेश तर दर्शवत नाही ना? असा प्रश्न आता निर्माण होत आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
“एकनाथ शिंदेंसारखा धडाडीचा माणूस महाराष्ट्राला हवाय, म्हणून मी त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो”, असे यावेळी जयदेव ठाकरे म्हणाले. आपल्या सख्या भावाने बीकेसी मैदानावर जाऊन एकनाथ शिंदेंना दिलेला हा पाठिंबा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जातोय.
□ ‘उध्दव ठाकरेला फोन लावा अन् इथं येऊन गर्दी बघून जा म्हणावं’
शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी दसरा मेळ्याव्यात उध्दव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. कुणाकडे फोन असेल तर त्यांनी त्या उद्धव ठाकरेला फोन करा आणि दोन मिनिटे इथं येऊन ही गर्दी बघून जा म्हणावं. मग खरी शिवसेना कुठली हे कळेल, अशी त्यांनी टिका केली. तसेच एकनाथ शिंदेंनी गद्दारी केलेली नाही. झालेल्या चुकीचं प्रायश्चित घेण्यासाठी धाडसाने उचलेलं एक पाऊल आहे, असेही त्यांनी म्हटले.
□ आम्ही केलेली गद्दारी नाही, हा गदर आहे – शिंदे
• आम्ही केलेली गद्दारी नाही, हा गदर आहे. गदर म्हणजे क्रांती, उठाव. आम्ही बाळासाहेबांचे शिलेदार
• गद्दारी झालीय हे बरोबर आहे. पण ती गद्दारी 2019 ला झाली. निवडणूका एकत्र लढवून महाविकास आघाडी केली. तेव्हा गद्दारी झाली.
• तुम्ही बापाचे विचार आणि बापालाच विकण्याचा प्रयत्न केला. सत्तेसाठी हिंदुत्वाला तिलांजली दिली.
• तुमच्या मनातला गोंधळ आता संपला असेल. खरी शिवसेना कुठेय?, याचे उत्तर महाराष्ट्रालाच नाही तर हिंदुस्थानला दिले.
• बाळासाहेबांच्या विचारांना मूठमाती दिली, तिलांजली दिली. तुम्हाला त्या जागेवर उभे राहण्याचा अधिकार राहिला आहे का?
• आम्ही जे केले ते राज्याच्या हितासाठी, जनतेच्या हितासाठी. ही शिवसेना फक्त बाळासाहेब आणि शिवसैनिकांची.
• सत्तेसाठी तुम्ही वडिलांचे विचार विकले. होय गद्दारी झालेली आहे. पण गद्दारी ही २०१९ ला झाली. बाळासाहेबांच्या विचारांशी गद्दारी झाली. जनतेशी गद्दारी झाली.
• तुमची गद्दारी जनतेला कळली, म्हणून तर एवढा जनसमुदाय इथे लोटला आहे. आता जनतेने ठरवलं आहे. गद्दारांना साथ द्यायची नाही.
• आम्ही निर्णय घेताना आनंदाने घेतला नाही, आम्हालाही वाईट वाटलं; आम्हाला गद्दार म्हणण्यापेक्षा तुम्ही आत्मपरीक्षण करा.