□ भव्य मिरवणूक, रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर उपक्रमांचे आयोजन
सोलापूर : बहाद्दर लेझीमचा डाव, पारंपरिक वाद्याच्या गजरात, सामाजिक उपक्रम राबवत धम्मचक्र प्रवर्तन दिन जल्लोषात साजरा केला. मिरवणुकीबरोबरच रक्तदान शिबिर, आरोग्य शिबीर, खाऊ वाटप आदी उपक्रमांचे आयोजन यादरम्यान केले होते. Solapur. Dhammachakra enforcement day celebrated with gaiety, Commissioner played Lazeem Dav Samata Sainik Dal
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरुड पुतळ्यास मान्यवरांच्या उपस्थितीत अभिवादन करून प्रबुद्ध भारत तरुण मंडळ, जीएम ग्रुप आदी मंडळाच्यावतीने 66 व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त जल्लोषात बहाद्दर लेझीम डाव सादर करत भव्य मिरवणूकीची सुरुवात करण्यात आली.
यावेळी या मिरवणुकीच्या सुरुवातीला सोलापूरचे पोलीस आयुक्त राजेंद्र माने, महानगरपालिका आयुक्त पी. शिवशंकर यांच्या हस्ते तथागत गौतम बुद्ध यांच्या चरणी पुष्प अर्पण, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून भव्य मिरवणुकीस प्रारंभ करण्यात आला.
यावेळी सहाय्यक पोलीस आयुक्त दीपक आर्वे, फौजदार चावडी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, सोलापूर महानगरपालिका माजी गटनेते तथा प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख मार्गदर्शक आनंद चंदनशिवे, सोलापूर महानगरपालिका मंडई व उद्यान समिती सभापती गणेश पुजारी, एस. के. फाउंडेशनचे संस्थापक रविकांत कोळेकर, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे प्रमुख गौतम चंदनशिवे, सामाजिक कार्यकर्ते श्रीमंत जाधव, प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे अध्यक्ष संदीप कापुरे, सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत सोनवणे, पी. बी. ग्रुपचे सल्लागार विशाल मस्के, हृदयनाथ मोकाशी यांची उपस्थिती होती.
मिरवणूक छत्रपती शिवाजी महाराज चौक, मेकॅनिक चौक, सरस्वती चौक, चार हुतात्मा चौक, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक मार्गे काढण्यात आली होती. या मिरवणुकीत एल. ई. डी. स्क्रीनद्वारे प्रबुद्ध भारत तरुण मंडळाचे बहाद्दर लेझीमचे डाव सादर करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रबुद्ध भारत तरुण मंडळच्यावतीने लेझीम डावा सोबत पारंपरिक वाद्य, त्याचप्रमाणे पारंपारिक आर्टिफिशियल फुलांचा देखावा (मोर) करण्यात आला होता.
□ समता सैनिक दलाच्या वतीने प्रज्ञासूर्यास मानवंदना !
समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूर आणि निवृत्त पोलीस अधिकारी – कर्मचारी यांचा शाक्य संघ तसेच निवृत्त जवान अधिकारी कर्मचारी यांच्या सिदनाक ब्रिगेड पुरुष-महिलांच्या वतीने ६६ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनी विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यात आली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
बुधवारी सकाळी ९.३० वाजता नॉर्थकोट प्रशालेच्या
मैदानावर मान्यवरांच्या गटशिक्षणाधिकारी अशोक भांजे यांच्या हस्ते पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर नॉर्थकोर्ट मैदान ते विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापर्यंत पथसंचलन करण्यात आले. या ठिकाणी सकाळी १० वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुर्णाकृती पुतळयास मानवंदना देण्यात आली. त्यानंतर भीमगीत ( संकल्पगीत ) गायले. हा धम्मसंस्कार सोहळा गेली २३ वर्षापासून नॉर्थ कोर्ट प्रशालेच्या मैदानावर संपन्न होत आहे.
शानदार आणि शिस्तबद्धपणे मुख्य सोहळा सायंकाळी ठिक ७ वाजता नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर संपन्न झाला. प्रमुख पाहुणे सोलापूर मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते. तसेच वंदनीय भिक्कूगण यांच्या वतीने बुध्द वंदना घेण्यात आली. त्यांनतर प्रमुख पाहुणे आयुक्त पी. शिवशंकर यांनी समता सैनिक दलाचे, शाक्य संघाचे, शाक्य महिला संघाचे, सिदनाक पुरुष व महिला बिग्रेड यांच्या शिस्तबद्ध संचलनाचे निरीक्षण केले. त्यानंतर भीमगीत ( संकल्पगीत) गायले. भिक्कूगण यांची धम्मदेसना झाली. त्यानंतर शालेय विद्यार्थी तसेच बांधवांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यामध्ये बौध्द धम्मावरती, फुले-आंबेडकरी चळवळीवर गीते आणि मुलांच्या नृत्याचा कलाविष्कार सादर करण्यात आला. त्याच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित त्यांनी भरभरून साथ दिली.
यावेळी समता सैनिक दल शहर जिल्हा सोलापूरचे जी.ओ.सी. अण्णासाहेब भालशंकर, शाक्य संघाचे अध्यक्ष अगंध मुके, आणि निवृत्त पोलीस उपनिरीक्षक केरु जाधव , वशिष्ट सोनकांबळे, अशोक दिलपाक, निवृत्त पोलीस अधिक्षक अशोक भालेराव, सुनिल ओहोळ, प्रविण कसबे, गोपीनाथ कांबळे, अनिल लंकेश्वर, कैलास गायकवाड, शशिकांत बाबरे, विजयकुमार कांबळे, दत्तात्रय सिद्धगणेश, सौ. सुमित्रा जाधव, प्रकाश घटकांबळे, अनिल जगझाप, मिलिंद कोरे आदी पदाधिकारी सभासद उपस्थित होते.
□ बौद्ध काळात भारतासह अनेक देशांमध्ये समृद्धी अन भरभराट : आयुक्त पी. शिवशंकर
दोन हजार वर्षांपूर्वी तथागत गौतम बुद्धांच्या काळात त्यांच्या विचारांमुळे भारत देशासह जगातील अनेक देशांमध्ये समृद्धी अन भरभराट होती. त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे आपल्या देशाला नवी दिशा मिळाली. सामाजिक, आर्थिक व इतर क्षेत्रात समान संधी मिळाली. डॉक्टर आंबेडकरांचे विचार पुढे नेण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करूया, असे प्रतिपादन महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी केले
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समता सैनिक दलाच्या वतीने शानदार आणि शिस्तबद्धपणे मुख्य सोहळा सायंकाळी ठिक ७ वाजता नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर वंदनीय भन्तेगण यांच्या मंगल उपस्थितीत संपन्न झाला. प्रमुख पाहुणे सोलापूर मनपाचे आयुक्त पी. शिवशंकर उपस्थित होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी प्रमुख पाहुणे पी. शिवशंकर यांनी समता सैनिक दलाचे, शाक्य संघाचे, शाक्य महिला संघाचे, सिदनाक पुरुष व महिला बिग्रेड यांच्या शिस्तबद्ध संचलनाचे निरीक्षण केले. प्रारंभी वंदनीय भिक्कूगण यांच्या वतीने बुध्द वंदना घेण्यात आली त्यानंतर भीमगीत ( संकल्पगीत) गायले.भिक्कूगण यांची धम्मदेसना झाली.
आयुक्त पी. शिवशंकर पुढे म्हणाले, दोन हजार वर्षांपूर्वी अवघ्या जगभरात बौद्ध धम्म विस्तारला होता. त्यांच्या विचारामुळे अनेक देश आज प्रगतीपथावर आहेत. त्यानंतर देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानामुळे नवी दिशा मिळाली. चांगले संविधान मिळाले नसल्याने शेजारील पाकिस्तान या देशाची काय स्थिती झाली, हे आपण सर्वजण पाहतो. देश व समाजाच्या कल्याणासाठी आणि चांगला समाज घडविण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचा प्रसार आणि प्रचार त्याचबरोबर आचरण करण्यासाठी सर्वांनी आता योगदान दिले पाहिजे, असे आवाहन महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी केले केले.
¤ जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची सदिच्छा भेट
– जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी नॉर्थकोट मैदानावरील या धम्म संस्कार सोहळ्याला आवर्जून उपस्थिती दर्शवली. तथागत बुद्ध व डॉक्टर आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन केले. उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा दिल्या. त्यानंतर इतर कार्यक्रमही आवर्जून पाहिले. यावेळी मिलिंद शंभरकर यांचा येथोचित सन्मान करण्यात आला.
त्यानंतर शालेय विद्यार्थी तसेच बांधवांचा सांस्कृतिक कार्यक्रम पार पडला. यामध्ये बौध्द धम्मावरती, फुले-आंबेडकरी चळवळीवर गीते आणि मुलांच्या नृत्याचा कलाविष्कार सादर करण्यात आला. त्याच टाळ्यांच्या कडकडाटात उपस्थित त्यांनी भरभरून साथ दिली. सूत्रसंचालन वशिष्ठ सोनकांबळे यांनी केले.