सोलापूर – पूर्वीच्या भांडणावरून घराला आग लावल्याचा बदला घेण्यासाठी मध्यरात्रीच्या सुमारास घरात घुसून मारहाण करीत आग लावल्याने कपाटातील ३ लाखाची रोकड आणि इतर साहित्य असा ३ लाख २० हजाराचे नुकसान झाले. Solapur. A house set on fire due to a previous quarrel; 3 lakhs loss
ही घटना सांगोला येथील कोपटे वस्तीत रविवारी (ता. 2) मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी पप्पू इंगोले आणि सुभाष इंगोले (रा. सांगोला) याच्यासह चौघाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यासंदर्भात शालन भाऊसाहेब जानकर (वय ५० रा. कोपटेवस्ती, सांगोला) यांनी पोलिसात फिर्याद दाखल केली. शनिवारी रात्रीच्या सुमारास शालन जानकर त्यांच्या दोन सुना आणि मुलगी असे घरात झोपल्या होत्या. रविवारी पहाटे एक वाजेच्या सुमारास पुर्वीच्या भांडणावरून पप्पू इंगोले, सुभाष इंगोले याच्यासह चौघेजण घरात बसून शिवीगाळ केली. आणि सुनेला मारहाण केली. त्यानंतर सोबत आणलेले पेट्रोलचे बोळे टाकून आग लावली. त्या आगीत कागदपत्रे, कपाटातील ३ लाख रुपये आणि इतर साहित्य याचे नुकसान झाले. असे जानकर यांच्या फिर्यादीत नमूद आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक काटकर करीत आहेत.
ऑगस्ट महिना अखेरीस पूर्वीच्या भांडणावरून पप्पू इंगोले (रा. कोपटेवस्ती सांगोला) यांच्या घरात घुसून पेट्रोल ओतून आग लावण्यात आली होती. त्यावेळी ५० ग्राम सोन्याचे दागिने चोरीस गेले होते. अशा आशयाची फिर्याद इंगोले यांनी दिली होती. या प्रकरणात सांगोल्याच्या पोलिसांनी धनाजी भाऊसाहेब जानकर आणि त्याच्या साथीदारावर गुन्हा दाखल केला होता.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● मार्डी येथे निखाऱ्यावरून चालताना तरुण भाजला
सोलापूर – धार्मिक कार्यक्रमाच्या वेळी निखाऱ्यावरून चालताना ठेच लागून आगीत पडल्याने दोन्ही पाय भाजून तरुण जखमी झाला. ही घटना मार्डी (ता.उत्तर सोलापूर) येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर बुधवारी (ता. 5 ) पहाटेच्या सुमारास घडली.
हर्षवर्धन बबन साठे (वय १९) असे जखमीचे नाव आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. गावात नागनाथ महाराजांची यात्रा असल्याने धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामपंचायत कार्यालयासमोर निखारा पेटवण्यात आला होता. पहाटे ५ वाजेच्या सुमारास हर्षवर्धन साठे हा निखाऱ्यावरून पायी जात होता. त्याचे दोन्ही पाय गुडघ्यापर्यंत भाजले. अशी नोंद तालुका पोलिसात झाली आहे.
● बबलाद तांडा येथे चाकूने मारहाण २ महिला जखमी
सोलापूर – घरगुती भांडणातून चाकू आणि लाथा बुक्क्याने केलेल्या मारहाणीत दोन महिला जखमी झाल्या. ही घटना बबलाद तांडा (ता.अक्कलकोट) येथे मंगळवारी (ता. 4) सकाळच्या सुमारास घडली. सुमित्रा उमेश चव्हाण (वय २५) आणि अंजू पंडित राठोड (वय २२ रा.बबलाद) अशी जखमींची नावे आहेत.
त्यांना अक्कलकोट येथे प्राथमिक उपचार करून सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना आकाश चव्हाण आणि दोघांनी मारहाण केली. अशी प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली आहे. यावेळी झालेल्या मारहाणीत विलास देवलू राठोड (वय २०) हा देखील जखमी झाला. त्याला देखील रुग्णालयात दाखल करण्यात आले.