सोलापूर : दौंड व मनमाड विभागात दुहेरी मार्गाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळेच प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन केले आहे. Twenty railway express trains running on Solapur section were cancelled, some were changed to double track
दसरा, येणारी दिवाळीसह ऐन सणासुदीत रेल्वेची प्रवासी सेवा कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यावर रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
□ काही गाड्याचा मार्ग बदलला
या कामकाजामुळे यशवंतपूर -अहमदाबाद एक्स्प्रेस ही व्हाया दौंड-पुणे-लोणावळा-वसई रोड-सूरत मार्गे धावेल. चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया रायचूर – विकाराबाद-बिदर -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. म्हैसूर- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डूवाडी -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. पुणे -लखनऊ एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -हावडा एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी-मनमाड मार्गे धावेल. कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल.
पुणे – बनारस एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -गोरखपूर एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल-इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. गोरखपूर- पुणे एक्स्प्रेस ही व्हाया मनमाड- इगतपुरी-पनवेल – लोणावळा मार्गे धावणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ या वीस रेल्वेगाड्या रद्द
– कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस
– गोंदिया – कोल्हापूर एक्स्प्रेस
– दादर -साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
– साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस
– पुणे – भुसावळ विशेष एक्स्प्रेस
– भुसावळ- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – जबलपूर विशेष एक्स्प्रेस
– जबलपूर- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई विशेष एक्स्प्रेस
– वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – राणी कामलापती एक्स्प्रेस
– राणी कामलापती – पुणे एक्स्प्रेस
– पुणे- नागपूर एक्स्प्रेस
– नागपूर- पुणे एक्स्प्रेस
– पुणे – बिलासपूर एक्स्प्रेस
– बिलासपूर – पुणे एक्स्प्रेस
– पुणे – नांदेड एक्स्प्रेस
– नांदेड- पुणे एक्स्प्रेस
– पुणे- काजीपेठ एक्स्प्रेस
– काजीपेठ- पुणे एक्स्प्रेस
¤ मोठा झटका – रेल्वेचं तिकीट रद्द करण्याआधी ही बातमी वाचा
रेल्वेने तिकिटांबाबत नियम आणण्याचा विचार केला आहे. त्यामुळे प्रवाशांना याचा मोठा फटका बसू शकतो. रेल्वेच्या नवीन नियमांनुसार, कन्फर्म तिकीट रद्द केलं तर तुम्हाला जास्तीचे पैसे द्यावे लागणार आहे. आधीच कन्फर्म तिकीट रद्द केलं तर आपल्याला काही शुल्क द्यावे लागतच होते. परंतु आता यावर लोकांना जीएसटी करही लागू होणार आहे.