□ निवडणुकांसाठी मनसेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी सज्ज रहावे: अमित ठाकरे
सोलापूर : आगामी काळात सोलापुरात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी या निवडणुका लढण्यासाठी आणि जिंकण्यासाठी सज्ज रहावे. सोलापूरवर राज ठाकरे यांचीही विशेष लक्ष असणार आहे, यामुळे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावी, असे आवाहन मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी केले. Mns Amit Thackeray gave a quick visit to Solapur city calling for elections
अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे महाअभियान संपर्क अभियान सुरू आहे. गणेशोत्सव आणि नवरात्रीनंतर मराठवाड्यातून या अभियानाच्या टप्पा सुरू होत आहे. त्यासाठी तुळजापूर येथे जाण्यासाठी अमित ठाकरे सोलापुरात गुरुवारी (ता. 6) रात्री आले होते. त्यावेळी त्यांचे स्वागत मनसेचे शाडो मंत्री दिलीप धोत्रे यांनी केले.
आज शुक्रवारी सकाळी त्यांनी सोन्या मारुती येथील मनसेच्या जिल्हा कार्यालयाला भेट दिली आणि गणपतीची आरती झाल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी वार्तालाप केला. अमित ठाकरे म्हणाले की, आपला विद्यार्थी बांधणीसाठीचा दौरा आहे. सध्या मराठवाड्यात आपण तरुण-तरुणींना भेटणार आहे. ज्यांना विद्यार्थी सेनेत काम करण्याची इच्छा आहे अशांशी संपर्क साधणार असून आगामी काळात मनसेचा युवा वर्गावरच जास्त भर असणार आहे.
राज ठाकरे यांचे सोलापूर शहरावर विशेष लक्ष असणार आहे. आगामी काळात महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांचा सोलापूर दौराही होणार असल्याचे ठाकरे यांनी सांगितले.
यावेळी मनसेचे शाडो मंत्री दिलीप धोत्रे, जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, जिल्हाध्यक्ष अमर कुलकर्णी, अभिषेक रंपुरे, राहुल अक्कलवाडे,पवन देसाई, मनविसे शहराध्यक्ष राहुल पाटील, मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे, प्रसाद कुमठेकर, अक्षय घोंगडे, दिनेश ढोपे आदि उपस्थित होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
》 सोलापूर विभागावरून धावणा-या वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द, काहीच्या मार्गात बदल
सोलापूर : दौंड व मनमाड विभागात दुहेरी मार्गाचे काम हाती घेतले आहे. या कामामुळे १८ ऑक्टोबरपर्यंत सोलापूर विभागातून धावणाऱ्या तब्बल वीस रेल्वे एक्स्प्रेस गाड्या रद्द करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळेच प्रवाशांनी याची नोंद घेऊन प्रवास करावा, असे आवाहन केले आहे.
दसरा, येणारी दिवाळीसह ऐन सणासुदीत रेल्वेची प्रवासी सेवा कोलमडल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. यावर रेल्वे प्रशासनाने दिलगीरी व्यक्त केली आहे.
□ काही गाड्याचा मार्ग बदलला
या कामकाजामुळे यशवंतपूर -अहमदाबाद एक्स्प्रेस ही व्हाया दौंड-पुणे-लोणावळा-वसई रोड-सूरत मार्गे धावेल. चेन्नई-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया रायचूर – विकाराबाद-बिदर -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. म्हैसूर- साईनगर शिर्डी एक्स्प्रेस ही व्हाया कुर्डूवाडी -लातूर रोड -परभणी -अंकाई -मनमाड-बैराकपूर मार्गे धावेल. पुणे -लखनऊ एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -हावडा एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी-मनमाड मार्गे धावेल. कोल्हापूर -हजरत निजामुद्दीन एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल.
पुणे – बनारस एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल -इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. पुणे -गोरखपूर एक्स्प्रेस ही व्हाया लोणावळा -पनवेल-इगतपुरी -मनमाड मार्गे धावेल. गोरखपूर- पुणे एक्स्प्रेस ही व्हाया मनमाड- इगतपुरी-पनवेल – लोणावळा मार्गे धावणार आहे.
□ या वीस रेल्वेगाड्या रद्द
– कोल्हापूर – गोंदिया एक्स्प्रेस
– गोंदिया – कोल्हापूर एक्स्प्रेस
– दादर -साईनगर शिर्डी एक्स्प्रेस
– साईनगर शिर्डी- दादर एक्स्प्रेस
– पुणे – भुसावळ विशेष एक्स्प्रेस
– भुसावळ- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – जबलपूर विशेष एक्स्प्रेस
– जबलपूर- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – वीरांगना लक्ष्मीबाई विशेष एक्स्प्रेस
– वीरांगना लक्ष्मीबाई- पुणे विशेष एक्स्प्रेस
– पुणे – राणी कामलापती एक्स्प्रेस
– राणी कामलापती – पुणे एक्स्प्रेस
– पुणे- नागपूर एक्स्प्रेस
– नागपूर- पुणे एक्स्प्रेस
– पुणे – बिलासपूर एक्स्प्रेस
– बिलासपूर – पुणे एक्स्प्रेस
– पुणे – नांदेड एक्स्प्रेस
– नांदेड- पुणे एक्स्प्रेस
– पुणे- काजीपेठ एक्स्प्रेस
– काजीपेठ- पुणे एक्स्प्रेस