□ भाजपाच्या कार्यक्रमात देशमुख गट समर्थकांची केवळ मांदियाळी
सोलापूर : अहमदनगर स्थित पूर्वाश्रमीचे कॉंग्रेसचे नेते आणि सध्याचे भाजप व शिंदे गट प्रणित विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारमधील मंत्री, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना पालकमंत्रीपदाच्या आपल्या पहिल्याच दौऱ्यात सोलापूरी हिसका अनुभवायला मिळाल्याची चर्चा आता चांगलीच रंगली आहे. Solapur. Demonstration of factional politics in front of Guardian Minister Politics Radhakrishna Vikhe Patil Deshmukh advice
विखे-पाटील यांच्यावर दबाव आणण्याचा प्रकार शिवसेनेच्या सोलापूर जिल्ह्यातील ‘पॉवर’बाज शिंदे गटाने केला. तर दुसरीकडे शहरातील भाजपाचे वजनदार नेते तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आमदार विजयकुमार देशमुख यांच्यासह पक्षाच्या काही पदाधिकाऱ्यांनी नव्या पालकमंत्र्यांच्या दौ-याकडे जाणीवपूर्वक पाठ दाखवून जे काही दाखवून द्यायचे होते, ते दाखवून दिले. ‘समजनेवाले को काफी इशारा….याचाच प्रत्यय विजयकुमार देशमुख यांनी आणून दिला.
जिल्ह्याचे नवे पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील मंगळवारी (ता.4) सोलापूर शहराच्या दौऱ्यावर होते, त्यांच्या उपस्थितीत अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी गांधी नगरमधील एका मंगल कार्यालयात भाजपाचा कार्यक्रम हा एक मुख्य होता. या कार्यक्रमाला पूर्णपणे भाजपाची किनार होती.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तथापि राधाकृष्ण विखे-पाटील हे पालकमंत्री होण्याला शिवसेना शिंदे गटाचे मोठे योगदान आहे, तेव्हा पालकमंत्र्यांनी अगोदर आमचे ऐकले पाहिजे असे पवित्रा घेत विखे पाटील यांना गाठून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाला. भाजपच्या पदाधिकाऱ्यांना भेटण्यापूर्वी शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांना भेटा, संवाद साधा असे शिंदे गटाचे नेते, संपर्क प्रमुख तानाजी सावंत तसेच अमोल शिंदे यांनी आक्रमक होवून सांगत रान पेटवले.
गांधीनगरातील भाजपाच्या भाजपाच्या खास आयोजित कार्यक्रमाकडे आ. विजयकुमार देशमुख यांच्यासह त्यांच्या गटाच्या समर्थक कार्यकर्त्यांनी या कार्यक्रमावर जणू बहिष्कार घातला. जो कार्यक्रम झाला, त्यामध्ये आमदार सुभाष देशमुख गटाचेच पदाधिकारी त्यांच्यासह मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले.
भाजप गट पुरस्कृत पालकमंत्री विखे-पाटील यांच्यासमोर सोलापुरातील भाजपामधील गटा – तटाच्या राजकारणाचे प्रदर्शन झाले. पालकमंत्री जे काही समजायचे ते समजले. पण त्यांनी भाजपामधील सर्वांनाच सबुरीचा सल्ला दिला. जुने तसेच नवे वाद न करता, हातात हात घालून एकोप्याने काम करण्याचा सल्ला विखे – पाटलांनी दिला.
□ पालकमंत्र्यांचा मौलीक सल्ला
आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांच्या गटांमधील राजकीय दुष्मनीचे राजकारण तसे दिल्लीच्या तख्तापर्यंत माहीत आहे. दोघे देशमुख एकमेकांचे तोंड बघायला तयार होत नाहीत, इतके गटातटाच्या राजकारणाचे, राजकीय हाडवैर या दोघांमध्ये आहे, हे सोलापूरकरांना अनेकवेळा दिसले आहे.
दोघांमधील हा वाद मिटवण्याचे प्रयत्न यापूर्वी कित्येक वेळा झाले. मात्र प्रत्येकवेळी ‘पालथ्या घड्यावर पाणी’ याचाच प्रत्यय आला. असे असताना भाजपाचे ज्येष्ठ नेते विखे-पाटलांनी मौलीक सल्ला दिला. ‘हातात हात घालून काम करा, जुने नवे वाद काढत बसू नका’ असाच त्यांचा मौलीक सल्ला. हा त्यांचा सल्ला कितीपत ऐकला जाईल यावर प्रश्नचिन्ह आहे.