□ ओढ्याला पूर, अतिक्रमणामुळे नागरिकांच्या घरात पाणी, लाखोंचे नुकसान
कुर्डूवाडी : राज्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस बरसत आहे. तर सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील ढवळस परिसरात ढगफुटी सदृश्य पाऊस झाला आहे. यामुळं रस्त्यांना नदीचे स्वरुप आलं आहे. ढवळस परिसरात सलग सहा तास जोरदार पाऊस झाला आहे. करमाळा तालुक्यातील केमसह आजूबाजूच्या पाथर्डी, मलवडी, आदी गावात अतिवृष्टी झाली आहे. त्यामुळे शेतीचंही नुकसान झालं आहे. Cloudburst in Dhawals and Torrential Rain in Karmala Bend Drokha Kurduwadi Solapur Widening
परतीचा जोरदार पाऊस पडल्याने कुर्डूवाडी शहरालगत असलेल्या दोन ओढ्यांना पूर आला व ओढ्यातील अतिक्रमणामुळे परिसरातील अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे संसारोपयोगी साहित्याचे नुकसान झाले. ओढ्यातील अतिक्रमणाकडे आता तरी प्रशासन गांभीर्याने पाहणार का? असा सवाल नागरिक विचारत आहेत.
काल गुरुवारी ( दि. ६ ) रात्री केम, ढवळस, चौभेपिंपरी, कुर्डू आदी परिसरात रात्रभर झालेल्या मुसळधार पावसामुळे कुर्डूवाडी शहरालगत असलेल्या टेंभुर्णी रोड वरील ओढ्याला सकाळी ७ वाजता पुराचे पाणी येण्यास सुरुवात झाली. काही वेळातच पाणी वाढल्याने ओढायला पूर आला ओढ्यातील अतिक्रमणामुळे चौधरी प्लॉट परिसरातील घरांमध्ये पाणी शिरले तर हेच पाणी पंढरपूर रोडवरील ओढ्यातही पाणी वाढत गेले.
या ठिकाणच्या अतिक्रमणामुळे कुंतल शहा नगर झोपडपट्टीतील घरांमध्ये पाणी शिरले यामुळे घरातील घर उपयोगी संसाराचे साहित्य भिजल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले. ओढ्यातील अतिक्रमणामुळे लगतच्या घरांमध्ये पाणी शिरले. या ठिकाणच्या नागरिकांचे नुकसान झाले. आता तरी प्रशासन ओढ्यातील अतिक्रमण काढणार का? दरवर्षी पाऊस पडल्यानंतर नागरिकांच्या घरात पाणी शिरल्या नंतर मदत करत राहणार हे किती दिवस चालणार असा सवाल नागरिकांतून विचारला जात आहे.
□ एसटी आगाराच्या हलगर्जीपणामुळे लाखोंचे नुकसान
पंढरपूररोडवरील ओढ्यालगत कुर्डूवाडी एसटी बस आगार आहे. ओढ्याला पाणी आल्यानंतर बस बाहेर काढल्या नाहीत. तर तिकीट कंट्रोल मशीन रूममध्ये पाणी शिरल्यामुळे नुकसान झाले. तर एसटी बस अडकल्यामुळे अनेक फेऱ्या रद्द झाल्या. त्याचबरोबर आगारप्रमुखांच्या घराला पाण्याने वेढा दिल्यामुळे नागरिकांनी आगार प्रमुखांना उचलून बाहेर काढले. आगार प्रमुखांच्या हलगर्जीपणामुळे एसटी बसतील लाखो रुपयांचे नुकसान झाले.
शहरातील ओढ्याला पूर आल्याचे समजताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव, प्रभारी पोलीस निरीक्षक विक्रांत बोधे, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, अभियंता अक्षय खटके कुर्डूवाडीचे सर्कल डिकोळे, आरोग्य निरीक्षक जयसिंग लोखंडे, कुर्डूचे ग्रामसेवक मोरे, कुर्डूचे सरपंच अण्णा ढाणे व सदस्यांनी पाणी शिरलेल्या परिसराची पाहणी केली व पूर परिस्थितीचा अधिकाऱ्यांनी आढावा घेतला.
ओढ्यातील अधिक पाणी येण्याची शक्यता लक्षात घेता ज्या ठिकाणी पाणी जाण्याची शक्यता आहे. अशा ठिकाणच्या नागरिकांचे स्थलांतर करावे व जेवणाची सोय करावी असा सूचना अतिरिक्त पोलीस अधीक्षक हिम्मत जाधव यांनी केले.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ कुर्डूवाडी शहराचा संपर्क तुटला
कुर्डूवाडी शहरात येण्यासाठी टेंभुर्णी रोड, पंढरपूर रोड, व माढा जवळील भोसरीच्या ओढ्याला पूर आल्यामुळे शहरात येणारे सर्व रस्ते बंद झाले. नैसर्गिक वाहतूक बंदी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. यामुळे शाळा, महाविद्यालय व विविध शासकीय व निमशासकीय कर्मचारी आदींना सुट्ट्या घ्याव्या लागल्या.
माजी नगरसेवक बाबा गवळी, भाजपचे संजय टोणपे, हरिभाऊ बागल, सामाजिक कार्यकर्ते हरी भराटे, पिंटू वायचळ, शिवाजी चौधरी आदींनी पाणी गेलेल्या परिसरातील नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या. कुडू हद्दीतील शेतकऱ्यांच्या गाई, म्हैस, शेळ्या वाहून गेल्याचे प्राथमिक माहिती समजत आहे.
□ बेंद ओढ्याला इतिहासात सर्वात मोठा पूर
तुफान पावसामुळे कुर्डूवाडी परिसर व शहर तसेच कुर्डू ग्रामपंचायत,चौभे पिंपरी, भोसरे ,वडाचीवाडी, आदी गावांमध्ये सर्वत्र पाणी साचलेले आहे. कुर्डूवाडी माढा कुर्डूवाडी घाटणे कुर्डूवाडी टेंभुर्णी हे रस्ते सध्या अतिवृष्टीमुळे बंद करण्यात आलेले आहेत. कुर्डूवाडी पंढरपूर रोड बायपासपर्यंत वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे. कुरवाडी बस स्थानकात शेजारील बेंद घोड्याला सर्वात मोठा पूर आल्यामुळे कुरवाडी बस डेपो मध्ये पाणी घुसलेले आहे. त्याचबरोबर कुर्डूवाडी नजीकच्या कुर्डू ग्रामपंचायत हद्दीतील सर्व घरांमध्ये पाणी साचलेले आढळून आले. भोसऱ्यातून घाटनेला जाणारा मार्ग त्याचबरोबर भोसरी माढा हे मार्ग वाहतुकीसाठी प्रशासनाने बंद केले आहे.
□ बेंद ओढ्याचे रुंदीकरण व खोलीकरण केले नसते तर…?
कुर्डूवाडीतील विठ्ठलगंगा या बेंदओढ्याचे गुरूवारच्या पावसाने केम झाकले गेले. ढवळस पिंपळखुंटे पिंपरी या परिसरात तुफान पावसाने नागरिकांची दैनाच ऊडवली. माढा वेलफ्लेअर फाऊंडेशन चे संस्थापक धनराज शिंदे यांनी जर बेंद ओढ्याचे खोलीकरण व रुंदीकरण केले नसते तर आज आलेल्या पुरात किती नुकसान झाले असते हा विचार करवत नाही.
मागील तीन वर्षापासून माढा वेलफ्लेअरच्या माध्यमांतून धनराज शिंदे यांनी बेंद ओढ्याचं खोलीकरण व रुंदीकरण केले. तब्बल 35 किमी अंतर ओढ्याचं रुपांतर एका महाकाय नदी मध्येच केले. यालाच आज माढा तालुक्यातील लोक विठ्ठल गंगा बेंद ओढा म्हणू ओळखले जाते.
खोलीकरण व रुंदीकरणामुळे आज बेंदओढा ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे. धनराज शिंदे यांनी चुलते आमदार बबनदादा शिंदे यांच्या सिंचन क्रांतीचे राहिलेले अपूर्ण स्वप्न पूर्ण केले अन तालुक्याला एका नवीन नदीचा उदय घडवून आणला आहे. याचे ड्रोन चित्रिकरण पाहण्यासाठी सुराज्य डिजिटल फेसबुक पेजला भेट द्या.
पूराच्या ड्रोन व्हिडिओसह अधिक व्हिडिओ पाहण्यासाठी surajya digital फेसबुक पेजला भेट द्या
————————————-
□ कोल्हापूरमध्ये तुफान पाऊस, वीज कोसळून दीड एकर ऊस जळाला
कोल्हापूर परिसरात गेल्या काही तासांपासून ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे. या पावसामुळे कुंभी नदीवरील रेव्याचीवाडी, कातळी बंधारे पाण्याखाली गेले. कुंभी धरणातून 600 क्युसेक विसर्ग करावा लागला. तर हातकणंगले तालुक्यातील घुणकी गावामध्ये वीज कोसळून दीड एकरातील ऊस जळून खाक झाला आहे. याची नुकसान भरपाई सरकारने द्यावी, अशी शेतकऱ्यांने मागणी केली आहे.