□ कृषी महोत्सवाच्या माहिती पत्रकाचे अनावरण
□ दोन टनाचा रेडा, साडेतीन फुटाच्या कोंबड्याचे आकर्षण
बार्शी : बार्शीतील पं जवाहरलाल नेहरू कृषी उत्पन्न बाजार समितीच्यावतीने देशाच्या स्वातंत्र्याचा व बाजार समितीच्या अमृत महोत्सवानिमित्त दि ९ ते १३ नोव्हेंबरच्या दरम्यान अशा ५ दिवसीय भव्य राज्यस्तरीय भगवंत कृषी महोत्सवाचे आयोजन बाजार समितीच्या आवारात करण्यात आल्याची माहिती बाजार समितीचे सभापती रणवीर राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिली. Two ton reda, three and a half feet chicken attraction Barshi Bazaar Committee: Five day state level Bhagwant Krishi Mahotsav
यावेळी कृषी महोत्सवाच्या माहिती पत्रकाचे अनावरण सभापती रणवीर राऊत, संचालक रावसाहेब मनगिरे, चंद्रकांत मांजरे, माजी नगरसेवक विलास रेणके, व्यापारी सचिन मडके, संदीप गिड्डे यांच्या हस्ते झाले.
सभापती राऊत म्हणाले, सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह आसपासच्या जिल्ह्यातून शेतकरी शेतीमाल विक्रीसाठी बार्शी बाजार समितीत येतात. बाजार समितीने राबवलेल्या विविध उपक्रमामुळे बाजार समितीचा राज्यभर नावलौकिक आहे. या संस्थेने नुकताच अमृत महोत्सवी टप्पा पार केला आहे. या अमृतमहोत्सवानिमित्त शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, उत्क्रांती, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून त्यांच्या ज्ञानात भर घालण्याबरोबरच त्यांना नवी ऊर्जा देण्याच्या हेतूने शेतकरी केंद्रबिंदू ठेवून या राज्यस्तरीय कृषी महोत्सवाचे आयोजन करण्याचे ठरविले. बाजार समितीच्या सर्व संचालकांनी एकमताने याबाबतचा ठराव मंजूर केला.
या महोत्सवात वैविध्यपूर्ण औजार स्पर्धा, वैशिष्ट्यपूर्ण पशुधन प्रदर्शन, पीक स्पर्धा व पारितोषिके, महिला बचत गट मेळावा, डॉग शो, कृषि प्रात्यक्षिके, शेती औजारे अशी वैशिष्ट्य आहेत. विविध प्रकारचे २५० ते ३०० स्टॉल्स असणार आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
शेती औजारे, बी बियाणे, लागवड साहित्य, शेती औषधे, ग्रीन हाऊस आणि साहित्य, जैवतंत्रज्ञान, डेअरी तंत्रज्ञान व उत्पादने, कुक्कुटपालन, हॉर्टीकल्चर, सिंचन यंत्रणा, पशुधन विकास, सौर ऊर्जा, जल व्यवस्थापन, शेतमाल साठवणूक यंत्रणा, अपारंपरिक ऊर्जा, संरक्षित शेती, पणन व विपणन, आंतरराष्ट्रीय बाजारपेठ, शेतविमा व अर्थसहाय्य, शैक्षणिक संस्था, सहकार क्षेत्र, फार्म टेक्नॉंलॉजी, उती तंत्रज्ञान, जैविक खते, फार्म मशिनरी याच्या आस्थपना व कंपन्यांचा यात सहभाग असणार आहे.
या महोत्सवात ८० टक्के स्टॉल हे शेती व शेतीपूरक उदयोग, शेतमाल प्रक्रिया उद्योग तर २० टक्के स्टॉल हे फूड मॉल व गृहपयोगी वस्तूचे असतील. या महोत्सवात सर्वांना विनामूल्य प्रवेश आहे.
बाजार समितीचे संचालक रावसाहेब मनगिरे म्हणाले, बाजार पेठ व शेतकऱ्यांचा फायदा होईल यादृष्टीने या महोत्सवाचे आयोजन आहे. राज्यातील विविध कृषी विद्यापीठाचे तसेच तसेच शासकीय योजनांचे स्टॉल असणार आहेत. प्रगत तंत्रज्ञाना बरोबर महोत्सवातून विविध विषयातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी यामध्ये हवामानातील बदल, सेंद्रिय शेती, द्राक्ष पीक व्यवस्थापन, आदर्श गोठा व्यवस्थापन, ऊस पीक व्यवस्थापन या विषयावर विशेष चर्चासत्रे, परिसंवाद याचे देखील आयोजन करण्यात आले आहे. पंजाबराव डख यांच्यासह कृषी क्षेत्रातील अनेक दिग्गज यात मार्गदर्शन करणार आहेत.
पशु प्रदर्शनात २ टनाचा रेडा, साडेतीन फुटाचा कोंबडा अशी विविध आकर्षणही यात असणार आहेत. बार्शी बाजार समितीच्यावतीने सोलापूर जिल्ह्यासह परिसरातील शेतकऱ्यांना अशी पर्वणी बऱ्याच वर्षानंतर यानिमित्ताने मिळणार आहे. याचा शेतकऱ्यांसह कृषी निगडित सर्व घटकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले. यानिमित्ताने बार्शी परिसराचे दर्शन घडविण्यासाठी माफक दरात हेलिकॉप्टर राईड उपलब्ध असणार आहे.