□ सोलापूरवरून तीन तासात मुंबई गाठणार
सोलापूर : केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने सोलापूरसाठी वंदे मातरम एक्सप्रेसच्या रूपाने दिवाळी भेट दिली असून, आता तीन तासात सोलापूर मुंबई आणि मुंबईहून सोलापूर प्रवास करत येणार आहे. Solapur – Mumbai Vande Mataram Express approved, MP Jaysiddheshwar Mahaswamy demands to start service from Makar Sankranti
वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करण्यासंदर्भात सोलापूरचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, खा. रणजितसिंह निंबाळकर यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांच्याकडे मागणी करून बैठक घेतली होती. दरम्यान, मंगळवारी (ता. 18) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांची भेट घेतली. या भेटीनंतर रेल्वेमंत्र्यांनी सोलापूर – मुंबई वंदे मातरम एक्सप्रेसला मंजुरी दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
वंदे मातरम एक्सप्रेसच्या गाडीच्या दोन्ही बाजूंस चालक कक्ष असल्यामुळे ही गाडी दोन्ही दिशांना धावू शकते. संपूर्णपणे वातानुकूलित असलेल्या या गाडीत शयनयान सुविधा नसून केवळ बसण्याची सोय आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी वाय-फाय, गाडीचा वेग, पुढील स्थानक इत्यादी माहिती पुरवणारी यंत्रणा, स्वयंचलित दरवाजे, आपोआप फ्लश होणारी शौचालये आदी अद्ययावत सुविधा ह्या गाडीमध्ये आहेत. साधारणतः या गाडीचा वेग १८० किलोमीटर प्रतितास इतका असल्याने तीन तासात सोलापूर मुंबई असा प्रवास करणे शक्य होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
● सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेला सुरू करण्याची मागणी
जानेवारीपासून वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करावी सोलापुरातून मुंबईला जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असल्याने २६ जुलै २०२२ रोजी रेल्वेमंत्री अश्विनकुमार यांच्याकडे सोलापूर-मुंबई वंदे मातरम एक्सप्रेस सुरू करण्याची मागणी केली होती. या मागणीस अश्विनकुमार यांनी मंजुरी दिली.
ही रेल्वे मार्च २०२३ पासून सुरू होणार असला तरी सिद्धरामेश्वरांच्या गड्डा यात्रेचे औचित्य साधून वंदे मातरम एक्सप्रेस जानेवारी २०२३ पासून सुरु करावी, अशी आमची विनंती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि रेल्वेमंत्री अश्विन कुमार यांनी सोलापूरकरांना दिलेल्या या दिवाळी भेटीबद्दल आभारी असल्याचे खा. डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी म्हटलंय.
केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी सोलापूर ते मुंबई ‘वंदे भारत’ ही हायस्पीड रेल्वे सेवा सुरू करण्याचे मान्य केले असून ग्रामदैवत शिवयोगी श्री सिध्दरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर मकरसंक्रांतीपासून सोलापूरकरांसाठी ही सेवा सुरू व्हावी यासाठी आपले प्रयत्न असल्याची माहिती खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी दिली.
महास्वामी म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात ‘वंदे भारत’ रेल्वे सेवा सुरू करण्याचे जाहीर केले होते. तेव्हापासून आपण संसदेच्या प्रत्येक अधिवेशनात सोलापूरकरांना नाशिक – पुणे हायस्पीड रेल्वे प्रकल्पाबाबत आढावा ‘घेताना ‘रेल कम रोड’ प्रकल्पाचा विचार व्हावा, असा एक प्रवाह पुढे आला. त्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करुन राज्य सरकार पुढील निर्णय घेईल, असे सांगितले.