सोलापूर – कराटेचे प्रशिक्षण देणाऱ्या एका ४२ वर्षीय शिक्षकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना केगाव येथील नाईट क्वीन हॉटेल येथे आज मंगळवारी (ता.18) सकाळच्या सुमारास उघडकीस आली. Solapur. Karate teacher commits suicide by hanging himself in hotel
संजय सुभाष साबळे (वय ४२ रा.हिरज ता.उत्तर सोलापूर) असे आत्महत्या केलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो केगाव येथील जुने जय मल्हार बार येथील खोलीत राहण्यास होता. आज मंगळवारी सकाळी त्याचा मृतदेह दुसऱ्या मजल्यावरील खोलीतल्या छताच्या पंख्याला कमरेस बांधण्याच्या कापडी पट्टयाने(ब्लॅक बेल्ट) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.
मयत संजय साबळे यांच्या पश्चातत आई-वडील आणि दोन मुले असा परिवार आहे. तो बाळे परिसरात कराटेचे क्लास घेत होता अशी माहिती पोलिसांनी दिली. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप समजले नाही. पुढील तपास हवालदार दराडे करीत आहेत.
□ अल्पवयीन तरुणीला पळवून नेऊन अत्याचार; दोघांना ३ दिवसाची कोठडी
सोलापूर – एका अल्पवयीन तरुणीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करीत गर्भवती केल्याची घटना जोडभावी पेठ परिसरात घडली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी आणि त्याला सहकार्य करणाऱ्या एका महिलेसह चौघाविरुद्ध पोक्सो अधिनियमाप्रमाणे गुन्हा दाखल केला. त्यापेकी दोघांना अटक करण्यात आली असून त्यांना ३ दिवस पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने मंगळवारी (ता.18) दिला.
अभिषेक शाहूराज कांबळे (वय २४), त्याला मदत करणारे विनोद भारत डावरे (वय ३६),कोमल देविदास कांबळे(सर्व रा. मड्डीवस्ती) आणि महादेव कांबळे ( रा. उमरगा )अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यापैकी अभिषेक आणि विनोद डावरे याला पोलिसांनी अटक करून २१ ऑक्टोबर पर्यंतची पोलीस कोठडी घेतली.
ती अल्पवयीन तरुणी एप्रिल महिन्यात आजीकडे गेली होती.त्यावेळी अभिषेक कांबळे हा तिला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेला. आणि तिच्यावर मड्डीवस्ती आणि उमरगा येथे नेऊन अत्याचार केला. त्यात ती गर्भवती राहिली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर पीडीतेच्या आईने नुकतीच जोडभावीपेठ पोलिसात फिर्याद दाखल केली. पुढील तपास महिला फौजदार व्हट्टे या करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ थुंकण्याच्या कारणावरून सलून दुकानदाराचा तलवारीने खुनाचा प्रयत्न
सोलापूर : बार्शी- ग्राहक आणि स्वतः दुकानदार थुंकून घाण करत असल्याच्या कारणावरून तलवारीने केलेल्या हल्यात मेन्स पार्लरचा चालक गंभीर जखमी झाला. ही घटना बार्शी येथील आदित्य मेन्स पार्लर येथे रविवारी सकाळच्या सुमारास घडली.
संतोष अभिमन्यू देवकर (वय ४०) असे जखमी झालेल्या दुकानदाराचे नाव आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीवरून दिनेश मस्तुद रा.बार्शी) याच्याविरुद्ध पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला. सकाळच्या सुमारास संतोष देवकर हा दुकानात काम करत होता.
त्यावेळी मस्तुद हा तेथे येऊन, तू आणि तुझ्या दुकानात येणारे ग्राहक हे दुकानाच्या पाठीमागे थुंकतात.तू ग्राहकांना समजून सांगत जा, असे सांगितल्यानंतर त्याने कोण थुंकले मला माहीत नाही. असे उत्तर दिले. तेंव्हा मस्तुद घरातून तलवार आणून त्याच्यावर हल्ला केला. अशी नोंद पोलिसात झाली. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक इज्जपवार करीत आहेत.
□ पीकअप धडकेत एक मयत
अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील अक्कलकोट स्टेशन येथे घरगुती बाजार करून घराकडे जात असणाऱ्या एकास पीकप गाडीने जोरात धडक दिल्याने एकाचा मृत्यू झाला. जगन्नाथ शामराव राठोड (वय ५२, रा.अंबाबाई मंदिराजवळ अक्कलकोट रेल्वे स्टेशन) असे अपघातात मयत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्राकडून मिळालेली माहिती अशी की, मयत जगन्नाथ शामराव राठोड हे अक्कलकोट स्टेशन येथून घरगुती सामान घेऊन अक्कलकोट जाणाऱ्या रोडने घराकडे पायी चालत जात असताना अक्कलकोट कडून अक्कलकोट स्टेशनकडे जाणारा पिकअप (एमएच १५ ए.जे ०७८१) या चार चाकी वाहनावरील अज्ञात चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून भरधाव वाहन चालवून जगन्नाथ राठोड यांना समोरून जोरात धडक दिली. या धडकेमुळे त्यांचा मृत्यू झाला. या संदर्भातील फिर्याद त्यांचा मुलगा चंद्रकांत राठोड यांनी अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्यात दिली.