■ महापालिका परिवहन उपक्रमातील १६.०८ लाख नुकसान भरपाई प्रकरण
□ महापालिका परिवहनचे पाठविले नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पत्र
सोलापूर : महापालिका परिवहन उपक्रमातील बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी ६ लाख ८ हजार आणि दहा लाख रुपये वेतन घेतलेले अग्रीम समायोजन न केल्याने परिवहनच्या नुकसान भरपाई पोटी महापालिका परिवहन विभागाचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या शिरूर येथील जागेवर बोजा चढविण्याचे पत्र परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी तेथील नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे. Solapur. Boja Khawa Mallav at Shirur place of the then Manager of Transport
सोलापूर महापालिका परिवहन उपक्रमात बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी तत्कालीन व्यवस्थापक मल्लाव यांच्यासह तीन अधिकाऱ्यांना एका महिन्यात परिवहनच्या १८ लाख नुकसानीची भरपाई करा अन्यथा फौजदारी कारवाई करण्यात येईल , अशा नोटिसा धाडण्यात आल्या होत्या.
तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्यासह कार्यालयीन अधीक्षक नि लेखापाल श्रीशैल लिगाडे (बडतर्फ) आणि सेवानिवृत्त झालेले प्रमुख मुख्य वाहतूक निरीक्षक भारत हनुमंत कंदकुरे अशा तिघांकडून या नुकसानाची भरपाई त्यांना विभागून प्रत्येकी ६ लाख ८ हजार ८० रुपये इतके परिवहन उपक्रम प्रशासनाकडे २८ ऑक्टोबरपर्यंत भरावे लागणार होते.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
तसेच मुदतीत नुकसान भरपाईची ही रक्कम प्रशासनाकडे जमा न केल्यास त्यांच्या मिळकतीतून जमा करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. तसेही न झाल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. यासाठी देण्यात आलेली एक महिन्याची मुदत संपल्याने पुढील कारवाई हाती घेण्यात आली आहे.
दरम्यान, परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक असताना अशोक मल्लाव यांनी स्वतःच्या वेतनासाठी १० लाख रुपये घेतले मात्र अग्रीम समायोजन केले नाही. याप्रकरणीही ती रक्कम जमा करण्याचे आदेश देण्यात आले होते. अशा प्रकारे परिवहन उपक्रमातील बस क्यूशेड जाहिरात घोटाळा प्रकरणी ६ लाख ८ हजार आणि १० लाख रुपये वेतन घेतलेले अग्रीम समायोजन न केल्याने परिवहनच्या नुकसान भरपाई पोटी महापालिका परिवहन विभागाचे तत्कालीन व्यवस्थापक अशोक मल्लाव यांच्या शिरूर येथील जागेवर (मिळकत) बोजा चढविण्याचे पत्र परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी पुणे जिल्ह्यातील शिरूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना पाठविले आहे.
परिवहन व्यवस्थापक तथा महापालिका आयुक्त पी शिवशंकर यांनी आता परिवहन उपक्रमात झालेल्या घोटाळा व नुकसान भरपाईची वसुली करण्यासाठी कठोर पावले उचलली आहेत. यापुढे फौजदारी गुन्हेही दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.