● खिडक्यांच्या काचा व टेबलाची केली मोडतोड
सोलापूर : रेल्वे स्टेशनवरील उच्च क्लास वेटिंग रूममध्ये घुसून एका १९ वर्षीय तरुणीने धिंगाणा घालत वेटिंग रूमच्या खिडक्यांच्या काचा, टेबल खुर्च्यांची मोडतोड केली. हा संपूर्ण थरार अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केला. परंतु कोणीही तिला नासधूस करण्यापासून रोखण्याचे धाडस करू शकला नाही. A girl screams in the waiting room at Solapur railway station
ही घटना आज शुक्रवारी (ता. 21) पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास सोलापूर रेल्वे स्टेशनवर घडली. रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर उच्च श्रेणी वेटिंग रूम आहे. येथे वेटिंग रूम मध्ये येणाऱ्या जाणाऱ्या प्रवासांची नोंद करणारे जमीर महबूब खान हे ड्युटीवर असताना पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास ही अनोळखी तरुणी विना तिकीट प्लॅटफॉर्मवर आली.
येथे आल्यानंतर तिने जवळच असलेल्या उच्च श्रेणी वेटिंग रूममध्ये प्रवेश केला. त्यावेळी खान यांनी तिला तिकिटाची मागणी करत या रूममधून बाहेर जाण्यास सांगितले असता उलट त्या मुलींनी खान यास आर्वाच्च भाषेत शिवीगाळ करत वेटिंग रूम मधील बाथरूम मध्ये जाऊन तिने आतून कडी लावून घेतली. ही गोष्ट खान यांनी जवळच ड्युटीवर असलेले आरपीएफचे पोलीस जवान व पोलीस कर्मचारी यांना सांगून त्यांना त्या ठिकाणी बोलावून घेतले.
या तिघांनी त्या मुलीला दरवाजा उघडण्यास सांगितले असता, त्या माथेफिरू तरुणीने सुरुवातीला आरडा – ओरडा करत नकार दिला. नंतर तिने दरवाजा उघडून जवळच असलेल्या टेबलवर चढून खिडकीची काच फोडली. हातात येईल त्या वस्तूने तिने दरवाज्याची तसं तसेच इतर खिडक्यांच्या काचा फोडल्या. तसेच टेबल व खुर्च्यांची तोडफोड केली. या अनपेक्षित प्रकारामुळे प्लॅटफॉर्मवर प्रवासात घबराट निर्माण झाली.
तेथे उपस्थित पोलीस कर्मचा-याने तिला खूप समजावण्याचा प्रयत्न केला असता, उलट तीच त्यांच्या अंगावर शिवीगाळ करत धावून येत होती. तोडफोडीनंतर बऱ्याच खिडकीच्या काचा प्लॅटफॉर्मवर पडल्या होत्या. काही वेळाने उपस्थित एका पॅसेंजरने तिला पाठीमागून जाऊन पकडले आणि आरपीएफ पोलिसांच्या ताब्यात दिले.
लोहमार्ग पोलीस ठाण्यात तिला आणल्यानंतर त्या मुलीने आपले नाव राजनंदिनी तानाजी साठे (वय-१९, रा. दमाणीनगर, सोलापूर) असे असल्याचे सांगीतले आहे. पोलिसांनी तिच्या आई-वडिलांना पोलीस ठाण्यात बोलावून घेतले. रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी जमीर खान यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस प्रशासनाने तिला तिच्या आई वडिलांच्याच्या ताब्यात दिली आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ व्याजाच्या पैशावरून जीवे मारण्याचा प्रयत्न ; तिघांवर गुन्हा
सोलापूर : व्याजाच्या पैशावरून दोरीने गळा आवळून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी तिघा जणांविरुद्ध एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना दि.१८ ऑक्टोंबर रोजी रात्री सात ते साडे आठ वाजण्याच्या दरम्यान हॉटेल बनशंकरी येथील सेंटर कारखान्यासमोरील जंगलामध्ये घडली.
याप्रकरणी नरेश नागनाथ सब्बल (वय-३१,रा. गंगा चौक निलम नगर भाग-३, सध्या- मधुकर लक्ष्मण पून्नम यांच्या घरी भाड्याने) यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून मिकी उर्फ आशुतोष दंडी,सुनील दाते, रुपेश आवारे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी नरेश यांच्या मित्रास व्यंकटेश याला फिर्यादीने मध्यस्थी करून आशुतोष दंडी यांच्याकडून व्याजाने ५ हजार रुपये घेऊन दिले होते. व्याजाने घेतलेले पैसे वेळेवर परत न केल्याच्या कारणावरून वरील संशयित आरोपीने फिर्यादी नरेश यांना जबरदस्तीने बनशंकरी हॉटेल जवळील कारखान्यासमोर बोलावून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर दोरीने फिर्यादी यांचा गळा आवळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आहे, असे फिर्यादीत नमूद आहे. घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पेटकर हे करीत आहेत.