□ ग्रहणादिवशीच अधिका-यांनी घेतला पदभार
सोलापूर : जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाला लागलेले ग्रहण अखेर मंगळवारी सुटले आहे. सुनील खमितकर यांनी समाजकल्याण अधिकारी म्हणून पदभार घेतला आहे. अनेकजण ग्रहणाचा योग टाकत असताना सुनील खमितकर यांनी आज सूर्यग्रहणा दिवशीच पदभार घेतल्याने चर्चा होत आहे. Solapur ZP’s social welfare has been eclipsed, Sunil Khamitkar got a new officer department
झेडपीच्या समाजकल्याण विभागाचे समाजकल्याण अधिकारी म्हणून सुनील खमितकर यांनी आज मंगळवारी पदभार घेतला. आज ग्रहण आहे म्हणून झेडपीतील बरेच अधिकारी व कर्मचार्यांनी दांडी मारल्याचे चित्र दिसून आले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे हे काही काळासाठी कार्यालयात आले होते.
त्याकाळात खमितकर यांनी पदभार घेतल्याचे सांगण्यात आले. पण समाजकल्याण अधिकारी कार्यालयातील केबीन बंदच दिसत होती. समाजकल्याणला नवीन अधिकारी मिळाल्याने समाजकल्याण विभागाचे ग्रहण सुटले अशी कर्मचार्यांत चर्चा दिसून आली.
गेल्या वर्षभरात जिल्हा परिषदेचा समाजकल्याण विभागात वादातीत ठरला होता. यापूर्वीचे समाजकल्याण अधिकारी जाधव यांनी पुण्याला विनंती बदली मागितली होती. त्यांची बदली मान्य झाल्यावर खमितकर यांची नियुक्ती झाली होती. पण त्यांना पदभार देण्यात आला नव्हता. त्यानंतर उप मुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांच्याकडे पदभार देण्यात आला.
समाजकल्याण विभागाच्या वैयक्तिक लाभाच्या योजनेत साहित्य वाटपात वशीलेबाजी केल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते संजीव खिलारे यांनी केली होती. या तक्रारीवर समाजकल्याण विभागाच्या उप आयुक्त मनीषा फुले यांनी तीन दिवस जिल्हा परिषदेत ठाण मांडून चौकशी केली होती. तसेच दलितवस्ती विकास निधी वाटपावरून जिल्हा परिषद सभा व जिल्हा नियोजन सभेत लक्षवेधी झाली होती. टक्केवारीवरून कामाचे वाटप झाल्याचा आरोप झाला होता.
तत्कालीन पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नाव सांगा त्या अधिकार्याला निलंबित करतो अशी घोषणा केली होती. आमदार राम सातपुते यांनी तर राजीनामा देण्याची घोषणा केली होती. पण नाव उघड झाल्यानंतर संबंधीत टेबलाच्या लिपिकाची बदली करण्यात आली व समाजकल्याणचा पदभार काढण्याबाबत सीईओ दिलीप स्वामी यांनी शासनाकडे अहवाल सादर केल्याचे सांगितलेे होते. या प्रकरणामुळे गंभीर वातावरण निर्माण झाले होते.
राज्यात सत्ता बदलानंतर या तक्रारींची गंभीर दखल घेण्यात आल्याचे सांगण्यात आले. विशेष म्हणजे खमितकर यांनी पूर्वी या पदावर काम केले आहे. त्यांची यापूर्वीची कारकीर्द बरीच गाजली होती, हे विशेष.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
■ राज्यस्तर खो खो स्पर्धेसाठी सोलापूरचे पुरुष व महिला संघ जाहीर
सोलापूर : हिंगोली येथे ५ ते ८ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या राज्य अजिंक्यपद निवड चाचणी खोखो स्पर्धेकरिता सोलापूर जिल्ह्याचा पुरुष व महिला खो खो संघ सोलापूर ॲम्युचर खो खो असोसिएशनचे सचिव सुनील चव्हाण यांनी जाहीर केला.
हे संघ निवड समिती सदस्य रामचंद्र दत्तू , प्रिया पवार, युसूफ शेख व नागेश माडीकर यांनी निवडले. संघास असोसिएशनचे अध्यक्ष महेश गादेकर यांनी शुभेच्छा दिल्या.
संघात निवड झालेल्या पुरुष खेळाडूंनी २८ ऑक्टोंबर राेजी स्वामी विवेकानंद प्रशाला जुळे साेलापुर येथे प्रशिक्षक माेहन रजपुत याचेशी तर महिला खेळाडूंनी वाडिकुराेली येथे प्रशिक्षक संताेष पाटील याचेशी सकाळी ९.०० वाजता संपर्क करावा. नंतर राखीव खेळाडूंना संधी दिली जाईल याची सर्व खेळाडूंनी नोंद घ्यावी, असे चव्हाण यांनी कळविले आहे.
संघ : पुरुष :
रामजी कश्यप, गणेश बोरकर, मुजफ्फर पठाण, समीर शेख (वेळापुर), कुणाल तुळसे, जुबेर शेख, विजय संकटे, विनीत दिनकर ( उत्कर्ष मंडळ), अक्षय इंगळे , राकेश राठोड, सौरभ चव्हाण ( किरण स्पोर्ट्स), हृतिक शिंदे (गोल्डन, मंद्रूप), राज दत्तू (मंगळवेढा ), योगेश सालीमठ ( न्यू सोलापूर क्लब), पृथ्वीराज तांगडे (लक्ष्मी टाकळी), राखीव : रोहित पाेतदार (मंगळवेढा), श्रीकांत खटके (दीनबंधू, मंद्रूप), निखिल कापुरे (उत्कर्ष).
महिला :
प्रीती काळे, अमृता मला, संध्या सुरवसे, साक्षी काळे, शिवानी यड्रावकर, श्वेता भोसले, साक्षी देटे (केके स्पोर्ट्स वाडीकुरोली), ऋतुजा यलमार (वसंतराव काळे क्लब, वाडीकुरोली), सादिया मुल्ला, अर्चना व्हनमाने (किरण स्पोर्ट्स), श्रेया चव्हाण (उत्कर्ष), प्राजक्ता बनसोडे (वेळापूर), वसुंधरा फंड (नरखेड), सानिया पवार (लो. वि., वेळापुर), सानिका भोसले (मंगळवेढा) राखीव : प्रियांका वाघमोडे (सांगोला), स्नेहा निंबर्गी (किरण स्पोर्ट्स), सरिता कांबळे (मंगळवेढा).