मुंबई : अखेर राज्यात पोलीस भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्य सरकारने पोलीस भरतीचा जीआर काढला आहे. यामुळे पोलीस विभागात 11 हजार 443 पदे भरली जाणार आहेत. पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी पदे भरली जाणार आहेत. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेल्या माहितीनुसार याच आठवड्यात पोलीस भरतीची जाहीरात काढली जाणार आहे. Police recruitment for 11 thousand seats, GR released, exam soon Fadnavis Shinde
शासनाकडून पोलीस भरतीचा जीआर काढण्यात आला आहे. शासनाच्या जीआरमुळे तब्बल 11 हजार 443 पदं भरली जाणार आहेत. महाराष्ट्र पोलिसांची रिक्त असलेली 100 टक्के पदं भरण्याला मान्यता देण्यात आली आहे.
राज्यातील पोलीस खात्यामध्ये पोलीस शिपाई संवर्गामध्ये पोलीस शिपाई, पोलीस शिपाई चालक आणि सशस्त्र पोलीस शिपाई अशी एकूण 11 हजार 443 पदं भरली जातील. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजेच एमपीएससी कक्षेतील पदं वगळता अन्य पदं 50 टक्के पद भरण्यास राज्य शासनाकडून परवानगी देण्यात आली आहे.
राज्याच्या पोलिस दलात रिक्तपदे वाढली असून सततचा बंदोबस्त आणि वाढलेल्या गुन्हेगारी खटल्यांचा तपास करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. या पार्श्वभूमीवर आता 2020 आणि २०२१ मधील तब्बल 19 हजार 758 रिक्तपदांची दोन टप्प्यात भरती होणार आहे.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिनाभरापूर्वी पोलिस भरतीची घोषणा केली होती. राज्यात साडेसात हजार पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवणार असल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं होतं. तसंच गृह विभागाचे सचिव आणि इतर अधिकाऱ्यांना तातडीने भरती प्रक्रिया राबवण्यासाठी सूचना दिल्याचंही मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं होतं.
देवेंद्र फडणवीस म्हणाले, येत्या आठवडाभरात 18, 000 हजार पोलीसांच्या भरतीची जाहिरात निघणार आहे. मुख्यमंत्र्यांनी इतर विभागांना आदेश दिलेले आहेत की, ज्या कोणत्या विभागांमध्ये जागा रिकाम्या असतील त्या जागांचा रिपोर्ट तयार करावा आणि विभागानुसार लवकरच नोकरीची जाहिरात काढावी, यामुळे अजून इतर वेगवेगळ्या विभागातील जाहिराती निघण्याची शक्यता आहे.
● कोरफळे येथे दोन ठिकाणी सशस्त्र दरोडा; ९ लाखाचे दागिने पळविले
बार्शी – तालुक्यातील कोरफळे येथे दोन ठिकाणी सत्तुरचा धाक दाखवून दरोडेखोरांनी ८ लाख ६० हजाराचे दागिने लुटून पोबारा केला.ही घटना रविवारी (ता. 23) पहाटेच्या सुमारास घडली. या धाडसी प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
पहिला दरोडा कोरफळे येथील सचिन शिवाजी हजारे या व्यापाऱ्याच्या घरात पहाटे ३ वाजेच्या सुमारास घडला. तिघा दरोडेखोरांनी हजारे यांच्या किचन मधील आतून बंद असलेला दरवाजा कटावणीने अचकटून घरात प्रवेश केला. हजारे यांच्या गळ्याला सत्तुर लावून त्यांच्या पत्नीच्या अंगावरील तसेच कपाटातील असे एकूण १३५ ग्रॅम सोन्याचे (५ लाख २६ हजार) दागिने लुटून पोबारा केला.
दुसरी घटना याच परिसरातील सिद्धेश्वर रामलिंग मस्के यांच्या घरात घडली. दरोडेखोरांनी अशाच पद्धतीने दरवाजा उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर बेडरूम कपाटावरील किल्ल्या घेऊन कपाटात ठेवलेले ६५ ग्रॅम सोन्याचे दागिने (३ लाख ३४ हजार ) लुटून पसार झाले. या दोन्ही घटनांची नोंद बार्शी पोलिसात झाली. सहाय्यक निरीक्षक परजने पुढील तपास करीत आहेत .