मोहोळ : देवडी वाफळे रोडवर मोटर सायकला हायवा डंपरने धडक दिलेल्या मागे बसलीली वृध्द पत्नी ठार झाली तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना शनिवारी संध्याकाळी सात वाजणेच्या सुमारास वाफळे शिवारात गोसावी ओढा येथे घडली. Solapur. Accident of old couple going to Kirtana, unfortunate death of wife Mohol
मोहोळ पोलिसांकडून मिळालेली माहिती नुसार आपल्या एम एच ४५ एपी ९१७४ या क्रमांच्या मोटर सायकलवरून बळीराम भानुदास चव्हाण (वय ६०) व सुमन बळीराम चव्हाण (वय ५४) हे वृद्ध पती- पत्नी
आपल्या घरून वाफळे गावाकडे किर्तनाच्या कार्यक्रमासाठी निघाले होते. गोसावी ओढ्याजवळ येताच समोरून येणाऱ्या एम एच १३ ए एक्स ३४३३ या क्रमांकाच्या डंपरने त्यांना जोराची घडक दिली.
या अपघातात ड्रायव्हरकडील बाजूचे चाक सुमन चव्हाण यांच्या डोक्यावरून गेले. त्यामुळे त्या ठार झाल्या. पती बळीराम चहाण गंभीर जखमी झाले. ही घटना शनिवारी (ता. 29) संध्याकाळी सात वाजणाच्या सुमारास देवडी वाफळे रोडवर वाफळे हद्दीत घडली. यात हायवा डंपर ड्रायव्हरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास मोहोळ पोलीस करीत आहेत.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन पती पत्नीचा मृत्यू
सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथे ऊसाने भरलेली ट्रॉली पलटी होऊन झालेल्या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला होता तर सोलापुरातील शासकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या गंभीर जखमी महिलेचा अखेर उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी येथील इंगळे वस्ती येथे ऊसाने भरलेल्या ट्रॅक्ट्ररची ट्रॉली पलटी होऊन मनगोळी येथील तानाजी म्हाळाप्पा गेजगे (वय 55 ) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्याचबरोबर सदर मयत व्यक्तीची पत्नी कमल तानाजी गेजगे (वय वर्ष 45 ) ही महिला गंभीरित्या जखमी झाली आहे.
हा ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी होऊन मनगोळी येथील तानाजी म्हाळाप्पा गेजगे (वय वर्षे 55 ) या इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. यात मयत व्यक्तीची पत्नी कमल तानाजी गेजगे (वय वर्ष 45) ही महिला गंभीरित्या जखमी झाली होती. त्यांना उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अखेर त्यांचाही उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे तेथील डॉक्टरांनी घोषित केले. पती-पत्नीच्या अशा दुर्दैवी मृत्यूमुळे मनगोळी गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.