Monday, March 27, 2023
Surajya Digital
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

मोरबी केबल पूल अपघात मृतांचा आकडा 141 वर; 140 वर्षे जुना पूल

Morbi cable bridge accident death toll rises to 141; 140 years old bridge Gujarat

Surajya Digital by Surajya Digital
October 31, 2022
in Hot News, देश - विदेश
0
मोरबी केबल पूल अपघात मृतांचा आकडा 141 वर; 140 वर्षे जुना पूल
0
SHARES
115
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

गांधीनगर : गुजरातमधील मोरबी इथे झालेल्या केबल सस्पेन्शन पुलाच्या अपघातात 141 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मोरबी पोलिसांनी दिली आहे. रेंज आयजीपी यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरु झाला असून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. Morbi cable bridge accident death toll rises to 141; 140 years old bridge Gujarat

 

मोरबी येथील केबल पूल कोसळण्याच्या घटनेस भाजप जबाबदार असल्याची टीका काँग्रेसने केली आहे. या पुलाच्या केलेल्या दुरुस्तीकामाची नीट पाहणी झाली होती का, याची चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनीही ट्विट करत आपल्या संवेदना आणि प्रार्थना पीडितांसोबत असल्याचे म्हटले आहे.

 

आर्मी, नेव्ही, एअरफोर्स, एनडीआरएफ व अग्निशमन दलाच्या जवानांनी रात्रभर शोधमोहीम राबवल्याची माहिती गुजरातच्या गृहमंत्र्यांनी दिली आहे. गुजरातमधील मोरबी येथे एक मोठी दुर्घटना घडली आहे. येथे मच्छू नदीवरील केबल पूल तुटला असून त्यामुळे सुमारे 400 लोक नदीत पडले आहेत. अनेक जण नदीत वाहून गेल्याची शक्यता आहे. अपघातानंतर मदत आणि बचावकार्य सुरू आहे. दुरूस्तीनंतर 5 दिवसांपूर्वी पूल पुन्हा खुला करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

पूल कोसळल्याने अनेक लोक नदीत पडले. अपघातानंतर तातडीने बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. पूल कोसळल्यानंतर नदीत पडलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी प्रशासन स्थानिक लोकांच्या मदतीने प्रयत्न करत आहे. पंतप्रधानांनी मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी दोन लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

 

PM @narendramodi has announced an ex-gratia of Rs. 2 lakh from PMNRF for the next of kin of each of those who lost their lives in the mishap in Morbi. The injured would be given Rs. 50,000.

— PMO India (@PMOIndia) October 30, 2022

यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी दु:ख व्यक्त केलं आहे. मोरबी दुर्घटनेत अनेकांचे प्राण गेले ही गोष्ट दुर्दैवी आहे. यात प्राण गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांप्रती मी संवेदना व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया शाह यांनी दिली.

 

या दुर्घटनेत आतापर्यंत १४१ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. तर १७७ जणांना वाचवण्यात आले असून जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दरम्यान, या प्रकरणी या पुलाच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या एजन्सीविरोधात ३०४, ३०८ आणि ११४ या कलमांतर्गत क्रिमिनल केस दाखल करण्यात आली आहे. तसंच या प्रकरणी तपासही सुरू करण्यात आलाय.

दरम्यान, बचाव कार्यात लष्कर, हवाई दल आणि नौदलासह, अग्निशमन दल आणि एनडीआरएफचीही मदत घेतली जात आहे. यात आतापर्यंत १७७ जणांना वाचवण्यात यश आल्याची माहिती समोर आली. रात्री जवळपास तीन वाजता लष्कराची टीम या ठिकाणी पोहोचली. आम्ही मृतदेह बाहेर काढण्याचे प्रयत्न करत आहोत. एनडीआरएफच्या टीमकडूनही बचावकार्य सुरू आहे, अशी माहिती भारतीय लष्कराचे मेजेर गौरव यांनी दिली.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

नदीवरील केबल पूल तुटल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. या घटनेत अनेक जण नदीत पडले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले आणि बचावकार्य सुरू केले. हा झुलता पूल नूतनीकरणानंतर नुकताच खुला करण्यात आला होता. सुटीच्या काळात झुलता पुलावर मोठ्या प्रमाणात नागरिकांची ये-जा सुरू होती.

अपघाताच्या वेळी पुलावर सुमारे 400 ते 500 लोक उपस्थित होते, असे सांगण्यात येत आहे. हा पूल खूप जुना असून काही दिवसांपूर्वीच त्याची दुरुस्ती करण्यात आली होती. 5 दिवसांपूर्वी ते सर्वसामान्यांसाठी पुन्हा खुला करण्यात आला होता.

100 हून अधिक लोक पाण्यात अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बचावकार्य जोरात सुरू आहे. सहा महिन्यांहून अधिक काळ हा पूल बंद होता. बचाव पथकाने अनेकांना नदीतून वाचवले असून त्यांना रुग्णालयात पाठवले आहे. इतर लोकांचाही शोध सुरू आहे. सर्व लोकांना लवकरात लवकर नदीतून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आज सुट्टीचा दिवस असल्याने इथे खूप गर्दी होती.

जखमींपैकी काही जणांना राजकोटमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. तर काही जणांना मोरबी सिव्हील हॉस्पीटल आणि अन्य रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आलेय. घटनास्थळी ३० रुग्णवाहिकांनादेखील तैनात करण्यात आलेय. १४० वर्षांहून अधिक जुना असलेला हा पूल दुरुस्तीसाठी सहा महिने बंद होता. ते काम पूर्ण होऊन २५ ऑक्टोबर रोजी तो जनतेसाठी पुन्हा खुला करण्यात आला. गुजरातमध्ये आगामी विधानसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्या राज्यात इतकी मोठी दुर्घटना घडली आहे.

 

Morbi cable bridge collapse | Search & Rescue operation underway.

The rescue operation is still underway. Indian Army had reached here around 3 at night. We are trying to recover the bodies. Teams of NDRF are also carrying out rescue operations: Major Gaurav, Indian Army pic.twitter.com/StD0Y8xOir

— ANI (@ANI) October 31, 2022

मोरबी येथील हा केबल किंवा सस्पेन्शन पूल १४० वर्षे जुना आहे. त्याची लांबी ७६५ फूट आहे. या पुलाला मोठा ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. २० फेब्रुवारी १८७९ रोजी या पुलाचे उद्घाटन मुंबई प्रांताचे तत्कालीन गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी केले होते. मोरबी येथे मच्छू नदीवर हा केबल पूल बांधण्यासाठी ३.५ लाख रुपये खर्च आला होता. या पुलाच्या बांधकामासाठी सारे सामान इंग्लंडहून आणण्यात आले होते.

Tags: #Morbi #cablebridge #accident #death #tollrises #140years #oldbridge #Gujarat#मोरबी #केबलपूल #अपघात #मृतांचा #आकडा #140वर्षे #जुनापूल #मच्छूनदी #गुजरात
Previous Post

गुजरात । नदीवरील केबल पूल तुटल्याने 400 लोक नदीत पडले, अनेकजण वाहून गेल्याची शक्यता

Next Post

राजन मालकांनी अखेर ‘दांडपट्टा’ फिरवला, मनात दडलेला भाजपचा ‘हुंदका’ उफाळला

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
राजन मालकांनी अखेर ‘दांडपट्टा’ फिरवला, मनात दडलेला भाजपचा ‘हुंदका’ उफाळला

राजन मालकांनी अखेर 'दांडपट्टा' फिरवला, मनात दडलेला भाजपचा 'हुंदका' उफाळला

वार्ता संग्रह

October 2022
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Sep   Nov »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697