□ अकलूजकरांच्या लाल दिव्यासाठी ‘विडा’ ही उचलला
सोलापूर : गेल्या काही महिन्यांपासून मोहोळ माजी आमदार राजन (मालक) पाटील यांच्या भाजप प्रवेशाचा निर्णय तळ्यात मळ्यात आहे. प्रवेशाच्या वावड्या – इतक्या उठल्या की, मालकांनी त्याचा इन्कार केला नाही वा खुलासाही केला नाही. मात्र त्यांच्या मनात भाजपप्रेम दडलेले होते हेही लपून राहिलेले नव्हते. Rajan Malik finally turned the ‘penalty belt’, BJP’s ‘dowry’ hidden in his mind came out Rajan Patil Mohite Patil
अखेर अखेर राजन पाटील यांनी हृदयात साठलेल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. त्यातून त्यांच्या मनात दडलेले भाजपप्रेम उफाळून आले. भाजप समर्थक आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा, अशी अपेक्षा व्यक्त करतानाच मालकांनी त्यांना लाल दिव्याची गाडी मिळावी म्हणून चक्क दंडही थोपटले. बीजेपीत माझे ऐकणारे आहेत, असा निर्वाळा दिल्यामुळे मालक भाजपच्या उंबरठ्यावर आहेत, हे स्पष्ट झाले आहे.
मोहोळ तालुक्यातील पापरी येथे एका विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अध्यक्षपदावरून मालक बोलत होते. सोलापूर जिल्हा अगोदर राष्ट्रवादीमय होता, तो आता कमी झाला आहे. आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांना लाल दिव्याची गाडी मिळावी, त्याच्यासाठी आम्ही वकिली करू; कारण भाजपमध्ये आमचेही ऐकणारे कोणीतरी आहेत, असे सांगून मालकांनी आपले भाजपमधील वजन प्रवेशाआधीच अधोरेखित केले.
वैमानिक झाल्याबद्दल ऋतुजा राजन पाटील, रयत शिक्षण संस्थेच्या सदस्यपदी निवड झाल्याबद्दल
डॉ. बाबासाहेब देशमुख, अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्यपदी निवड झाल्याबद्दल अजिंक्यराणा पाटील या तिघांचा पापरी ग्रामस्थ, ग्रामपंचायत पापरी व भोसले कुटुंबीय यांच्या वतीने येथे नागरी सत्कार करण्यात आला.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
□ सोलापूर जिल्ह्यासाठी प्रेरणा
आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यावेळी बोलताना म्हणाले की, आजच्या सत्कारमूर्ती या जिल्ह्याच्या प्रेरणा आहेत. ऋतुजा राजन पाटील या महिला वैमानिक झाल्याने महिलांचा स्वाभिमान वाढला आहे. जिल्ह्याच्या अडचणी सोडवण्यासाठी मी जरूर प्रयत्न करेन. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे विकासासाठी माहीर आहेत. महिला सक्षमीकरणासाठी सहकार्य करू.
मालक म्हणाले, ‘जिल्ह्याच्या विकासात व जडणघडणीत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील, (स्व.) गणपतराव देशमुख यांचे मोठे योगदान आहे. आमदार रणजितसिंह मोहिते पाटील यांचा सोलापूर जिल्ह्यातील संपर्क कमी झाला आहे, तो त्यांनी वाढवावा.
□ स्वप्न सत्यात उतरवले…
ऋतुजा पाटील म्हणाल्या, मी शाळेत असताना जे स्वप्न पाहिले होते ते सत्यात उतरविले. तुम्हीही तुमच्या मुलींना संधी द्या. या माझ्या स्वप्नाचे सर्व श्रेय आजी आजोबा, आई-वडील व भावांना जाते. या वेळी अजिंक्यराणा पाटील, नाना डोंगरे, प्रकाश चवरे, डॉ बाबासाहेब देशमुख, संगीता सावंत यांची भाषणे झाली. या वेळी प्रकाश कस्तुरे, पोपट देशमुख, भाजप युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजीत चवरे, सरपंच जयश्री शंकर कोळी, उपसरपंच अमोल भोसले, रमेश कचरे, वैभव गुंड, रामदास चवरे आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या वेळी आमदार यशवंत माने म्हणाले की, शिंदे-फडणवीस सरकारने मोहोळ तालुक्याचा १३० कोटींचा विकास निधी आडविला आहे, तो मिळण्यासाठी आमदार रणजितसिंह मोहिते – पाटील यांनी प्रयत्न करावा.