सोलापूर : सोलापूर जिल्हा परिषदेचे वादग्रस्त शिक्षणाधिकारी किरण लोहार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले आहेत. 25 हजार रुपयांची लाच स्वीकारताना शिक्षणाधिकारी किरण लोहार आणि आणखी एका कर्मचाऱ्यास लाचलुचपत विभागाने काल सोमवारी ताब्यात घेतलंय. त्यांच्या कोल्हापुरातील घराची कोल्हापूर एसीबीने तब्बल दोन तास झाडाझडती घेतल्याची माहिती आहे. Bribery Kiran Lohara sent to police custody, Kolhapur luxury house also searched Education Officer Shahupuri Solapur
याप्रकरणी सोलापूर सत्र न्यायालयाने किरण लोहार यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय. त्यांच्या कोल्हापुरातीला घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून दोन तास झाडाझडती करण्यात आली. स्थावर मालमत्तेचा अहवाल आज सोलापूर एसीबीकडे सुपूर्द केला जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. कोल्हापुरातील अलिशान बंगल्यासमोर पोलीस वाहने थांबल्यामुळे स्थानिक रहिवाशांमध्ये चर्चेचा विषय सुरू होता.
लाचप्रकरणी सोलापूरचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. किरण लोहार यांच्या पाचगाव (ता.करवीर जि. कोल्हापूर) येथील अलिशान बंगल्याची लाचलुचत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने (एसीबी) काल सोमवारी रात्री उशिरा झाडाझडती घेतली.
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)
यावेळी पोलीसांच्या हाती काही महत्वाची कागदपत्रे सापडली आहेत. त्यांचा पंचनामा करून हा दस्तऐवज सोलापूरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे पाठवण्यात आला. लोहार यांचे मूळ गाव शाहूवाडी तालुक्यातील आहे. ते येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी असताना प्रचंड वादग्रस्त ठरले होते. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे अनेक आरोप झाले होते.
तसैच सोलापुरात शिक्षणाधिकारी म्हणून काम करतानाही त्यांचा कारभार चर्चेत राहिला. काल, सोमवारी (ता.1) दुपारी त्यांना २५ हजारांची लाच घेताना सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात अटक केली. काल दक्षता जनजागृती सप्ताहास सुरूवात झालीय. कालच लोहारानी सकाळी भ्रष्टाचार निर्मूलनाची प्रतिज्ञा घेतली. त्याच्या काही तासातच ते लाचखोरीत रंगेहाथ पकडले गेले. त्यानंतर त्याच्या मालमत्तेची चौकशी सुरू झाली आहे.
सोलापूर एसीबीच्या सुचनेनुसार कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार व पथकाने पाचगाव येथील लोहारच्या बंगल्याची रात्री उशिरा झाडाझडती घेतली.
बंगल्यातील तिजोरी, कपाटातील फायली, काही कागदपत्रे, खरेदीच्या पावत्या पोलीसांच्या हाती लागल्या आहेत. जप्त केलेली कागदपत्रे व पंचनाम्याचा अहवाल सोलापूर एसीबीकडे पाठवला आहे. दोन मजली बंगल्याची तासभर झडती सुरु होती.